सरपंच जबाबदार्‍या व कर्तव्ये | Sarpanch Kartavya Jababdari Marathi

सरपंच जबाबदार्‍या व कर्तव्ये

भारताचा ग्रामीण गावे हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे, याच गावांचा विकास करण्याची जबाबदारी असते ती म्हणजे सरपंचावर आजच्या लेखात आपण बघणार आहोत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, कलम ३८ नुसार सरपंच जबाबदार्‍या व कर्तव्ये यांची सविस्तर माहिती.

Sarpanch Kartavya Jababdari सरपंच जबाबदार्‍या व कर्तव्ये:

ग्रामपंचायतीच्या सभा बोलावणे व अध्यक्ष म्हणून सभेचे कामकाज पार पाडणे. ग्रामसभा बोलविणे व त्याचे अध्यक्षपद भूषविणे. सभेमध्ये पारीत केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे. ग्रामपंचायतीचे अभिलेख सुरक्षित ठेवण्यासाठी नियंत्रण करणे.

Adoption law दत्तक अधिनियमातील महत्त्वाची माहिती…..!!

ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मालमत्ता सुरक्षित असल्याबाबत ची खात्री करणे. जमाखर्चाचे विवरणपत्र व अंदाजपत्रक तयार करणेची व्यवस्था करणे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम ४९ नुसार स्थापन करण्यात येणाऱ्या ग्रामविकास समित्यांचे पदसिध्द अध्यक्षपद भूषविणे.

सरपंच जबाबदार्‍या व कर्तव्ये ग्रामपंचायतीकडे जमा करणे. आलेल्या रकमा व त्यातून काढण्यात आलेले धनादेश यांस सरपंच व ग्रामसेवक संयुक्त जबाबदार राहतील. ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे व ते मासिक सभा आणि ग्राम सभेपुढे मान्यतेसाठी सादर करणे. सूक्ष्म नियोजना द्वारे गावाचा विकास आराखडा तयार करणे.

हे वाचले का?  ग्रामसभा आमचा हक्क आमचा आवाज! लोकशाही नको आता लोकसहभाग शाही हवी..!

Panchayat Samiti जाणून घेऊया पंचायत समिती बद्दल

ग्रामसभा व ग्रामपंचायतीच्या मदतीने सर्व योजनांची अंमलबजावणी करणे. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे. गाव पातळीवरील विविध संस्थांशी समन्वय साधून कामांचे नियोजन करणे.

गावातील वंचित घटकांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांना सहकार्य करणे. शासकीय योजनांचा लाभ वंचित घटक, निराधार, विधवा, परित्यक्ता, अपंग व्यक्तींना मिळवून देणे. महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ नुसार आर्थिक व्यवहार करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.

ग्रामपंचायत मध्येच मिळणार बांधकाम परवानगी

ग्रामपंचायतीस गरज भासेल तेव्हा ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार कर्मचार्‍यांची नेमणूक करणे. निकडीच्या वेळी तात्पुरत्या स्वरुपात रोजंदारीवर कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ४५ मधील ग्राम सूचीनुसार सर्व कामे करण्याची जबाबदारी सरपंचाची आहे.

दप्तर दिरंगाई कायदा 2006

हे वाचले का?  सरकारी कर्मचारी अधिकारी कार्यालया तक्रार अशी तक्रार केली तरच ग्राह्य धरणार.

सरपंचानी आपली कर्तव्ये पार पाडण्यास कसूर केल्यास पदावरून दूर करता येईल. सरपंच हा लोकसेवक या नात्याने सर्व जबाबदाऱ्या पार पाडील. स्वतःच्या सहीने उत्पन्नाचे प्रमाणपत्र देईल.

ग्रामपंचायतींचे कार्यकारी प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडेल. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे व सदस्यांचे प्रवास भत्ता व देयके मंजूर करण्याचे अधिकार सरपंचास आहेत.

पोलीस पाटील (Police Patil) यांना निवडणूक लढवता येते का ?

हे वाचले का?

हे वाचले का?  Ration Card Type शिधापत्रिका/ रेशनकार्ड चे प्रकार: पिवळे, केशरी आणि सफेद

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top