विद्युत अपघात पीक जळीत प्रकरणी नुकसान ग्रस्त व्यक्तीस नुकसान भरपाई

विद्युत अपघात पीक जळीत

विद्युत अपघात पीक जळीत प्रकरणी अपघातग्रस्त / नुकसानग्रस्त व्यक्तीस नुकसान भरपाई मिळण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत. विद्युत अधिनियम २००३ मधील कलम १६१ व अपघात सूचना (फॉर्म आणि सूचना सेवाकाळ) नियम, २००४ मध्ये प्राणांतिक/अप्राणांतिक अपघात/जळीत पीक नुकसान या प्रकरणी कार्यवाही करण्याची तरतूद आहे.

सदर तरतुदीनुसार क्षेत्रीय स्तरावर विद्युत निरीक्षक व महावितरण कंपनीचे अधिकारी यांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत अनुक्रमे मुख्य विद्युत निरीक्षक व महावितरण कंपनीने आदेश/परिपत्रके निर्गमित केली आहेत.

परंतु क्षेत्रीय स्तरावर सदर कार्यपध्दतीमध्ये दोन्ही कार्यालयांमध्ये सूसुत्रता नसल्याने अशा प्रकरणांमध्ये अपघातग्रस्त व नुकसानग्रस्त व्यक्तीस नुकसान भरपाईची रक्कम वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी शासनास प्राप्त होतात. अशा प्रकरणांमध्ये तातडीने कार्यवाही होण्याच्या दृष्टीने तसेच दोन्ही कार्यालयांमध्ये समन्वय राहण्याच्या दृष्टीने कार्यपध्दती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुसरून खालीलप्रमाणे कार्यपध्दती विहीत करण्यात येत आहे.

Table of Contents

1.विद्युत अपघात पीक जळीत प्रकरणी सूचना देणारा अधिकारी

वीज निर्मिती, पारेषण वीज पुरवठाकार (लायसन्सी) यांचे प्राधिकृत | प्रतिनिधी किंवा त्यांचा कमीत-कमी कनिष्ठ अभियंता अथवा समकक्ष दर्जाचा अधिकारी किंवा विद्युत संचमांडणीचा मालक.

हे वाचले का?  ई-श्रम कार्ड (E-Shram Card) कामगार नोंदणी म्हणजे काय? फायदे जाणून घ्या E-Shram Card ऑनलाईन असे काढा.

विद्युत अधिनियम नियमातील तरतूद-

(अ) अपघात/जळीत पीक प्रकरण झाल्याचे कळाल्या पासून २४ तासाच्या आत अपघाताची सूचना दूरध्वनी, भ्रमणध्वनी किंवा ई-मेलव्दारे देणे.
(ब) ४८ तासाच्या आत अपघाताची/जळीत पीक प्रकरणाची सविस्तर माहिती केंद्र शासनाच्या अपघात सूचना नियम २००४ मधील विवरणपत्र नमुना-अ मध्ये पाठविणे.

सूचना कोणाला द्यावी- संबंधित जिल्हयाचे विद्युत निरीक्षक

2. विद्युत निरीक्षक कार्यालयास विद्युत अपघात / जळीत पीक प्रकरणी सूचना प्राप्त झाल्यानंतर

•विद्युत निरीक्षक यांनी करावयाची कारवाई-

प्रत्यक्ष करावयाची कार्यवाही अपघात/जळीत पीक प्रकरण स्थळास भेट देऊन प्राथमिक चौकशी करणे विहीत कालमर्यादा विद्युत अपघात घडल्यापासून 48 तासांच्या आत.

प्राथमिक चौकशी अहवाल तयार करणे- विद्युत अपघात घडल्यापासून ८ दिवस

जबाब नोंदविणे, पोलीस पंचनामा प्राप्त करुन घेणे. शव विच्छेदन अहवाल प्राप्त करुन घेणे. जळीत पीक प्रकरणी सक्षम प्राधिकाऱ्याचा अहवाल प्राप्त करून घेणे. ३० दिवस

जबाब नोंदविणे, पोलीस पंचनामा प्राप्त करुन घेणे. शव विच्छेदन अहवाल प्राप्त करुन घेणे. जळीत पीक प्रकरणी सक्षम प्राधिकाऱ्याचा अहवाल प्राप्त करून घेणे- ३० दिवस

संबंधितांवर कारणे दाखवा नोटीस बजाविणे, दोषारोप पत्रे देणे.- ५ दिवस

अपघाताचा/जळीत पीक प्रकरणाचा अभिप्राय संबंधित महावितरण कंपनीस कळविणे, नुकसान भरपाई देण्याबाबत जबाबदारी निश्चित करून संबंधितास कळविणे, पोलीसांनी मागणी केल्यास पोलीस ठाण्यास अभिप्राय कळविणे. ५ दिवस

