मंडल निरीक्षक सर्कल (Circle) भाऊसाहेब यांची कर्तव्ये.

मंडल निरीक्षक
मंडल निरीक्षक
मंडल निरीक्षक

1. मंडल निरीक्षक सर्कल (Circle) हा, आपल्या मंडलातील तलाठ्यांना त्यांच्या सर्व कर्तव्याचे प्रशिक्षण देण्यात जबाबदार राहील. तलाठी सर्वनियमांचे व आदेशाचे पालन करीत असल्याबद्दल मंडल निरीक्षकाने खात्री करून घ्यावी व एखादे गंभीर उल्लंघन असल्यास त्यासंबंधी  प्रतिवेदन करावे.सर्व तलाठी आपापल्या मुख्यालय कायम वास्तव्य करीत असल्याचे पाहण्यास मंडल निरीक्षक जबाबदार राहील. एखादा तलाठी तसा राहत  नसल्यास, मंडल निरीक्षकाने त्या बाबतीतील आवश्यक त्या कार्यवाहासाठी तहसीलदाराला कळवावे.

4. जे तलाठी आपल्या कर्तव्यपालनात निष्काळजी किंवा दीर्घसूत्री आहेत किंवा जे अनारोग्य, वृद्धावस्था किंवा इतर कारणांमुळे आपल्या  कर्तव्याचे योग्य  रीतील  पालन  करण्यास  अयोग्य  आहेत असे मंडल निरीक्षकाला वाटते अशा तलाठ्यांची नावे त्याने कळवावीत.

5.तालुका अभिलेख कक्षामध्ये अभिलिखित करण्यासाठी अग्रेषित करणे आवश्यक असलेले आपले सर्व अभिलेख तलाठ्याने अग्रेषित केले  असल्याचे  पाहण्याच्या  दृष्टीने  मंडल  निरीक्षकाने  तलाठ्याच्या दफतराची तपासणी करावी.

6.  मंडल निरीक्षकाच्या प्रत्येक भेटीची किंवा तपासणीची नोंद, तलाठ्याच्या दैनंदिनीत व भेट,नोंद पुस्तकात त्याचप्रमाणे, त्याच्या स्वत:च्या दैनंदिनीतही घेण्यात यावी.

7. मंडल निरीक्षकाला, तपासणी व पर्यवेक्षण या विषयी त्याच्या मंडलातील तलाठ्याच्या बाबतीत पूर्ण शक्ती असतील.

8. सर्वसाधारणपण, मंडल निरीक्षकाने वर्षभरात आपल्या मंडलातील प्रत्येक गावाची संपूर्ण तपासणी करावी ; परंतु, मंडलाच्या आकारामुळे किंवा इतर कारणांमुळे, संपूर्ण वार्षिक तपासणी करणे शक्य नसेल तर, प्रत्येक वर्षी मंडल निरीक्षक आपल्या मंडलातील गावांची तपासणी पुरेशा संख्येने करीत  असल्याचे तसेच दोन वर्षाच्या कालावधीत प्रत्येक गावाची तपासणी पूर्ण करीत असल्याचे पाहण्यास तहसिलदार जबाबदार आहे.

9. मंडल निरीक्षकाने, तलाठ्याने ठेवलेल्या सर्व गाव नमुन्यांची तपासणी करावी व तलाठी अचूक मागणी करतो, जमीन महसूल देण्यास जबाबदार  असणाऱ्या व्यक्तींकडून ती वसूल करतो, वसुलीचे हिशेब योग्य रीतीने व अचूक ठेवतो व सामान्य प्रशासनाला आवश्यक असलेली माहिती अचूकपणे गोळा करतो याची खात्री करून घ्यावी.

10. जमीन महसूल व जमीन महसूल म्हणून वसुलीयोग्य असलेल्या इतर रकमा गोळा करण्यावर मंडल निरीक्षकाने लक्ष ठेवावे व अनधिकृत थकबाकी शिल्लक राहात नसल्याची खात्री करून घेण्याच्या दृष्टीने अशा रकमा गोळा करण्याच्या कामी तलाठ्याला सहाय्य करावे व वसुलीच्या रकमांचा भरणा कोषागारता योग्य रीतीने केला जात असल्याबद्दल खात्री करून घ्यावी.

यासाठी, त्याने तोंडी तपासणी करून व खातेवहीशी ताडून पाहून पुरेशा पावत्यांची चाचणी दाखल तपासणी करावी ; त्याचप्रमाणे पावती आणि रोख  पुस्तक यावरून चलान तपासून वसूल करण्यात आलेल्या सर्व रकमा योग्य रीतीने कोषागारता जमा करण्यात आल्याची खात्री करून घ्यावी.

त्याने, तलाठ्याजवळ काही रक्कम असल्यास ती सत्वर कोषागारता जमा करायला लावावी. तसेच, आकारण्याचे पुनरीक्षण करण्यासाठी व भाडेपट्टयाचे नवीनीकरण करण्यासाठी वेळीच कार्यवाही केली जात असल्याचेही त्याने पहावे.

11.  

  • (अ) प्रत्येक फेरफार नोंद योग्यरीतीने व अचूकपणे करण्यात येत असल्याची खात्री करून घेण्यासाठी मंडल निरीक्षकाने प्रत्येक फेरफार नोंद तपासून  पहावी व फेरफारांच्या नोंदवहीतील अशा प्रत्येक फेरफारावर आद्याक्षरी करावी. तथापि, विवादग्रस्त नसलेल्या नोंदी त्याने नियमानुसार प्रमाणित कराव्यात.
  • (ब) तलाठी, फेरफारांच्या नोदवहीत फेरफार नोंद केल्यावर लगेच गाव नमुना सात मध्ये पेन्सिलीने त्यासंबंधीची घेत असल्याची तसेच, असा फेरफार प्रमाणित करण्यात आल्यावर लगेच ती नोंद शाईने करीत असल्याचीही मंडल निरीक्षकाने खात्री करून घ्यावी.
  • (क) सर्व हितसंबधित व्यक्तींना फेरफाराची लेखी सूचना देण्यात येत असल्याची तसेच, फेरफाराची संपूर्ण प्रत गावाच्या चावडीत प्रसिध्द करण्यात येत असल्याची मंडल निरीक्षकाने खात्री करून घ्यावी. त्याने, तपासणीचे काम झाल्यानंतर, अशाप्रकारे प्रसिध्द करण्यात आलेल्या नोटिशीवर योग्य तो शेरा द्यावा.
  • (ड) मंडल निरीक्षक हाच जेव्हा मंडल अधिकारी असेल तेव्हा त्याने सर्व फेरफार नोंदी अनुप्रमाणित कराव्यात व सर्व वादग्रस्त प्रकरणे व वारसा प्रकरणे निकालात काढावीत.

नव-नवीन माहिती

12. मंडल निरीक्षकाने, जमिनीच्या सर्व तुकड्यांची फेरफारांच्या नोंदवहीत योग्यरीतीने नोंद घेण्यात आली असल्याची तसेच संबंधीत व्यक्तींना विहित नमुन्यातील नोटीसा देण्यात आल्या असल्याची खात्री करून घ्यावी.

13. संबंधित कुळवहिवाट कायदा व मुंबई विखंडन प्रतिबंध व धारण जमिनींचे एकत्रीकरण अधिनियम यांमधील उपबंधाचे उल्लंघन करून,केलेल्या  व्यवहारांची  फेरफारांच्या  नोंदवहीत  योग्यरीतीने नोंद घेऊन आवश्यक त्या पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक ती प्रतिवृत्ते तहसिलदाराला सादर करण्यात येत असल्याची मंडल निरीक्षकाने खात्री करून घ्यावी.

हे वाचले का?  मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना पशुपालकांच्या दारापर्यंत पशु आरोग्य सेवा उपलब्ध होणार.

14. मंडल निरीक्षक गावात आल्याबरोबर भेगवटया खालील व बिनभोगवट्या खालील भूमापन क्रमांक पद्धतशीरपणे तपासणीसाठी निवडली, त्यामुळे  प्रत्येक वर्षी पिकांच्या विविध जाती व पाच वर्षामध्ये आळी पाळीने प्रत्येक क्षेत्र तपासणीखाली येईल.

हे तपासणीचे काम पार पाडीत असताना मंडल निरीक्षकाने खालील गोष्टींची खात्री करून घ्यावी.

  • भोगवटदार व कुळे यांची नावे प्रत्यक्ष कब्जाशी जुळणारी आहेत ;
  • उपविभागांचा हिशेब योग्य रीतीने ठेवलेला आहे ;
  • एकाच ओळीत घरे बांधण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या नियमांची योग्य रीतीने अंमल बजावणी करण्यात आली आहे ;
  • भू प्रधान, पट्टे व अकृषिक परवानगी यासंबंधीच्या शर्तीचे योग्य रीतीने पालन करण्यात येत आहे ;
  • अतिक्रमणे व अनधिकृत अकृषिक वापर यांचा तपास लावण्यात आला आहे व त्यासंबंधी प्रतिवेदन पाठवण्यात आले आहे ;
  • नकाशे, गावाची नकाशा पुस्तके व अधिकार अभिलेख यांमधील विसंगतीची प्रकरणे दर्शविणारी नोंदवही अचूकपणे व अद्ययावत ठेवण्यात आली असून ती शेतातील प्रत्यक्ष वस्तुस्थितीशी जुळती आहे ;
  • विशेषत: सुधारित बियाणी, दुबार पिके, जलसिंचत पिके, पीक मिश्रणे व पडीक जमिनी यांच्या संदर्भात पिकांची विवरणपत्रे काळजीपूर्वक व अचूकपणे संकलित करण्यात आली आहेत,
  • सीमा व भूमापन चिन्हे चांगली दुरूस्त केलेली आहेत व नादुरूस्त असल्यास ती योग्य रीतीने दुरूस्त करण्यासाठी सत्वर कार्यवाही करण्यात आली  आहे ;
  • गावाचा नकाशा, पिकांचे विवरण पत्र व गाव नमुना चौदा (पाणी पुरवठ्याच्या साधनांची नोंदवही) यांमध्ये पाणीपुरवठ्‌याची साधने योग्य रीतीने  दर्शवण्यात आली आहेत ;
  • मळईच्या जमिनी व पाण्याने वाहून गेलेल्या जमिनी यासंबंधीची प्रकरणे यथोचित रीतीने कळवण्यात आली आहेत ; व
  • कलिंगडाचे वाफे व एकसाली पट्टे यांच्या सारख्या लिलाव योग्य बाबी कळवण्यात आल्या आहेत.

15. तगाई उपयुक्त रीतीने व प्रामाणिकपणे खर्च करण्यात आली असल्याची, त्यासंबंधी अधिकार अभिलेखात नोंद करण्यात आली असल्याची, तसेच  तगाई देण्या संबंधीच्या शर्तीचे योग्य प्रकारे पालन करण्यात आले असल्याची खात्री करून घेण्याच्या दृष्टीने मंडल निरीक्षकाने प्रत्येक तगाई कामाची  पाहणी करावी. अप्रामाणिकपणाचे व शर्तीचा भंग करणारे असे कृत्य घडले असल्यास कार्यवाहासाठी त्याने तहसीलदाराला ताबडतोब कळवावे. 

16. मंडल निरीक्षकाने गावाच्या त्याचप्रमाणे तालुक्याच्या अभिलेख कक्षातील गावाचे नकाशे कमजास्ती पत्रकाच्या बरोबर असणाऱ्या रूपरेषेनुसार  दुरूस्त करावे व त्यांच्या अचूकपणाबद्दल तो जबाबदार राहील.

17.  मंडल निरीक्षकाने वक्तशीरपणाने व अचूकपणे पिकांचे पूर्वानुमान प्रतिवृत्त सादर करावे, गावातील पिकांची आणे वारी तयार करण्यासाठी मंडल  निरीक्षकाने सहाय्य करावे व या प्रयोजनार्थ आवश्यक असतील तितके पीक कापणी प्रयोग करावेत.

18.मंडल निरीक्षकाने आपल्या तालुका कार्यालयाला, व जेव्हा विशेष रीत्या निदेशित करण्यात येईल तेव्हा जिल्हा निरीक्षक, जमीन महसूल यांना हंगाम व पीक प्रतिवृत्ताच्या संकलनाच्या कामी सहाय्य करावे.

19. मंडल निरीक्षकाने आपल्या कार्यक्षेत्रामधील बाबींच्या संबंधात केवळ काय चू आहे तेवडेच दाखवून न देता चुकीच्या गोष्टी दुरूस्त कराव्या. चुका  शोधून काढणे, गैरवर्तवणूक उघडकीस आणणे व सुधारणे, तसेच अननुभवी तलाठ्यांना वेळेवर सूचना मिळत असल्याचे पहाणे हा त्याच्या निरीक्षणाचा दुहेरी उद्देश आहे.

20. जेव्हा उपविभागीय अधिकार्‍याचे शिबिर त्याच्या मंडलात येते तेव्हा ते शिबीर परत जाईपर्यंत मंडल निरीक्षकांनी उपविभागीय अधिकार्‍यांच्या प्रत्यक्ष आदेशानुसार काम करावे व गावाच्या तपासणीच्या वेळी आवश्यक असेल तेव्हा त्यांच्याबरोबर रहावे.

21. टंचाईच्या काळात मंडल निरीक्षक हा पदसिद्ध टंचाई निवारण निरीक्षक असेल. म्हणून, येणार्‍या संभाव्य आपत्तीची चिन्हे वेळीच लक्षात यावी, व  आपल्या मंडलातील परिस्थिती तत्परतेने कळवता यावी यासाठी हंगामावर लक्ष ठेवणे हा त्याच्या कर्तव्यातील अत्यावश्यक भाग राहील.

22. मंडल निरीक्षकाने आपल्या मंडळातील गावात घडून येणार्‍या पूर, आग, धुके, गारपीट, टोळधाड व माणसांचे किंवा गुरांच्या मधील साथीचे रोग,   पिके बुडणे यासारख्या नैसर्गिक  इतर आपत्तिबाबत तहसिलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांना कळवावे.

23. मंडल निरीक्षकाने, न्यायालयात पुरावा देण्यासाठी गुन्ह्याचे स्थळ दर्शवणारा नकाशा तयार करावा.

24. 1 जुलै ते 15 सप्टेंबरपर्यंतचा कालावधी वगळून इतर वेळी मंडल निरीक्षकाने दर पंधरवड्याला पुढील पंधरवड्यातील प्रत्येक दिवशी आपण कोणत्या गावात काम करीत असण्याची शक्यता आहे हे दर्शविणारी कार्यक्रम जिल्हा निरीक्षक, भूमि अभिलेख व तहसिलदार यांना पाठवावा. या कार्यक्रमातील प्रत्येक बदल जिल्हा निरीक्षक, भूमि अभिलेख व तहसिलदार यांना त्वरित कळवावा.

25. मंडल निरीक्षकाने उघाडीच्या हंगामात (ऑक्टोबरापासून जूनपर्यंत) एका महिन्यात पंधरा रात्रीच्या मुक्कामासह 20 दिवस दौरे काढावेत व जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सहा रात्रींच्या मुक्कामासह एकूण 30 दिवसापेक्षा कमी नाहीत इतके दिवस दौरे काढावेत. एखाद्या महिन्यात या प्रमाणानूसार  दौरे न झाल्यास ती तुट त्याने पुढील महिन्यात भरून काढावीत.

26.

  • मंडल निरीक्षकाने विहित नमुन्यात दैनंदिनी ठेवावी व ती दर महिन्याला तहसिलदाराला सादर करावी तहसिलदारने  स्वत: च्या शेऱ्यासह ती जिल्हा निरीक्षक, भूमि अभिलेख यांच्यामार्फत उपविभागीय अधिकार्‍यांकडे पाठवावीत. उपविभागीय अधिकार्‍याने स्वत:च्या शेऱ्यासह ती तहसिलदारमार्फत मंडल निरीक्षकाला परत पाठवावी.
  • शेऱ्यासह दैनंदिनी परत मिळाल्यावर, मंडल निरीक्षकाने, तहसिलदार, जिल्हा निरीक्षक, भूमि अभिलेख व उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या शेऱ्यांची आपल्या दैनंदिनीच्या कार्यालय प्रतीत नक्कल करून घ्यावी व नंतर शेऱ्यासह मिळालेली दैनंदिनी अभिलेखासाठी तहसीलदारांकडे परत पाठवावी.
  • कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने निरीक्षणासाठी भेट दिली असतांना मंडल निरीक्षकाने आपल्या दैनंदिनीची कार्यालय प्रत त्याच्या अवलोकनार्थ दाखल करावी.

27. आवक जावक पत्र व्यवहारासाठी मंडल निरीक्षकाने विहित नमुन्यातील एकच नोंदवही ठेवावी व 1 ऑगस्ट रोजी तालुक्याच्या ठिकाणी त्या नोंदवहीच्या पुष्ठांवर शिक्का मारून क्रमांक टाकावेत.

28. मंडल निरीक्षकाने अनुसूचि असलेली एक परिपत्रक फाईल ठेवावी.

29. मंडल निरीक्षकाने आपल्या प्रभारा खालील सर्व शासकीय मालमत्तेची नोंदवही ठेवावी व ती तपासणीसाठी व सहीसाठी कोणत्याही निरीक्षक  अधिकार्‍याला सादर करावी.

30. मंडल निरीक्षकाने, त्याला हाताळाव्या लागतील अशा रकमांचा हिशेब ठेवण्यासाठी विहित नमुन्यातील एक रोख पुस्तक ठेवावे.

31. मंडल निरीक्षकाने, विहित नमुन्यातील, पोष्टाच्या सरकारी तिकीटांची नोंदवही ठेवावी.

32. मंंडल निरीक्षकाने आपल्या मंडलाच्या मुख्यालयात रहावे.

33. मंडल निरीक्षकाने सर्व अधिनियम, नियम व स्थायी आदेश याद्वारे त्याच्याकडे सोपवलेली सर्व कर्तव्य व कार्ये पार पाडावीत व आपली कर्तव्य पार पाडीत असतांना, त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.

हे वाचले का?

हे वाचले का?  बैलगाड्या शर्यती राज्यात पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठीयेथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top