शेतात लाईट पोल टॉवर मोबदला देण्याची कार्यपध्दती या विषयावरील माहिती आज आपण या लेखात बघणार आहोत, ही माहिती आपण जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचवाल ही आशा.
शेतात लाईट पोल टॉवर मोबदला देण्याची कार्यपध्दती
मनोरा व वाहिनीच्या तारेखालील जमिनीचा मोबदला देण्याबाबतची कार्यवाही :
मनोन्याखालील जमिनीच्या मोबदल्याची रक्कम समान दोन टप्प्यात देण्यात यावी. पहिल्या टप्यातील मोबदला मनोरा पायाभरणीनंतर व दुसऱ्या टप्प्यातील मोबदला मनोरा उभारणीनंतर देण्यात यावा. ज्या जमिनीतून वाहिनी उभारण्यात आली आहे अशा ठिकाणी तारेखालील जमिनीचा मोबदला प्रत्यक्ष वाहिनी उभारल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात देण्यात यावा.
फक्त वाहिनीच्या तारेखालील जमिनीचा मोबदला:
ज्या जमिनीतून फक्त वाहिनीच्या तारा गेलेल्या आहेत अशा ठिकाणी तारेखालील जमिनीचा मोबदला प्रत्यक्ष वाहिनी उभारल्यानंतर देण्यात यावा. याबाबतची कार्यपद्धती सोबत च्या परिशिष्टामध्ये नमूद करण्यात आली आहे.
पिकांचा / फळझाडांचा मोबदला :
वरील मोबदल्याशिवाय मनोरा पायाभरणी उभारणी व वाहिनी उभारणी करतांना पिकांचे/फळझाडांचे / इतर झाडांचे नुकसान झाल्यास त्याचा मोबदलाही दोन टप्प्यात देण्यात यावा.
जमिनीच्या मालकीत बदल झाल्यास, नवीन मालक कोणत्याही प्रकारे मोबदला मिळण्यास पात्र असणार नाही.
राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक प्राधिकरणे, नगरपालिका, महानगरपालिका, एम.एम.आर.डी.ए., राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रम, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणे, सार्वजनिक बागा, करमणूक केंद्र, मिठागरे, विशेष आर्थिक क्षेत्रे, मुख्य / किरकोळ बंदरे नदी व खाडी, क्रिडा संकुल शासकीय व अशासकीय अनुदानित संस्था इत्यादी मनोन्याने व्याप्त वाहिनीच्या तारेखालील जमिनीच्या मोबदल्यास पात्र नाहीत.
मात्र अपवादात्मक परिस्थितीत, संबंधित पारेषण कंपनी त्याबाबत निर्णय घेऊ शकेल. त्याचप्रमाणे केंद्र शासन व रेल्वेच्या अधिपत्याखालील जमिनींचा मोबदला, केंद्र शासनाच्या संबंधित मंत्रालयांच्या विहित नियमानुसार व कार्यपध्दतीनुसार देण्यात यावा.
अस्तित्वात असलेल्या वाहिन्यांची क्षमतावाढ वा आधुनिकीकरण करावयाचे असल्यास, मनोऱ्याने व्याप्त व वाहिनीच्या तारेखालील वाढीव क्षेत्रासाठीच मोबदला देण्यात यावा.
या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही अडचणी, स्पष्टीकरण उद्भवल्यास, त्या सोडविण्यासाठी प्रधान सचिव, ऊर्जा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात यावी. या समितीमध्ये संबंधित पारेषण कंपनीचे व पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे प्रतिनिधी असावेत. सदर समितीच्या सदस्य सचिव पदी मुख्य अभियंता, राज्य पारेषण (उपक्रम) हे राहतील.
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
पारेषण वाहिनीच्या तारेखालील बाधित क्षेत्राच्या मोजणीची कार्यपद्धती :
<> एकपथ मनो-यावरील एकपथ वाहिनीची मोजणी ही दोन सर्वात दूरच्या तारांमधील अंतर हे रुंदी म्हणून धरण्यात यावी.
<> द्विपथ / बहु पथ मनो-यांवरील उजव्या व डाव्या बाजूच्या वाहिन्यांकरिता मनो-याची मध्य रेषा व डावीकडील वाहिनी / वाहिन्यांसाठी डावीकडील तारा व मध्य रेषेतील अंतर हे रूंदी म्हणून धरण्यात यावी. तसेच उजवीकडील वाहिनी/ वाहिन्यांसाठी मनो-यांची मध्य रेषा व उजवीकडील तार यांच्यातील अंतर हे रूंदी म्हणून धरण्यात यावे.
<> सदर पट्ट्याची लांबी ही दोन लगतच्या मनो-यांना जोडणा-या मध्य रेषेला जेथे बाधित क्षेत्राचा बांध छेदेल ती धरण्यात यावी.
<> सदरची लांबी व रूंदी ही मिटर या एककात मोजण्यात यावी..
<> सदरच्या मोजमापासाठी संबंधीत शेतक-याच्या समक्ष पंचनामा करून संयुक्त मोजणी तलाठी, संबंधीत पारेषण कंपनीचे प्रतिनिधी व संबंधीत शेतकरी यांनी करावी.
<> ज्यांच्या शेतात द्विपथ अथवा बहुपथ वाहिनी जाते त्यांना मनो-यातील मध्य रेषेच्या डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूसाठी ज्या प्रमाणात काम पूर्ण होईल त्या प्रमाणात मोबदला देण्यात यावा.
<> एकूण बाधित क्षेत्र हे खालीलप्रमाणे देण्यात यावे
अ) रूंदी
- एकपथ मनो-यांवरील एकपथ वाहिनीसाठी दोन सर्वात दूरच्या तारांमधील अंतर.
२) द्विपथ / बहुपथ मनो-यांवरील वाहिनीसाठी उजव्या / डाव्या बाजूस असणा-या वाहिनीसाठी मनो-यांमधील मध्य रेषा व उजव्या अथवा डाव्या तारेमधील अंतर (ब) लांबी
मनो-याच्या मध्य रेषेस शेतातील बांध जेथे छेदतील त्यांच्यातील अंतर हे लांबी म्हणून धरण्यात येईल..
GR डाऊनलोड कण्यासाठी येथे क्लिक करा
हे वाचले का?
- आमदार यांचे वेतन, भत्ते आणि सोयी सुविधा(Amdar salary)
- Petrol Pump वरील सुविधा आणि ग्राहकांचे अधिकार
- शेळी पालन अनुदान (Shelipalan Anudan) 2021 मध्ये घसघशीत वाढ
- श्रावणबाळ योजना (Shravan Bal Yojana) सेवा राज्य निवृत्ती वेतन
- कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा २००५ Domestic Violence act
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा