traffic Police वाहतूक पोलिसांना गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे का….?

traffic Police
वाहतूक पोलिसांना गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे का
वाहतूक पोलिसांना गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे का….?

traffic Police वाहतूक पोलिसांना गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे का….? नाही, वाहतूक पोलिसांना वाहन चालकाच्या गाडीची चावी काढण्याचा अधिकार नाही. ते तुमच्या चालू गाडीची चावी काढून घेऊ शकत नाही. ते तसे करत असतील तर तुम्ही त्यांची तक्रार करू शकता. पण त्यावेळी तुमचे वर्तन हे चांगले असले पाहिजे. 

traffic Police नाकाबंदीच्याा वेळी तपासणीसाठी पोलिसांना हात दाखवून वाहनचालकाला थांबविण्याचा अधिकार आहे. तसेच रस्त्यावर वाहन तपासणीच्या वेळी मोटार वाहन कायद्यानुसार वाहनाची सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. परंतु वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे चुकीचेच आहे. नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. मोटार वाहन अधिनियमातील कलमांचे/नियमांचे उल्लंघन केल्यास तो गुन्हा ठरतो. उदा.- 

  • विनाा सीटबेल्ट ड्रायव्हिंग करणे.
  • विना हेल्मेट दुचाकी चालविणे.
  • विना लायसन्स/परमिट ड्रायव्हिंग करणे.
  • वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यास.
  • विना इन्शुरन्स वाहन चालविणे.
  • वैध पोलुशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट (PUC) नसणे.
  • मद्यपान अथवा अंमली पदार्थांचे सेवन करुन गाडी चालविणे
  • अतिरिक्त प्रवासी वाहतूक करणे.

वाहतूक पोलिसांना गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे का व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  • संपूर्ण आयुष्यात एकदा तरी वाहतूक पोलिसांनी आपली गाडी अडवल्याचा अनुभव अनेकांना आला असेल. वाहतूक पोलिसांनी अडवले तरी जास्त चिंतेचे कारण नाही. परंतु एक सजग नागरिक म्हणून वाहतुकीचे नियम व अधिकार आपल्याला माहिती असायला हवेत. 
  • वाहतूकक पोलिसांनी तुमची गाडी अडवली व तुमच्याकडे दंडाची मागणी केली तर पोलिसांकडे चलन बुक किंवा ई-चलन मशीन असणे बंधनकारक आहे. पोलिसांकडे या दोन्हीपैकी एक जरी नसेल तर ते तुमच्याकडून दंड वसूल करू शकत नाही. 
  • वाहतूकक पोलिसांनी तुमची गाडी अडवल्यास सर्वप्रथम तुमची गाडी रस्त्याच्या बाजूला घ्या. नियमाप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन्स दाखवणे मात्र बंधनकारक असून ते सुपूर्द करण्याची आवश्यकता नाही. 
  • वाहतूक पोलिसांशी सहकार्य करावे. त्यांच्याशी हुज्जत घालणे टाळावे. जर कदाचित काही चूक झालीच तर ती पोलिसांना व्यवस्थित समजून सांगा. 
  • पोलिसांनी अनधिकृतपणे पैशाची मागणी केली तर ती पूर्ण करू नका. त्यांना चुकूनही लाच देण्याचा प्रयत्न करू नका.
  • जेव्हा पोलीस तुमची गाडी पकडतो तेव्हा त्याचा बक्कल नंबर व नाव नोंद करून ठेवा.
  • जर तुमची गाडी पकडणारा पोलीस जर उपनिरीक्षक किंवा त्यापेक्षा वरच्या पदावर असेल तर तुम्ही त्यांच्या सोबत तुम्ही केलेल्या चुकीबद्दल दंड भरून चुकीबाबत तडजोड करू शकता.
  • बक्कल नसल्यास पोलिसाला त्याच्या ओळ्खपत्रा विषयी विचारा. जर ओळखपत्र दाखवण्यास नकार दिल्यास तुम्ही पण कागदपत्रे देण्यास नकार देऊ शकता.
  • तुमची गाडी लायसन्स किंवा परवाना नसतांना चालवत असल्याचे आढळून आल्यास पोलीस तुमची गाडी ताब्यात घेऊ शकतात. गाडी नोंदणीकृत नसल्यास ती जप्तही करू शकतात. 
  • वैध पावतीशिवाय वाहतूक पोलीस तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स घेऊ शकत नाही. नियम तोडल्यास ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जाऊ शकते. 
  • तुम्ही गाडीमध्ये बसलेले असतांना पोलीस तुमची कार टो करू शकत नाही. तुमच्या गाडीमध्ये कोणी नसेल तरच त्यांना ती उचलून नेण्याचा अधिकार आहे.
  • जर तुमची गाडी पोलिसांनी एखाद्या गुन्ह्यामध्ये जप्त केली तर तुम्हाला पुढील 24 तासांत न्यायालयात चौकशीसाठी हजर राहणे बंधनकारक आहे.
  • ट्रॅफिक पोलिसांनी तुम्हाला काही त्रास दिल्यास तुम्ही त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करू शकता.
  • थोडक्यात वाहतूक पोलिसांशी गैरवर्तन न करता त्यांना शिस्तीत कागदपत्रे दाखवावीत. शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नये. परंतु वाहतूक पोलिसांनी आपल्या गाडीची चावी काढल्यास, आपल्यावर जबरदस्ती केल्यास किंवा विनाकारण मारहाण केल्यास ते नियमानुसार नाही. तुम्ही त्यांची रीतसर तक्रार करू शकता. तसेच घडलेल्या घटनेचा गुन्हा नोंद करु शकता.
हे वाचले का?  Death Will /मृत्युपत्र म्‍हणजे काय? चला समजून घेऊया!
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

वाहतूक पोलिसांना गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे का व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे वाचले का?  Namo Kisan Nidhi Yojana नमो किसान सन्मान निधी योजना...

1 thought on “traffic Police वाहतूक पोलिसांना गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे का….?”

  1. Pingback: Book Reading कोणत्या वयात कोणती पुस्तके वाचावीत.? - माहिती हवी

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top