राज्यातील लॉकडाऊन उठणार पाच स्तरात उठणार आपला जिल्ह्यांची माहिती पहा

लॉकडाऊन
लॉकडाऊन
महाराष्ट्रातील लॉकडाउन उठला.

पहिलास्तरा मधे या जिल्ह्यात लॉकडाऊन उठणार

  • अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, यवतमाळ एकूण १० जिल्ह्याचा समावेश
  • सर्व प्रकारची दूकानं सुरू राहणार आहेत, त्यासाठी टायमिंगची अट नाही.
  • मॉल, थिएटर, नाट्यगृह, रेस्टॉरंट सुरू राहणार आहेत.
  • सरकारी कार्यालयात १०० टक्के, खाजगी कार्यालयात आवश्यक असल्यास १०० टक्के उपस्थित राहता येणार.
  • लग्न, सार्वजनिक समारंभ, बैठका, निवडणूका यावर बंधन नसणार आहेत.
  • सार्वजनिक ठिकाणं, मैदानं, बागा, भेटायच्या जागा, ओयो सगळं सुरू होणार आहे.
  • थोडक्यात या दहा जिल्ह्यात सगळं पहिल्यासारखं असेल.
  • पाचव्या स्तरातून या जिल्ह्यात प्रवेश करायचा असेल तर ई पास लागणार.

दुसरास्तरा मधे या जिल्ह्यात लॉकडाऊन उठणार

  • हिंगोली आणि नंदूरबार जिल्ह्यांचा समावेश.
  • रेस्टॉरंट, मॉल्स, सिनेमागृह ५० टक्के क्षमतेने सुरू ( या जिल्ह्यांमध्ये मॉल नाहीत पण परवानगी आहे)
  • बांधकाम क्षेत्रातील कामे, बसेस पुर्ण बैठक क्षमतेने सुरू.
  • जिम, सलून ५० टक्के क्षमतेने सुरू.
  • सार्वजनिक कार्यक्रम, लग्न, बैठका यांना हॉलच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १०० लोकांच्या उपस्थितीची परवानगी.
  • मयताच्या ठिकाणी कितीही गर्दी झाली तरी मर्यादा नाही.
  • पाचव्या स्तरातून या जिल्ह्यात प्रवेश करायचा असेल तर ई पास लागणार.
हे वाचले का?  तलाठी (Talathi) यांची कर्तव्ये जमीन महसूल अधिनियम १९६६

हे ही वाचा

तीसरा स्तर मधे या जिल्ह्यात लॉकडाउन उठणार

  • मुंबई आणि उपनगर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, गडचिरोली, उस्मानाबाद, पालघर, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम अशा १६ जिल्ह्यांचा समावेश.
  • अत्यावश्यक सेवेतील दुकानं रोज संध्याकाळी ४ वाजेपर्यन्त सुरू.
  • अत्यावश्यक सेवेत नसणारी दूकानं शनिवार, रविवार बंद इतर दिवशी ४ वाजेपर्यन्त सुरू राहतील.
  • मॉल्स, थिएटर, नाट्यगृह बंद राहतील.
  • रेस्टॉरंट ४ वाजेपर्यन्त ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. त्यानंतर पार्सल घेवून जा.
  • सार्वजनिक ठिकाण सकाळी ५ ते ९ पर्यन्त सुरू राहतील.
  • खाजगी कार्यालये ४ वाजेपर्यन्त सुरू.
  • संचारबंदी संध्याकाळी ५ नंतर लागू असेल.
हे वाचले का?  Private Hospital Corona Patients Bill | खाजगी हॉस्पिटल्स मधील कोरोना रूग्णावरील उपचार खर्च परत मिळणार |

चौथास्तर मधे या जिल्ह्यात लॉकडाउन उठणार

  • पुणे, बुलढाणा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग अशा ८ जिल्ह्यांचा समावेश आहे.
  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने ७ ते २ वाजेपर्यन्त.
  • अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने पुर्णपणे बंद राहतील.
  • खाजगी आणि शासकीय कार्यालये २५ टक्के क्षमतेने सुरू होतील.
  • कोणत्याही सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही.
  • सलून व जीम ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील पण AC लावायचा नाही.
  • लग्न २५ लोकांत आणि मयत २० लोकात उरकायचं.
  • संचारबंदीचे नियम लागू असतील.

पाचवा स्तर मधे या जिल्ह्यात लॉकडाउन उठणार

या स्तरात एकाही जिल्ह्याचा समावेश नाही, पण जर कोणत्याही जिल्ह्याची रुग्ण संख्या जर वेगाने वाढली तर त्या जिल्ह्याचा समावेश पाचव्या स्तरांमध्ये करण्यात येईल.

हे वाचले का?  Bhogwatdar Varg 2 Jamin भोगवटादार वर्ग-2 जमीन: संकल्पना, फायदे आणि उपयोग | माहिती असायलाच हवी |

आमचे लेख व व्हिडिओ पाहाण्यासाठी फॉलो करा : फेसबुक |YouTube | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम |

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top