
वीज ग्राहकांचे अधिकार चला समजून घेऊया
नवीन वीज कनेक्शन
१. ग्राहकांना अर्ज केल्यापासून ७ दिवसाच्या आत व ग्रामीण भागात १० दिवसाच्या आत विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांच्या जागेचे निरिक्षण केले पाहिजे हा Vij Grahkache Adhikar आहे.
तसेच वीज जोडणीसाठी भराव्या लागणार्या विद्युत जोडणी शुल्काचा तपशील शहरी भागात १५ व्या दिवसापर्यंत तर ग्रामीण भागात २० व्या दिवसापर्यंत कळविला पाहिजे.
२. Electric Connection अर्ज व योग्य ते शुल्क भरल्यानंतर ग्राहकांला कमाल १ महिन्याच्या आत विद्युत जोडणी सुरू करून देणे ही विद्युत वितरण कपंनीची जबाबदारी आहे.
३. विद्युत वितरण कंपनीकडून प्रत्येक दोन महिन्यातून एकदा मिटरची नोंद घेतली गेली पाहिजे. कृषी मिटरसाठी तीन महिन्यातून एकदा.
४. घरगुती व शेतकरी ग्राहकांना बील सोपविल्याची तारीख व दंडाशिवाय बील भरण्याची तारीख यामध्ये किमान २१ दिवसांचा अवकाश असला पाहिजे. इतर ग्राहकांना हा आवकाश १५ दिवसाचा असला पाहिजे.
वीज मीटर मध्ये बीघाड झाल्यास वीज ग्राहकांचे अधिकार
५. विद्युत मीटर वेगाने फिरत असल्यास किंवा त्यात काही बिघाड आहे असे वाटल्यास सदर मिटर विद्युत वितरण कंपनीकडून योग्य ते चाचणी शुल्क भरून तपासून घेण्याचा ग्राहकांना अधिकार (Vij Grahkache Adhikar) आहे.
जर मिटर सदोष व खराब असल्याचे आढळले तर चाचणी शुल्क परत देणे तसेच मोफत नवीन मिटर बसवून देणे ही विद्युत कंपनीची जबाबदारी आहे.
ग्राहकांच्या मागणीनुसार विद्युत मिटरची चाचणी / तपासणी ही विद्युत नियामक आयोगाने ठरविलेल्या अन्य तज्ज्ञ
यंत्रणांकडून ही करता येईल. याची माहिती विद्युत कंपनीकडून ग्राहकांना मिळाली पाहिजे. हा Vij Grahkache Adhikar आहे.
६. विद्युत मिटर जळाल्याची ग्राहकाने तक्रार विद्युत वितरण कंपनीकडे केल्यानंतर शहरी भागात २४ तासाच्या आत व ग्रामीण भागात ४८ तासाच्या आत नवीन मिटर बसवून विद्युत पुरवठा पूर्ववत करणे ही कंपनीची जबाबदारी आहे.
वीज बिल जास्त आले तर काय करावे
७. नियमित व ठराविक बील येणार्या ग्राहकास एखाद्या महिन्यात अचानक मोठ्या रक्कमेचे बील येते. ग्राहक विद्युत कंपनीकडे तक्रार करायला गेल्यास अगोदर बील भरा नंतर तक्रार करा.
नसता विद्युत पुरवठा खंडीत होईल असे सांगीतले जाते. विद्युत कंपनीकडून असा दिला जाणारा सल्ला हा दिशाभूल करणारा असतो.
८. नियमित व ठराविक बील येणार्या ग्राहकास जर अचानक मोठे व वाढीव बील असल्यास असे मोठे व वाढीव बील भरण्याची सक्ती करता येत नाही Vijहा Vij Grahkache Adhikar आहे..
अशा परिस्थितीत विद्युत अधिनियम २००३ च्या कलम ५६ उपकलम (१) नुसार ग्राहकाला परंतुकानुसार निषेध नोंदवून निषेध बील भरण्याची कायदेशीर तरतूद आहे.
९. अचानक आलेले वाढीव व मोठे बील भरण्यापेक्षा मागील सहा महिन्यातील बीलांची सरासरी काढून त्या सरासरी इतके बील भरता येते.
