MCGM Bharti बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे मोठी भरती निघालेली असून, यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.
या पदांनुसार पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
MCGM Bharti तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल.
त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण रिक्त पदे : 652
रिक्त पदाचे नाव : परिचारिका / Staff Nurse
MCGM Bharti आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार हा मान्यताप्राप्त मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा.
2 . उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने विहित केलेला जनरल नर्सिंग अँड मिळवायफरी (General Nursing & Midwifery) हा अभ्यासक्रम तीन किंवा साडेतीन वर्षांचा अभ्यास क्रम पूर्ण उत्तीर्ण झालेला असावा.
3. उमेदवार हा महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडून नोंदणीकृत असावा व नोंदणीचे नूतनीकरण अद्ययावत केलेले असावे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
4. उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका असलेल्या मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
5. उमेदवार डी.ओ.ई.ए.सी.सी. सोसायटीचे किंवा ‘ओ’ स्तर किंवा ‘ए’ स्तर किंवा ‘बी ‘स्तर किंवा ‘सी’ स्तरावरील प्रमाणपत्रे, महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे एम एस सी आय टी किंवा जी इ सी टी चे प्रमाणपत्र धारक असावा .
वयोमर्यादा
- अर्ज सादर करावयाच्या दिनांक म्हणजेच 21/03/2023 रोजी खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षे व मागासवर्गीयांसाठी 18 ते 43 वर्षे पर्यंत.
2. अगोदरच बृहन मुंबई महापालिकेच्या कायमसेवेत असल्यास उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा नाही.
उमेदवारांकरीता सूचना
1) या पदांच्या सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि.08/03/2023 ते दि.21/03/2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
2) भरती प्रक्रियेतील सर्व सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील.
3) ज्या उमेदवारांनी यापूर्वी त्यांचे नाव रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे सेवायोजन कार्यालय / समाज कल्याण / आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी/ जिल्हा सैनिक बोर्ड / अपंग कल्याण कार्यालय इ. कार्यालयात नोंदविले आहे,
अशा उमेदवारांना देखील स्वतंत्ररित्या अर्ज करणे आवश्यक राहील. तसेच प्रकल्पग्रस्त, अंशकालीन पदवीधर इत्यादी समांतर आरक्षणांतर्गत येणाऱ्या उमेदवारांनी देखील स्वतंत्ररित्या अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
4) उमेदवाराने अर्ज संपूर्णत: अचूक भरावा. पत्रव्यवहाराचा पत्ता पिनकोडसह अचूक असावा. अर्जातील संपूर्ण माहिती पुन्हा तपासून पहावी. उमेदवारांनी त्यांच्या अर्जाची छायांकित प्रत पुढल कार्यवाहीसाठी स्वत: जपून ठेवावी.
5) अर्जामध्ये उमेदवाराने पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज भरतांना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास त्यामुळे भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
याबाबत उमेदवारास तक्रार/निवेदन करता येणार नाही. अर्ज सादर केल्यानंतर अर्जात भरलेली माहिती उमेदवारांना बदलता येणार नाही. जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी व शैक्षणिक अर्हता व मागणीनुसार आरक्षण, वयोमर्यादा शिथिल करण्याबाबतच्या अटी तपासूनच उमेदवारांनी अर्ज भरावा.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र) असणार आहे.
अर्ज पद्धत : ऑफलाईन असणार आहे.
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 21 मार्च 2023 असणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड नं. 07, (प्रशिक्षण हॉल), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग , (ऑथोर रोड ). चिंचपोकळी (पश्चिम ), मुंबई – 400011.
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- CPCB Bharti ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’ मध्ये विविध पदांसाठी मेगा भरती सुरू…
- PMC Bharti पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी मेगा भरती सुरू !!!
- MPSC Recruitment March MPSC मध्ये नवीन जागांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज!!!
- Gail India Bharti गेल इंडिया लिमिटेड मध्ये नवीन पदभरती सुरू !!!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.