लोकशाही दिन कामचुकार अधिकारी यांना धडा शिकवण्याचा दिवस..!

लोकशाही दिन

    लोकशाही दिन आवश्यकता सर्वसामान्य जनता आपल्या अडचणी शासकिय यंत्रणेपुढे मांडण्यासाठी लोकशाही दिन शासन स्तरावर सरू करण्यात आला आहे.

सर्वसामान्य जनता आपल्या अडचणी वारंवार शासकिय यंत्रणेपुढे मांडत असतात. परंतु त्यावर निर्णय घेणारे अधिकारी व कर्मचारी बऱ्याच वेळी बैठका, सभा, दौरे, इत्यादी कारणामुळे जनतेसाठी खात्रीने उपलब्ध होऊ शकत नाहीत.

निश्चित दिवशी शासकिय यंत्रणा जनतेची गा-हाणी ऐकून घेण्यासाठी व त्याची सोडवणूक करण्यासाठी तत्पर राहील याकरिता प्रभावी उपाय योजना करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील परिपत्रक क्र.प्रसुधा१०९९/सीआर२३/९९/१८अ, दिनांक २९/डिसेंबर १९९९ अन्वये लोकशाही दिनाची सुरुवात करण्यात आली.

जिल्हयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा पहीला सोमवार लोकशाही दिन म्हणून तसेच सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी लोकशाही दिन लोकशाही दिना करिता राखुन ठेवण्यात येतो.

सदर लोकशाही दिनात जनतेच्या तक्रारींचे निवारण झाले नाही तर जनतेला न्याय मिळण्यासाठी शासन परिपत्रक क्र.प्रसुधार ००१/प्र.क्र.७०/२००१/१८अ, दिनांक १०/११/२००९ अन्वये मंत्रालय स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येते.

स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तात्काळ निकाली निघावेत व सर्व तक्रारींचे निवारण जलद गतीने होण्यासाठी शासन परिपत्रक क्र.महालो/१००७/२१/प्र.क्र.५३/०७/१८अ, दिनांक ७ नोव्हेंबर २००७ अन्वये.

बूहन्मुंबई, पुणे व नागपुर या महानगरपालिका प्रमाणेच उर्वरित सर्व महानगरपालिका मध्ये पहिल्या सोमवारी महानगरपालिका लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.

त्यानंतर जनतेच्या समस्या तालुका स्तरावर सोड विण्याच्या दृष्टीने या सदर कार्य पद्धतीत सुधारणा करून सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी/अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकिय यंत्रणेकडून सोडवणुक करण्यासाठी एक प्रभावी उपाय योजना म्हणून शासन परिपत्रक क्र.प्रसुधा२०११/प्र.क्र.१८९/११/१८अ, दिनांक २६ सप्टेंबर २०१२ अन्वये “लोकशाही दिन” हा तालुकास्तरावर सुध्दा राबवण्यात येत आहे.

हे वाचले का?  No work Pendency सात दिवसांत अर्ज/फाइल वर काम होणार नाही तर अधिकारी यांच्यावर कारवाई होणार महाराष्ट्र सरकारचा निर्णय
लोकशाही दिन

वरिल प्रमाणे प्रत्येक स्तरावर “लोकशाही दिन” राबविण्यात येतो. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास, त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी म्हणजे मंगळवारी “लोकशाही दिन” घेतला जातो.

लोकशाही दिनाचे अध्यक्ष :- 

  • तालुका लोकशाही दिन –                         तहसीलदार
  • जिल्हा लोकशाही दिन –                         जिल्हाधिकारी
  • महानगरपालिका लोकशाही दिन –         म.न.पा.आयुक्त 
  • महानगरपालिका लोकशाही दिन –         म.न.पा.आयुक्त
  • विभागीय लोकशाही दिन-                     विभागीय आयुक्त
  • मंत्रालय लोकशाही दिन –                       मा मुख्यमंत्री महोदय

दिन आयोजित करण्याचे स्थळ व वेळ : 

वरील सर्व स्तरांवरील लोकशाही दिन संबंधित स्तरावरील मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी १०,०० वाजता आयोजित करण्यात येतात. तालुक्यात प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तहसिलदार यांचे कार्यालयात लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. 