याला निषेध बील किंवा पेमेंट विथ क्लेम असे म्हणतात. असे बील भरून घेतल्यानंतर विद्युत कंपनीस ग्राहकांचा विद्युत पूरवठा खंडीत करता येणार नाही.
वीज कंपनी अचानक कनेक्शन बंद करू शकत नाही
१०. निषेध बील भरल्यानंतर विद्युत कंपनीकडून वाढीव व मोठे बील का आकारले गेले यांचे सकारण प्रमाण ग्राहकांस देणे ही कंपनीची जबाबदारी आहे हा Vij Grahkache Adhikar आहे.
११. उचीत मुदतीत ग्राहकांनी बील भरले नसले तरी अचानक विद्युत पुरवठा खंडीत करणे ही कंपनीची बेकायदेशीर कृती ठरते. बील न भरल्याने ग्राहकाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यापूर्वी ग्राहकाला पूर्ण १५ दिवस अगोदर लेखी नोटीस दिली गेली पाहिजे.
बील भरले नाही म्हणून किंवा ग्राहक थकबाकी दार झाला म्हणून अचानक (नोटीस न देता विद्युत पुरवठा खंडीत करता येणार नाही. )
जास्त वेळ लाइट गेल्यास भरपाई
१२. विद्युत कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता शहरी भागात ४ तासापेक्षा अधिक काळ व ग्रामीण भागात २४ तासापेक्षा अधिक काळ विद्युत पूरवठा खंडीत ठेवला तर प्रभावीत ग्राहक विद्युत कंपनीकडे नुकसान भरपाई मागू शकतो हा Vij Grahkache Adhikar आहे.
१३. विद्युत ग्राहकांचे गाऱ्हाणे व तक्रार निवारण मंच कायद्यातील तरतूदीप्रमाणे प्रत्येक मंडल क्षेत्रात स्थापना केलेली असते. स्थानिक पातळीवर समाधान न झाल्यास विद्युत ग्राहक तक्रार निवारण मंचा मध्ये तक्रार दाखल करू शकतात.
प्रत्येक विद्युत बीलावर तक्रार निवारण मंचाचा पत्ता व संपर्क क्रमाक दिलेलाच असतो. सूचना : वीज चोरीची प्रकरणे सदर ग्राहक तक्रार निवारण मंचासमोर चालविता येणार नाहीत.
१४. मंचाचे कार्य अर्धन्यायीक पद्धतीने चालते या मंचासमोर विद्युतकंपनी व ग्राहक या दोघांच्याही बाजू एकून घेतल्या जातात. तक्रार निवारण मंचा मध्ये कोणतीही फि लागत नाही.
ग्राहक स्वतः तक्रार चालवू शकतो. वकीलाची गरज नसते. तक्रारीचा निकाल दोन महिन्यात देणे हे मंचावर बंधनकारक आहे.
१५. ग्राहक तक्रार निवारण मंचाकडून न्याय मिळण्याबाबत समाधान झाले नसेल तर ग्राहक किंवा ग्राहकांचा प्रतिनिधी विद्युत लोकपाल यांचेकडे विनाशुल्क तक्रार करू शकतात.
१६. विद्युत कंपनीचा प्रतिनिधी ग्राहकांच्या घरी किंवा जोडणीच्या ठिकाणी मिटर रिडींग किंवा इतर कामासाठी आला असल्यास त्यास सदर प्रतिनिधीच्या गणवेषावर नाव व पद असलेली पट्टी तसेच ओळखपत्र असलेच पाहिजे.
ग्राहकांनी मागणी करूनही सदर प्रतिनिधी नाम पट्टी किंवा ओळखपत्र दाखविण्यास असमर्थ ठरल्यास ग्राहक अशा प्रत्येक कसूर झाल्याच्या वेळी ग्राहक विद्युत कंपनीकडे ५० रूपये नुसार भरपाई मागू शकतो.
