जनतेतून सरपंच पात्रता, कालावधी अधिकार संपूर्ण माहिती | Jantetun Sarpanch Nivadnuk |

जनतेतून सरपंच

भारताचा ग्रामीण गावे हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे, याच गावांचा विकास करण्याची जबाबदारी असते ती म्हणजे सरपंचावर आता या सरपंच यांची निवड ही जनतेतून होणार आहे, म्हणजे आता सरपंच आता गावातील जनता निवडणार आहे आज आपण बघणार आहोत जनतेतून सरपंच पात्रता, कालावधी अधिकार संपूर्ण माहिती

दि. २७ जुलै २०२२ रोजी अंमलात आलेल्या महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) अधिनियम, २०१७ नुसार कलम ३० अ- १अ नुसार सरपंच पदासाठी थेट निवडणूक असेल. ग्रामपंचायतीच्या मूळ सदस्यांची संख्या, आहे तीच राहील व सरपंच हे पद अतिरिक्त असेल.

जनतेतून सरपंच अविश्वास ठराव कसा आणावा येथे वाचा

Jantetun Sarpanch Nivadnuk

कलम ७ थेट निवडलेला सरपंच ग्राम सभेच्या अध्यक्षस्थानी असेल. (सरपंच यांच्या अनुपस्थितित उपसरपंच, उपसरपंचाच्या अनुपस्थितित, त्या ग्राम सभेमध्ये उपस्थित असलेला वयाने सर्वात ज्येष्ठ असणारा पंचायतीचा सदस्य अध्यक्षपदी असेल, पंचायतीचा कोणताही सदस्य उपस्थित नसेल त्या बाबतीत, ती ग्रामसभा एक आठवड्याच्या कालावधीसाठी तहकूब करण्यात येईल.

हे वाचले का?  ग्रामपंचायतीस बंधनकारक खर्च | Grampanchayat Bandhankarak Kharch

कलम १० (१-अ) कलम ३० अ-१अ अन्वये निवडून आलेला सरपंच हा ग्रामपंचायतीचा पदसिध्द सदस्य असेल.

सरपंच व उपसरपंच निवडणूक पात्रता

महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) अधिनियम, २०१७ नुसार सरपंचाची निवड थेट जनतेतून करणेत येते.

  • मतदार यादीत नाव असलेल्या व वयाची २१ वर्षे पूर्ण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस सरपंच पदासाठी निवडणूक लढवता येईल.
  • दि. १ जानेवारी १९९५ रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या व्यक्तीचे शिक्षण इयत्ता ७ वी परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • निवडून आलेले सरपंच हे ग्रामपंचायतीचे पदसिद्ध सदस्य असतील.
  • महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील अधिनियम क्र. ३ कलम ३० (अ) च्या सुधारणेनुसार सार्वत्रिक निवडणूकीनंतर घेण्यात येणाऱ्या पहिल्या सभेमध्ये उपसरपंच पदाची निवडणूक घेणेत येते.
  • उपसरपंच निवडीच्या सभेचे अध्यक्ष सरपंच राहतील, परंतु त्यांना मतदानाचा अधिकार असणार नाही.
  • उपसरपंचाच्या निवडणूकीमध्ये उमेदवारांना समान मते पडल्यास सरपंचांना निर्णायक मत देण्याचा अधिकार असेल.
  • सरपंच पद रिक्त असेल तर पिठासीन अधिकारी चिठ्ठ्या टाकून उपसरपंच निवडीचा निकाल देईल.
हे वाचले का?  Kaju Anudan 2024 काजू उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी | शेतकऱ्यांना मिळणार अनुदान |

जनतेतून सरपंच अविश्वास ठराव कसा आणावा येथे वाचा

जनतेतून सरपंच कालावधी-

कलम १४ (एक) खंड (अ) मध्ये पाच वर्षा जनतेतून सरपंच कालावधी असेल

कलम १६ मधील पोट कलम (२) मध्ये जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाविरोधात अपील राज्य सरकारकडे करता येईल, याऐवजी जिल्हाधिकारी यांचे निर्णयाविरोधात अपील आयुक्त यांचेकडे करता येईल अशी सुधारणा करणेत आली आहे.

जनतेतून सरपंच राजीनामा-

कलम २९ पोटकलम (२) मध्ये सरपंच सदस्याचा राजीनामा सात दिवसांच्या आत सचिवाकडे अग्रेषित करील. म्हणजे सरपंचाला सदस्याचा राजीनामा सात दिवसांपेक्षा अधिक काळ स्वत:कडे ठेवता येणार नाही. तसेच सभापती हे सरपंचाचा राजीनामा त्यांच्याकडे आल्यास तो सात दिवसात संबंधीत ग्रामपंचायतीच्या सचिवाकडे अग्रेषित करण्याची व्यवस्था करतील.

जनतेतून सरपंच अविश्वास ठराव कसा आणावा येथे वाचा

हे वाचले का?  Bandhkam Parvana Gram Panchayat ग्रामपंचायत मध्येच मिळणार बांधकाम परवानगी

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top