राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजना ची सुरुवात केंद्र शासनाच्या १४ नोव्हेंबर १९९५ च्या शासन निर्णयानुसार झाली.
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना निकष
- राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना या योजनेत कुटुंबाच्या एकूण उत्पन्नात ज्याच्या उत्पन्नाचा वाटा मोठा असेल अशा प्रमुख कमावत्या स्त्री / पुरुषाचा मृत्यू झाल्यास त्या कुटूंबाला या योजनेचा लाभ मिळेल.
- कुटुंबातील मृत्यू पावलेल्या कमावत्या स्त्री / पुरुषाचे वय १८ ते ६४ वर्ष या वय मर्यादेत असावे.
- लाभ घेणारे कुटुंबाचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीत असावे.
- या योजनेचा लाभ मृत्यू पावलेल्या स्त्री / पुरुषाच्या विधुरास/ विधवेस, अज्ञान मुलांना अविवाहित मुलींना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या आई-वडिलांना मिळेल. तसेच अविवाहित प्रौढांचे अज्ञान भाऊ बहीण यांना लाभ मिळेल.
- राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेचे लाभार्थी मंजूर करण्याचे अधिकार २३/०६/१९९८ च्या शासन निर्णयानुसार संबंधीत तालुक्याचे तहसिलदार यांना देण्यात आले आहेत.
- सदर योजनेचा लाभ देताना सर्पदंशामुळे व आत्महत्येमुळे घडलेले मृत्यू देखील अनैसर्गिक मृत्यू म्हणून ग्राह्य धरुन संबंधीत लाभ देण्याबाबत १२/०६/१९९८ च्या शासनाच्या पत्रानुसार कळविण्यात आलेले आहे.
- ३१ ऑगस्ट १९९८ च्या शासन निर्णयानुसार दारिद्रय रेषेखालील कुटुंब प्रमुख कमावती स्त्री अथवा पुरुष व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मृताच्या लाभार्थी कुटुंबास २०,०००/- रु. लाभ मंजूर करावा. व मयत व्यक्ती ही कुटुंबातील आर्थिक उत्पन्नाचा सर्वात मोठा वाटा असणारी व्यक्ती असावी.
- सदर योजनेचा अर्ज मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यापासून एक वर्षाच्या आत तहसील कार्यालयात सादर केलेला असावा.
- लाभ घेणारे कुटुंब दारिद्र्य रेषेखाली असावे व मयत व्यक्तीचे नावे कुटुंब प्रमुख म्हणून दारिद्र्य रेषेचे गट विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र दिलेले असावे.
- लाभ घेणा-या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १५,०००/- रु. च्या आत असावे.
नवनवीन माहिती
- How to Improve CIBIL Score सीबील स्कोर कसा सुधारावा?
- Agristack ॲग्रिस्टॅक योजना महाराष्ट्रात राबविण्यास मान्यता
- Maharashtra Election 2024 या तारखेला होणार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक | निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर |
- PM Internship Scheme तरुणांना मिळणार प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपये |
- Cabinet Decisions Today मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अर्ज मंजूर करण्याची पद्धत
- दारिद्रय रेषेखालील यादीत नाव असलेल्या एखाद्या कमावत्या १८ ते ६४ वयोगटातील कमावत्या स्त्री / पुरुषाचा मृत्यू झाल्यास मृत्यू झाल्याच्या दिनांकापासून एक वर्षाच्या आत मयताच्या पत्नीने / पतीने अर्ज केला पाहीजे.
- अर्जासोबत अर्जदाराने तलाठी / मंडळ अधिकारी यांचे १५,०००/- रु. चे त्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न असल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडावे.
- मयताचे नाव दारिद्रय रेषेखालील गटविकास अधिका-याचे प्रमाणपत्र असावे.
- मयताचे वयाबाबत पुरावा मतदानाचे ओळखपत्र / मतदार यादीतील प्रत/ ची साक्षांकित प्रत
- रहिवाशी बाबत शिधापत्रिका / लाईट बोल / घरपट्टी जोडावी.
- मयत व्यक्ती मृत्यू पावल्या बाबतचे ग्रामसेवक / मुख्याधिकारी यांचे मृत्यूचे प्रमाणपत्र जोडलेले असावे.
- लाभार्थी अर्जासोबत शपथपत्र जोडावे
- लाभार्थ्यांचा अर्ज मंजूर करताना मयताचे नाव दारिद्रय रेषेखालील यादीत आहे काय? याबाबत मंजूर करणा-या अधिकारी यांनी मूळ यादी तपासून घ्यावी तसेच मयताचे मृत्यूची नोंद असलेले मूळ अभिलेख सुद्धा तपासून घेतल्यानंतरच अर्ज मंजूर करावा.
- अर्ज मंजूर केल्यानंतर लाभार्थ्यास १०,०००/- रु. ची रक्कम धनादेशाच्या स्वरुपात देण्यात यावी व लाभ देताना संबंधीत तलाठी / ग्रामसेवेका समक्ष धनादेश देण्यात यावा.
हे वाचले का?
- Mediclaim मध्ये PPE Kit & Biomedical waste परतावा देणे बंधनकारक
- PF खातेदारांना मिळणार 7 लाखांचा विमा, EPFO Members Insurance
- Ambulance चालक करत असलेली लुट आता थांबणार | Ambulance Rate Chart |
- ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? चला समजून घेऊया..!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील क्लिक करा