विद्युत लोकपाल यांच्याकडे तक्रार कशी करावी
तक्रारीची त्रिस्तरीय पद्धत
सर्वप्रथम वीज ग्राहकांनी आपली लेखी तक्रार स्थानिक तालुका वा जिल्हा स्तरावरील विद्युत कार्यालयाकडे करावी. सदर कार्यालयाने १० ते १५ दिवसात तक्रारीचे निवारण वा समाधान केले नाही तर सदर तक्रार विद्युत गान्हाणे / तक्रार पंचामध्ये तक्रार दाखल करावी हा Vij Grahkache Adhikar आहे .
आपल्या भागातील वीज ग्राहक तक्रार मंचाचा पत्ता व संपर्क क्रमांक आपल्या वीज बीलावर छापलेला असतो. जर वीज ग्राहक मंचाने दोन महिन्यात योग्य तो न्यायनिवाडा करणे बंधनकारक आहे.
जर सदर तक्रार मंचाने ग्राहकांस न्याय दिला नाही तर ग्राहक विद्युत लोकपाल यांच्याकडे तक्रार करून न्यायाची मागणी करू शकतो.
सद्या महाराष्ट्रात महावितरणचे खालील ११ ठिकाणी अन्य ३ मंडळ विद्युत कार्यालय स्तरावर एकूण १४ ग्राहक तक्रार निवारण मंच आहेत.
१) अमरावती २) औरंगाबाद ३) भांडूप ४) कल्याण ५) कोल्हापूर ६) कोकण ७ ) लातूर ८ ) नागपूर (ग्रामीण) ९) नागपूर (शहर) १०)नाशिक ११) पुणे १२) मुंबई रिलायन्स एनर्जी १३) मुंबई टाटा पॉवर १४) बेस्ट मुंबई
- MSRTC Recruitment ST महामंडळ नागपुर येथे भरती
- India Post Recruitment Maharashtra महाराष्ट्र पोस्ट विभागामध्ये 2508 पदांची भरती दहावी पास साठी सुवर्णसंधी
- Ordnance Factory Recruitment ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे मोठी भरती, ग्रॅज्युएट्स उमेदवारांना मोठी संधी…
- LIC Recruitment LIC भारतीय आयुर्विमा महामंडळात 9,400 पदांसाठी मेगा भरती, ग्रॅज्युएट्स उमेदवारांना मोठी संधी…
- India Post Recruitment भारतीय डाक विभागामध्ये 40,889 पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध, दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी…
विद्युत लोकपाल (इलेक्ट्रिीसिटी ओम्बइसमन )
विद्युत अधिनियम २००३ कलम ४२ (६) द्वारे आणि माविनिआ (ग्राहक गार्हाणे निवारण मंच आणि विद्युत लोकपाल) विनियमन २००६ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून विद्युत लोकपाल यांचे कार्यालय मुंबई व नागपूर येथे सुरू करण्यात आले आहे.
ग्राहक तक्रार निवारण मंचाकडून वीज ग्राहकांच्या गार्हाण्याचे निवारण न झाल्यामुळे बाधित ग्राहक विद्युत लोकपाल यांच्याकडे न्यायासाठी अभिवेदन सादर करू शकतात.
पत्ता विद्युत लोकपाल महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, केशव बिल्डींग, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स बांद्रा (पूर्व) मुंबई ४०००५५
(कार्य क्षेत्र मुंबई, कोकण, कोल्हापूर सातारा सांगली, पुणे नाशिक धुळे जळगांव आणि नंदुरबार)
पत्ता विद्युत लोकपाल कार्यालय, प्लॉट नं. १२ श्रीकृपा विजयनगर, छावणी नागपूर १२ फोन ०७१२-२५९६६७० (कार्यक्षेत्र सोलापूर मराठावाडा विदर्भ)
ग्राहकांना मिळणारी नुकसान भरपाई.

हे ही वाचा
- LPG Gas ग्राहकांचे अधिकार माहीत आहेत का?
- घर खरेदी करतांना कोणती आवश्यक काळजी घ्यावी…!!
- PF खातेदारांना मिळणार 7 लाखांचा विमा, EPFO Members Insurance
- वाहतूक पोलीसांना गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे का….?
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहन्यायासाठी येथे क्लिक करा