Home Loan गृह कर्ज घ्यायचे आहे, तर हे नियोजन करा….

Home Loan

Home Loan नमस्कार मित्रांनो आज आपण गृह कर्ज याविषयी माहिती घेणार आहोत. तुम्हाला तर माहितीच आहे स्वतःच घर जर घ्यायचं असेल तर गृह कर्ज हे सर्वात मोठे पाऊल आहे. आपल्या सर्वांचेच असे स्वप्न असते की, आपले हक्काचं घर असावं आणि हे स्वप्न सत्य उतरवण्यासाठी आपल्याला गृह कर्ज महत्त्वाचं ठरतं. सहाजिकच आहे की गृह कर्ज म्हटलं की आपण ईएमआय चा विचार करणारच पण हाही विचार केला पाहिजे की, घर भाडे देण्याऐवजी स्वतःच्या घराचा ईएमआय भरणे कधीही चांगलं.

गृह कर्ज घ्यायचे आहे, तर हे नियोजन करा….

Home Loan गृह कर्ज घ्यायचे आहे, तर हे नियोजन करा

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की सहज गृह कर्ज home loan calculator कसे घेता येईल. व या कर्जामधून कसं मुक्त होता येईल. ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख पूर्ण वाचा.

हे वाचले का?  Home Loan Hidden Charges गृहकर्ज घेताना या हिडन चार्जेस कडे द्या काळजीपूर्वक लक्ष..!!

१. घराची आवश्यकता आणि वापर

सर्वांनाच माहिती आहे की घराची आवश्यकता तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जागा का खरेदी करत आहात? हे शोधून काढणे आवश्यक आहे. तुम्ही जी जागा घेणार आहे ती स्वतःच्या वापरासाठी घेणार आहे, की गुंतवणुकीसाठी घेणार आहे. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे याशिवाय फक्त जागा घ्यायची की, जागा घेऊन त्याच्यावर घर बांधायचं. हेही लक्षात ठेवलं पाहिजे. एखादी जागा घेऊन त्यावर नवीन घर बांधणे हा खर्चिक पर्याय दिसत असला तरी, दीर्घ काळाचा विचार करता दुरुस्ती आणि नूतनीकरणावरील तुमचा खर्च हा वाचू शकतो. घर खरेदी करताना करार पूर्ण करण्यापूर्वीच प्लंबिंग वॉटरप्रूफिंग आणि इलेक्ट्रिकल कनेक्शन तपासून घेणे गरजेचे आहे. यामुळे आपला नंतरचा खूप खर्च वाचतो.

हे वाचले का?  Home Loan Schemes गृहकर्जावर करता येणार मोठी बचत | या योजनांवर सरकार देत आहे अनुदान |

गृह कर्ज घ्यायचे आहे, तर हे नियोजन करा….

2.गरजेचे मापन

घराची आवश्यकता लक्षात आल्यानंतर त्या घरामध्ये तुम्ही किती लोक राहणार आहात हे समजून घेणे आवश्यक आहे. यामधून तुम्हाला घर किती मोठे हव आहे हे लक्षात येईल. home loan eligibility

1 BHK आणि 2 BHK चा विचार करता साधारण 600 ते 1000 चौरस फूट एवढे घर सहसा आवश्यक असतं. तसेच घर किती मोठा हवं यावर तुमचं बजेट आणि आर्थिक भविष्यही ठरवता येईल.

3. अर्थनियोजन करा

गृह कर्ज घ्यायचे आहे, तर हे नियोजन करा….

तुम्ही नक्की काय शोधता? याची कल्पना आल्यानंतर आता ते कसे मिळवायचं हा मुद्दा येतो. किती रक्कम उधार घ्यावी लागेल, तसेच तुमचे सध्याचे उत्पन्न किती आहे, आणि खर्च याचा अभ्यास करा.

डाऊन पेमेंट म्हणून तुम्ही किती रक्कम देऊ शकता? मासिक हप्ते फेडण्यासाठी किती रक्कम बाजूला काढता येईल? याचा नीट विचार करा. कर्ज फेडण्याचा कालावधी कमी व्हावा यासाठी डाऊन पेमेंट वाढवण्याचा पर्याय अनेकजण स्वीकारतात. home loan sbi

हे वाचले का?  Pre Approved Loan प्रीअप्रुव्हड लोन घेणे किती सुरक्षित आहे?

मात्र, हेच पैसे तुम्हाला भविष्यातील संकट समई उपयोगी येऊ शकतात याचा विचार डाऊन पेमेंट करताना करणे आवश्यक आहे.

हे ही वाचा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube 

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top