ST Pravas Savalat एसटी महामंडळाचा महिलांसाठी मोठा निर्णय…एस टी प्रवासात 50 % सवलत

Mahila ST Pravas Savalat

ST Pravas Savalat महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच आपले एसटी महामंडळाने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना बस प्रवासात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आपण या लेखात याबद्दलची माहिती बघणार आहोत.

अधिकृत GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्याच्या सन 2023 24 चा अर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये 50 टक्के सवलत घोषित केली आहे. दिनांक 17 मार्च, 2023 पासून सर्व महिलांना राज्याच्या हद्दीपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस प्रवास भाड्यामध्ये 50% सवलत देण्यात येत आहे.

ST Pravas Savalat एसटी महामंडळ सूचना:

अधिकृत GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  • सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये 50% सवलत 17 मार्च, 2023 पासून देण्यात येत आहे.
  • भविष्यात राज्य परिवहन महामंडळाच्या ताब्यात नव्याने दाखल होणार्‍या सर्व प्रकारच्या बसेस करिता ही सवलत लागू राहील.
  • ही योजना महिला सन्मान योजना या नावाने संबोधण्यात येत आहे.
  • ही सवलत सर्व महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंत मर्यादित असेल.
  • शहरी वाहतुकीमध्ये महिलांना 50 % सवलत मिळणार नाही.
  • ज्या महिलांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे प्रवासाचे आगाऊ आरक्षण तिकीट घेतले आहे अशा महिलांना 50 टक्के सवलतीचा परतावा देण्यात येणार नाही.
  • सवलत अनुज्ञ केलेल्या दिनांक पूर्वीच्या आगाऊ आरक्षणावर केलेल्या प्रवासाचा परतावा देण्यात येणार नाही
  • सर्व महिलांना प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत असली तरी या योजनेतील जे प्रवासी संगणकीय आरक्षण सुविधा द्वारे, विंडो बुकींग द्वारे, ऑनलाईन मोबाईल ॲप द्वारे तिकीट घेतील, अशा प्रवाशांकडून सेवा प्रकार निहाय लागू असलेला आरक्षण आकार वसूल करण्यात यावा.
हे वाचले का?  Kanda Anudan Yojana कांदा अनुदानासाठी 20 एप्रिल पर्यंत अर्ज करण्याचे पणन महा संचालकांचे आवाहन

अधिकृत GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  • सर्व महिलांना प्रवास भाड्यात शासनाने 50% सवलत दिली असल्याने 50% प्रवास भाडे आकारले जाणार आहे.
  • 75 वर्षांवरील महिलांना अमृत जेष्ठ नागरिक योजनेनुसार 100% सवलत मिळेल.
  • 65 ते 75 या वयोगटातील महिलांना महिला सन्मान योजना हीच सवलत मिळेल.
  • पाच ते बारा या वयोगटातील मुलींना यापूर्वी प्रमाणेच 50 टक्के सवलत मिळणार आहे.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. Cotton Development Recruitment कापूस विकास संचालनालय, नागपूर येथे भरती सुरू!!!
  2. Delhi High Court Recruitment ‘दिल्ली उच्च न्यायालया’ मध्ये भरती सुरू, पदवीधरांना सुवर्णसंधी !!!
  3. Indian Post Bharti भारतीय पोस्ट मध्ये नवीन भरती सुरू, लवकर करा अर्ज…
  4. NPCIL Bharati March न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., पालघर मध्ये भरती सुरू!!!
हे वाचले का?  आमदार खासदार देणार शेतरस्ते करता अनुदान "मातोश्री ग्राम समृध्दी शेत/ पाणंद रस्ते योजना

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top