kanda chal anudan yojana कांदा चाळ अनुदान योजना:
महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शेतकरी साधारणपणे कांदा साठवणूक करताना घरगुती पद्धतीने तयार केलेल्या कांदा चाळीमध्ये किंवा जमिनीवर पसरवून कांद्याची साठवणूक करतात. अशा पद्धतीने कांदा जास्त दिवस टिकत नाही व बदलत्या हवामानामुळे खराब होतो व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
कांद्याची प्रत व टिकाऊपणा यावर देखील मोठ्या प्रमाणावरती परिणाम होताना दिसतो. कांदा चाळीमुळे कांद्याच्या साठवणुकी मध्ये कांद्याची प्रत आहे तशी राहते व कांदा जास्त दिवस टिकतो. कांदा चाळीमध्ये कांदा चांगल्या स्थितीत राहिल्यामुळे शेतकऱ्यांस फायदा होतो.
कांदा चाळ अनुदान योजना पात्रता व आवश्यक कागदपत्रे येथे पहा
सध्या कांदा चाळ उभारणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढता आहे. कांदा चाळ उभारणीसाठी शेतकऱ्यांना अनुदानही मिळते.
आज आपण या लेखामध्ये बघणार आहोत की कांदा चाळ उभारणीमध्ये किती अनुदान भेटते, कांदा चाळ योजनेसाठी कोण पात्र आहेत, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत. लेख शेवटपर्यंत वाचा आणि आवडल्यास शेअर नक्की करा.
kanda chal anudan yojana कांदा चाळ योजनेची उद्दिष्टे:
कांदा चाळ उभारल्यामुळे शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कांद्याचे नुकसान कमी होते व शेतकऱ्यांस आर्थिक फायदा होतो.
ज्या वेळेस कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याचे दर कमी होतात व कांद्याची कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन दर वाढतात अशा समस्येवर नियंत्रण मिळवणे.
कांदा चाळ अनुदान योजना पात्रता व आवश्यक कागदपत्रे येथे पहा
कांदा चाळ अनुदान किती मिळते?
kanda chal anudan yojana कांदा चाळ उभारणीसाठी शासनाकडून कांदा चाळ उभारणारे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून ५, १०, १५, २० व २५ मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के रक्कम अर्थ सहाय्य म्हणून दिले जाते. तसेच कमाल 3500 रुपये प्रति मेट्रिक टन या क्षमतेनुसार सहाय्य मिळते.
कांदा चाळ अनुदान योजनेचा लाभ कोण घेऊ शकते?
- वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी
- शेतकरी महिला गट
- शेतकऱ्यांचा गट
- स्वयंसहाय्यता गट
- शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था
- सहकारी संस्था
- नोंदणीकृत शेतकरी संबंधित संस्था
कांदा चाळ अनुदान योजना पात्रता व आवश्यक कागदपत्रे येथे पहा
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- विधी सेवा प्राधिकरण तुमची कोर्ट केस लढण्यासाठी येथे मिळतात मोफत वकिल आणि सल्ला
- मातोश्री ग्रामसमृध्दी शेतरस्ते योजना, पाणंद रस्ते योजना सुरू
- महा आवास अभियान प्रत्येकाला स्वत:च्या मालकीचे पक्के घर मिळणार
- ग्राहक तक्रार निवारण मंच कडे तक्रार कशी करावी.
- शेत जमिनीचे क्षेत्रफळ म्हणजे काय?
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.