Farmer Scheme बीज प्रक्रिया अनुदान योजनाही बीज प्रक्रियेशी संबंधित योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दहा लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते.
या योजनेसाठी पात्रता काय आहे, कोण अर्ज करू शकते, याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. लेख शेवटपर्यंत वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा.
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Farmer Scheme लाभार्थी पात्रता
या योजनेसाठी नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी किंवा संघ पात्र असेल.
तालुका कृषी कार्यालयाने शेतकरी उत्पादक कंपनीच्या अर्जाला मंजुरी दिल्यानंतर त्यांनी राष्ट्रीयकृत बँकेकडे प्रकल्प सादर करावा.
ज्यावेळी बँकेकडून कर्ज मंजूर होईल, त्यावेळी संबंधित शेतकरी उत्पादक कंपनी, संघ हे अनुदानाच्या लाभास पात्र राहतील.
ज्या शेतकरी उत्पादक कंपनी, संघ यांना अर्ज सादर करावयाचा आहे, त्यांना त्यांची कंपनी ज्या कार्यक्षेत्रात आहे त्या कृषी कार्यालयात अर्ज सादर करावा लागेल.
अर्ज सादर करताना अर्जासोबत शेतकरी उत्पादन कंपनी नोंदणी प्रमाणपत्र, मागील तीन वर्षाचे बॅलन्स शीट किंवा ऑडिट रिपोर्ट, कमिटी ठराव, ज्या जागेवर बीज प्रक्रिया उद्योग सुरू करायचा आहे त्या जागेच्या मालकी हक्काचा पुरावा इत्यादी कागदपत्रे जोडावी लागणार आहे.
अन्न व पोषण सुरक्षा कडधान्य योजना (Farmer Scheme)काय आहे?
अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य योजना बीज प्रक्रिया संच उभारणीसाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा दहा लाख रुपये यामध्ये जे कमी असेल तितके अनुदान दिले जाणार आहे.
जी शेतकरी उत्पादक कंपनी किंवा संघ नोंदणीकृत असेल, असे या योजनेसाठी पात्र असतील.
यासाठी सर्वप्रथम तालुका कृषी विभागाकडे आणि त्यानंतर बँकेकडे अर्ज सादर करावा लागणार आहे.
या तारखेपर्यंत करता येणार अर्ज
ज्या लाभार्थी शेतकरी उत्पादक कंपनी किंवा संघ यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते 31 जुलै 2024 पर्यंत आपल्या कार्यक्षेत्रातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये जी आवश्यक कागदपत्र आहे त्यांच्यासह अर्ज करू शकतात.
ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची निवड होईल त्या कंपनीस आवश्यक कागदपत्रांच्या छाननीनंतर पूर्वसंमती देण्यात येईल.
शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अर्ज करावा:
ज्या नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी, संघ यांनी त्यांची कंपनी ज्या कार्यक्षेत्रात आहे, त्या कार्यक्षेत्रातील तालुका कृषी कार्यालयात अर्ज सादर करावा.
ज्या आर्थिक वर्षात पूर्वसंमती देण्यात आली आहे, आर्थिक वर्षात बीज प्रक्रिया संच प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक आहे
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठीयेथे क्लिक करा