हे वाचले का?  मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना: लाभ घेण्याचे आवाहन

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

3. MSDCL/ महावितरण कंपनीने करावयाची कार्यवाही

अ) कनिष्ठ शाखा / सहाय्यक अभियंता यांनी करावयाची कार्यवाही (१) प्रत्यक्ष अपघात /जळीत पीक प्रकरण स्थळास भेट देऊन प्राथमिक चौकशी

  • प्रत्यक्ष करावयाची कार्यवाही अपघात/जळीत पीक प्रकरण स्थळास भेट देऊन प्राथमिक चौकशी करणे.
  • स्थळ पाहणी अहवाल, नकाशा व फोटोसह तयार करणे.
  • उपविभागीय कार्यालयास अहवाल सादर करणे
  • विहीत कालमर्यादा- विद्युत अपघात घडल्यापासून २४ तासात

ब) विद्युत अपघात पीक जळीत प्रकरणी उपविभागीय कार्यालयाने करावयाची कार्यवाही

(१) कनिष्ठ / सहाय्यक अभियंत्यांने दिलेली माहिती पोर्टलवर अपलोड करणे.
(२) अपघाताचे/जळीत पीक प्रकरणाचे सविस्तर | विवरणपत्र नमुना -अ मधील विद्युत निरीक्षकास पाठविणे.
(३) महावितरण कंपनीच्या प्रचलित नियमानुसार विद्युत अपघात अपघातग्रस्त व्यक्तीच्या कायदेशिर वारसास तात्काळ तात्पुरते आर्थिक सहाय्य देणे.
(4) अर्जदार/कायदेशीर वारसदार यांचे कडून नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा अर्ज कागदपत्रे यादी.
(५) अर्जदार/कायदेशीर वारसदार यांचे कडून नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा अर्ज व अनुषांगिक दस्ताऐवज प्राप्त करणे.
(६) विद्युत निरीक्षकाचा अहवाल / पिकांच्या नुकसानीबाबतचा सक्षम प्राधिकाऱ्याचा अहवाल व दस्ताऐवजांची पडताळणी करुन विभागीय कार्यालयास पाठविणे.

क) विभागीय कार्यालयाने करावयाची कार्यवाही

(१) दस्ताऐवजांची तपासणी / पडताळणी
(२) निष्कर्ष अहवाल नमुना क्र.३ स्वयंस्पष्ट टिप्पणीसह
(३) नुकसान भरपाई अहवालाचे लेखा परीक्षण
(४) नुकसान भरपाई प्रस्ताव मंडळ कार्यालयास पाठविणे.

हे वाचले का?  Dudh Anudan Yojana दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान

ड) मंडळ कार्यालयाने करावयाची कार्यवाही

(१) दस्ताऐवजांची तपासणी / पडताळणी
(२) लेखापरिक्षण करणे
(३) प्रस्तावास मंजुरी देणे व मंजूर प्रस्ताव विभागीय कार्यालयास पाठविणे

इ)विभागीय कार्यालयाने करावयाची कार्यवाही

(१) मंडळ कार्यालयाकडून मंजूर प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर नुकसान भरपाई निधी मागणी मुख्य कार्यालयास करणे.
(२) नुकसान भरपाई निधी वितरण करणे.

ई) पीक जळीत प्रकरणी मुख्य कार्यालयाने करावयाची कार्यवाही

(१) नुकसान भरपाई प्रस्तावास मंजुरी व निधी उपलब्ध करणे

विहीत कार्यपध्दतीनुसार विद्युत अपघात/पीक जळीत प्रकरणी कार्यवाही करण्याच्या सूचना, मुख्य विद्युत निरीक्षक व महावितरण कंपनीने त्यांच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयांना द्याव्यात तसेच सदर कार्यपध्दतीचे लवकरात लवकर संगणकीकरण करून ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात यावी.

मुख्य विद्युत निरीक्षक व महावितरण कंपनीने ऑनलाईन प्रणालीची एकमेकांशी सांगड घालून अशा प्रकरणांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही होईल यादृष्टीने नियंत्रण ठेवावे. विद्युत अपघात/पीक जळीत प्रकरणी क्षेत्रीय स्तरावर प्रत्येक जिल्ह्यातील विद्युत निरीक्षक व महावितरण कंपनीचे संबंधित अधिक्षक अभियंता यांनी दर महिन्यास आढावा बैठक घ्यावी व मुख्य अभियंता, महावितरण यांनी दर तीन महिन्यांस आढावा बैठक घ्यावी.

तसेच महावितरण कंपनीने मुख्यालय स्तरावर मुख्य विद्युत निरीक्षकांसोबत दर चार महिन्यास आढावा बैठक घेऊन सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी व त्याचा अहवाल.

हे वाचले का?

GR डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top