शेत जमिनीचे क्षेत्रफळ म्हणजे काय?

शेत जमिनीचे क्षेत्रफळ म्हणजे काय?

आपल्या शेत जमिनीचे क्षेत्रफळ ७/१२ उतार्‍यावर बऱ्याच वेळेस आणेवारी आणि पै मध्ये लिहिलेले दिसून येते. सामान्य व्यक्तीस ही महसुली भाषा काही समजत नाही. परिणामी त्यांचा संभ्रम होतो. तसेच नव्याने जमीन खरेदी करीत असताना आपल्याला जमिनीचे जुने अभिलेख तपासून बघावयाचे असतात तेव्हाही हा प्रश्न उभा राहतो.

हाच संभ्रम टाळण्यासाठी आपण सदर विषयाची व व्यवहारात जमिनीच्या क्षेत्रफळा विषयक वापरल्या जाणाऱ्या एककांची आणि त्यांच्या रुपांतरणाची माहिती घेऊयात.

आणेवारी व पै नुसार ७/१२ वरील खातेदाराचे जमिनीचे क्षेत्रफळ कसे काढतात.

वर्तमान संगणक युगात Online ७/१२ सामान्य जनतेच्या माहितीसाठी महसूल विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. हा प्रयोग यशस्वी होणार याबाबत शंका नाही. परंतु या ONLINE युगात देखील आपणाला हस्तलिखित व जुने अभिलेख यांची गरज भासते खास करून जेव्हा जमिनीच्या वादाचे प्रश्न उद्भवतात.

बऱ्याच प्रकरणात योग्य निवाडा करण्यासाठी जुने ७/१२ उतारे मागितले जातात. निकाल देणे व दुरुस्त्या करणेसाठी महसुली अधिकारी किंवा कोर्ट म.ज.म १९६६ चे कलम १५५ अन्वये लेखन प्रमाद दुरूस्ती, म.ज.म १९६६ चे कलम २४७ अन्वये अपिल व म.ज.म १९६६ चे कलम २५७ अन्वये रिव्हिजन यासारखे कामी आपणाला जुना संदर्भ घेतात.

गुंठेवरी एक-दोन गुंठे जमीन खरेदी विक्री बंदी दस्त नोंदणी होणार नाही

भविष्यात देखील घ्यावा लागणार आहे. नवीन म्हणून केवळ online काळात जुन्या संदर्भाला विसरून चालणार नाही. ह्याच साठी जुन्या काळातील एक ७/१२ लेखनाची पध्दत म्हणजे आणेवारी व पै नुसार ७/१२ वरील खातेदाराचे शेत जमिनीचे क्षेत्रफळ कसे काढतात याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. म्हणून सर्वसामान्यांना समजेल अश्या भाषेत या लेखा द्वारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत.

हे वाचले का?  मंडल निरीक्षक सर्कल (Circle) यांची भाऊसाहेब कर्तव्ये.

आपण व्यवहारीक जीवनात एक रुपया म्हणजे १६ आणे म्हणतो परंतु ज्यावेळी आपण ७/१२ बद्दल विचार करू यामध्ये एक ७/१२ म्हणजे १६ आणे व एक आणा म्हणजे १२ पै. यामुळे एक ७/१२ पै चे हिशोबात काढायचा म्हटले तर एक ७/१२ होतो १९२ पै चा. यामध्ये बऱ्याच वेळा आपले कडून आणेवारी व पै नुसार जमिनीचे क्षेत्रफळ काढताना चुका होतात

एक ७/१२ हा १९२ पै चा असल्याने आपल्याला आणेवारी नुसार क्षेत्र काढताना आणेवारी व पै चे केवळ पै मध्ये रूपांतर करावे लागते व सूत्र वापरून क्षेत्र काढता येते.

शेत जमिनीचे क्षेत्रफळ
शेत जमिनीचे क्षेत्रफळ

उदा. पाच आणे चार पै क्षेत्र असल्यास रुपांतर करताना पाचला १२ ने गुणावे व त्यात चार मिळवावेत म्हणजे (५ x १२ ) = ६०+५= ६५ पै होतील वरील सूत्रात हे पै टाकायास येणारे उत्तर हे तुमचे क्षेत्र असेल. क्षेत्र हेक्टर आर मध्ये टाकावे व वरील सूत्रात एकुण ऐवजी लागवडीलायक टाकल्यास येणारे उत्तर हे लागवडीलायक क्षेत्राचे असेल व पोटखराबा क्षेत्र टाकल्यास येणारे उत्तर हे पोटखराबा क्षेत्राचे असेल.

उदाहरण: एका ७/१२ चे एकूण क्षेत्र ७.६२ हे. आहे व यामध्ये रामभाऊ यांचे क्षेत्र २ आणे ८ पै आहे तर रामभाऊ यांचे एकूण क्षेत्र किती ?

हे वाचले का?  सरपंच सदस्य यांचे पद रद्द कधी होते?

उत्तर :- सर्वप्रथम आपण २ आणे ८ पै चे रुपांतर पै मध्ये करु वरील प्रमाणे (२x१२) + ८३२ पै आता वरील सूत्रामध्ये हे ३२ पै व एकूण क्षेत्र टाकावे म्हणजे खालील प्रमाणे उत्तर मिळेल. या प्रमाणे आपण कोणत्याही आणेवार पै चे क्षेत्र का शकतो. वरीलप्रमाणे सराव झाल्यास आपण खुप कमी वेळात क्षेत्र काढू शकता. व्यावहारिक जगात लागणारे काही महत्वाची जमिनीच्या

7/12 (Satbara Utare) उतारे पोट-हिश्याचे ही आता स्वतंत्र  होणार

जमिनीचे क्षेत्रफळा ची रुपांतरे

  • १ हेक्टर = १०००० चौ. मी.
  • १ एकर = ४० गुंठे
  • १ गुंठा = ३३ फुट x ३३ फुट १०८९ चौ फुट
  • १ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
  • .१ आर = १ गुंठा
  • १ हेक्टर = १०० आर
  • १ एकर = ४० गुंठ x ३३ x ३३ = ४३५६० चौ फुट
  • १ चौ. मी. १०.७६ चौ फुट

शेती कुंपण योजना वन्य प्राण्यांमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी चेन लिंक फेन्सिंग उभारणीची योजना.

७/१२ वाचन करते वेळी पोट खराबा हे वाक्य असत

पोट खराबा चा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्र परंतु ते नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील तलाठी सजा मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते !!!! जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात.

हे वाचले का?  स्टॅम्प पेपर Stamp Paper घोटाळ्यात तुम्ही पण अडकलाय..!
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.