PM Crop Insurance प्रधानमंत्री पिक विमा योजना 2016 पासून राबविण्यात येत आहे. विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. पुढच्या तीन वर्षांसाठी शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पिक विमा काढता येणार आहे.
यासाठी पीकनिहाय विमा रक्कम सुरक्षित करण्यात आली आहे. जर शेतकऱ्याचे शंभर टक्के नुकसान झाले, तर त्या शेतकऱ्यास कापसासाठी हेक्टरी 52 हजार रुपये तर सोयाबीन साठी 55 हजार रुपयांचा विमा मिळणार असल्याचे कृषी विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.
पिकनिहाय संरक्षित विमा रक्कम येथे पहा
2023 24 यावर्षी ही योजना बीड पॅटर्न आधारित राबवली जाणार आहे. म्हणजेच विमा कंपनीवर नुकसान भरपाई चे दायित्व हे अधिकाधिक असेल. म्हणजेच एकूण 110 टक्क्यांपर्यंत नुकसान भरपाईचे दायित्व हे विमा कंपनीवर असणार आहे. यापेक्षा जास्त असणारी नुकसान भरपाई राज्य शासन देणार आहे. तर नुकसान भरपाई एकूण विमा हप्त्याच्या 80 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर विमा कंपनी एकूण हप्त्याच्या वीस टक्के रक्कम स्वत:कडे नफा म्हणून ठेवेल आणि उर्वरित रक्कम राज्य शासनाला परत करणार आहे.
पिकनिहाय संरक्षित विमा रक्कम येथे पहा
PM Crop Insurance पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेतील सहभाग ऐच्छिक असणार आहे. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पिक विमा पोर्टल वरती नोंदणीकृत भाडेकरार अपलोड करणे आवश्यक आहे. त्यासाठी अंतिम मुदत ही 31 जुलै असणार आहे. सर्व पिकांसाठी जोखीम स्तर हा 70 टक्के आहे. भरावयाचा विमा हप्ता सर्व पिकांसाठी प्रति अर्ज एक रुपया आहे. मागच्या सात वर्षांमध्ये सर्वाधिक उत्पादनाची पाच वर्षांचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचा जोखीम स्तर विचारात घेऊन क्षेत्रातील अधिसूचित पिकाचे उंबरठा उत्पादन निश्चित केले जाणार आहे.
पिकनिहाय संरक्षित विमा रक्कम येथे पहा
एक रुपया भरून पिक विमा योजनेत शेतकरी सहभागी होऊ शकतात. त्याची जी पोचपावती असेल ती शेतकऱ्यांना जपून ठेवावी लागणार आहे. कॉमन सर्विस सेंटर, आपले सरकारच्या मदतीने शेतकरी पिक विमा योजनेत सहभागी होऊ शकतात किंवा शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज करता येईल.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- 1 rupaya pik vima १ रुपया भरून शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर.
- buying seeds pesticides and fertilizers बियाणे, खते खरेदी करायची आहेत, फसवणूक टाळण्यासाठी ही काळजी घ्या….!!!!
- PM Kisan Yojana Update प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपध्दतीत सुधारणा करणेस मान्यता देण्याबाबत
- Salokha Yojana शेत जमिनीचे वाद मिटवणारी शासनाची अनोखी योजना.. जाणून घेऊया काय आहे योजना..!!!
- Magel Tyala shettale मागेल त्याला शेततळे योजना अर्ज सुरू | असा करा अर्ज | पहा संपूर्ण माहिती
- Krushi Mitra Karj Yojana कृषी मित्र कर्ज योजना शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणार कर्ज…..!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा