Swadhar Yojana उच्च शिक्षणासाठी ‘स्वाधार’ चा आधार | जाणून घेऊया काय आहे योजना |

Swadhar Yojana

Swadhar Yojana उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना मर्यादित जागांमुळे शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना शहरातील खर्च परवडत नसल्यामुळे ते उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी सामाजिक न्याय विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे.

या योजनेमुळे अनुसूचित जाती व नवबौद्व प्रवर्गातील अनेक होतकरू विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

येथे क्लिक करून पहा, अर्ज कुठे करता येतो?

इयत्ता 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरचे व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध असतात.

या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना शहरातील महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो.

महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यानंतर मर्यादीत जागांमुळे शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळेलच याची शाश्वती नसते.

वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळून देखील उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता असते.

हे वाचले का?  Dudh Anudan Yojana दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान

विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्वप्न भंग होऊ नये यासाठी ही योजना अतिशय महत्वाची ठरली आहे.

येथे पहा आवश्यक कागदपत्रे

Swadhar Yojana विद्यार्थ्यांना लाभ किती?

या योजनेतून जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्या व जेवणाचा खर्च म्हणुन  प्रति विद्यार्थी 12 महिन्यांसाठी 42 हजार इतकी रक्कम दिली जाते.

इतर जिल्हा किंवा महानगरपालिकेच्या क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना 12 महिन्यांसाठी 60 हजार तसेच या रक्कमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी 5 हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी देण्यात येते.

येथे क्लिक करून पहा, अर्ज कुठे करता येतो?

विद्यार्थी पात्रता:

विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्व प्रवर्गाचा असावा.

पालकाचे उत्पन्न 2 लाख 50 हजारापेक्षा जास्त नसावे.

विद्यार्थी स्थानिक नसावा,

विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणचा तो रहिवासी नसावा,

10 वी नंतर आणि 12 वी नंतर व्यावसायिक किंवा बिगर व्यावसायिक दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसलेल्या अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण घेणारा असावा.

हे वाचले का?  Gopinath Munde Insurance Scheme या शेतकऱ्यांना सरकार देणार 2 लाख रुपये............!!!!!

येथे पहा आवश्यक कागदपत्रे

इयत्ता 11 वी आणि 12 वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास 10 वीत किमान 50 टक्के तर 12 वी नंतर व्यावसायिक किंवा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रत्येक वर्षाला किमान 50 टक्के गुण असावे.

मान्यताप्राप्त महाविद्यालय व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असावा. विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येते.

निवडलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहतो.

या योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारी 40 टक्के इतकी आहे.

हे वाचले का?

हे वाचले का?  Lek Ladki Yojana मुलींना लखपती करणारी राज्य शासनाची लेक लाडकी योजना | जाणून घेऊ या काय आहे योजना |

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

3 thoughts on “Swadhar Yojana उच्च शिक्षणासाठी ‘स्वाधार’ चा आधार | जाणून घेऊया काय आहे योजना |”

  1. Pingback: UMED-MSRLM Jalgaon Recruitment महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान, जळगाव येथे विविध जागांसाठी भरती - naukri

  2. Pingback: ICAR Recruitment नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे येथे २१ जागांसाठी भरती होणार - naukri

  3. Pingback: Mahapareshan Recruitment 10वी व ITI पास उमेदवारांसाठी महापारेषण, पुणे येथे अप्रेंटिसची सुवर्णसंधी | लवकर करा अर्ज| - na

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top