अर्ज स्विकृतीचे निकष : 

१. लोकशाही दिन अर्ज विहित नमुन्यात असावा (नमुना प्रपत्र १अ ते १ड). 

हे वाचले का?  ग्रामपंचायत वरील ‘पतिराज’ आता संपणार

२. तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी.

३ . चारही स्तरांवरील लोकशाही दिनाकरिता अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात अगोदर २ प्रतित पाठविणे आवश्यक राहील.

तालुका लोकशाही दिनानंतर १ महिन्याने जिल्हाधिकारी /महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनांत अर्ज सादर करता येईल.

जिल्हाधिकारी /महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी विभागीय आयुक्त लोकशाही दिनात व विभागीय आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी मंत्रालय लोकशाही दिनांत अर्ज करता येईल.

कोणत्या विषयावरील अर्ज स्विकारले जात नाहीत : 

  1. न्यायप्रविष्ठ प्रकरणे. 
  2. राजस्व / अपिले सेवाविषयक,
  3. आस्थापना विषयक बाबी.  
  4. विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज. 
  5. अंतिम उत्तर दिलेले आहे/देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषया संदर्भात केलेले अर्ज.
  6. तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर.

वरील प्रमाणे जे अर्ज लोकशाही दिनांकरिता स्वीकृत करता येऊ शकत नाहीत असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाही साठी ८ दिवसात पाठविण्यात येते व त्याची प्रत अर्जदारास पृष्ठांकित करण्यात येते.

तालुकास्तरीय लोकशाही दिनास उपस्थित राहणारे अधिकारी

  1. उपविभागीय अधिकारी. 
  2. उपविभागीय पोलीस अधिकारी. 
  3. तहसीलदार पाट बंधारे विभाग, कृषी विभाग, सहकार विभाग, बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग, या विभागांचे तालुका स्तरांवरील प्रमुख अधिकारी. 

ज्या ज्या क्षेत्रांमध्ये निवडणुकीकरिता आचार संहिता लागू करण्यात आलेली आहे, अशा ठिकाणी त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत नाही.

लोकशाही दिनामध्ये नागरीकांकडून प्राप्त झालेल्या अर्जाची पोचपावती प्रपत्र २ प्रमाणे अर्जदारास देण्यात येते. 

हे वाचले का?  सावकारी कायदा Savkari Kayada 2014


     सर्व स्तरावरील लोकशाही दिनासाठी अर्ज स्वीकृत केल्यानंतर ज्या विभागाशी संबंधित तक्रार अर्ज आहे त्या विभागाच्या विभागप्रमुखाकडे संबंधित अर्ज पाठविण्यात येईल व सदर विभागप्रमुख सदर अर्जातील विनंती बाबत केलेल्या कार्यवाहीच्या अहवालासह लोकशाही दिनी हजर राहतील.

सदर अहवाल अर्जदाराची विनंती त्याबद्दलचे नियम, शासनाची भूमिका, तरतुदी या बाबींचा विचार करून “लोकशाही दिन” प्रमुख योग्य तो निर्णय देतील.     

हे ही वाचा

अर्जदाराला अंतिम उत्तर लोकशाही दिनानंतर शक्य तितक्या लवकर देणे आवश्यक आहे. (साधारणतः एक महिन्याच्या आत).

अर्ज :-

लोकशाही दिन अर्ज

सोबत जोडावयाची कागदपत्रे :

 तहसीलदार यांना उद्देशुन अर्ज, 

अर्जदारांकरिता सर्वसाधारण सूचना 

1. लोकशाही दिन तहसीलदार कार्यालयात होईल. त्यावेळी मुळ अर्जासह उपस्थित राहवे. 

2. वरील नमुन्यात अर्ज त्यासोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या १५ दिवस अगोदर पाठविणे आवश्यक आहे.

वरील बाबींची पूर्तता केली नाही तर लोकशाही दिनात प्रत्यक्ष अर्ज सादर करता येणार नाही.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube 

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा..

विडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा..

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top