Dr Punjabrao Deshmukh Scholarship डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना २०२३

Dr Punjabrao Deshmukh Scholarship

Dr Punjabrao Deshmukh Scholarship या लेखामध्ये आपण डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना २०२३ बद्दलची माहीती घेणार आहोत. माहीती शेवटपर्यन्त वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा.

डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत. अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने काळजीपूर्वक अटी व शर्ती वाचाव्या.

१.Dr Punjabrao Deshmukh Scholarship योजने अंतर्गत शिष्यवृत्तीच्या लाभासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा- कुणबी व कुणबी मराठा या जातीतील असावा.

२. महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा.

३. विद्यार्थ्यांने पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पदवीसाठी राज्य शासनाच्या किंवा इतर राज्याच्या / केंद्र शासनाच्या कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा. तसेच पदव्युत्तर पदवी/ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पदव्युत्तर पदवी/ पदवीत्तोर पदविकासाठी राज्य शासनाच्या किंवा इतर राज्याच्या / केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा.

येथे क्लिक करून पहा आवश्यक कागदपत्रे

४. या शिष्यवृत्तीसाठी विहीत केलेल्या विद्यापीठ/संस्थांमध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पुर्ण वेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा.

५. पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा २५ वर्षे व पदव्युत्तर पदवी / पदविका अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे इतकी राहील.

६. उपरोक्त ३०० पात्र शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीपैकी ५०% जागा मुली / विद्यार्थीनी करिता राखीव असतील.

७. या योजने अंतर्गत शिष्यवृत्तीच्या लाभासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे एकुण वार्षिक उत्पन्न हे नॉन क्रिमी लेयर मधील असणे आवश्यक आहे.

हे वाचले का?  Free Education For Girls मुलींना शैक्षणिक फी माफ | GR आला | पाहूया कोणाला मिळणार लाभ |

८. एकुण दरवर्षी ३०० विद्यार्थ्यांची निवड या शिष्यवृत्ती करिता करण्यात येईल. पालक / विद्यार्थी यांचे एक रक्कमी वार्षीक उत्पन्नानुसार शिष्यवृत्ती देय विद्यार्थी संख्या बाबतची माहीती खालील रकाना मध्ये दर्शविण्यात आली आहे.

येथे क्लिक करून पहा विद्यार्थ्यांना किती लाभ मिळणार?

९. विद्यार्थ्यांचे पालक नोकरीत असतील तर त्यांचे आयकर विवरणपत्र, फॉर्म नं. १६ व सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणा-या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

जर पात्रधारक ५० विद्यार्थीनी मुली उपलब्ध झाल्या नाही तर त्या वर्षा करिता पात्र विद्यार्थी त्या भरण्यात येतील व सदर अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक सारथी यांचे राहतील.

१०. इतर विद्यार्थ्यांसाठी सक्षम प्राधिकारी (तहसिलदार किंवा नायब तहसिलदार) यांनी दिलेले मागील अर्थिक वर्षांचे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

Dr Punjabrao Deshmukh Scholarship शैक्षणिक पात्रता:

(अ) या योजनेंतर्गत शिष्यवृत्तीच्या लाभासाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळ अथवा महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील अन्य परिक्षा मंडळातून इयत्ता १० वी व १२ वी ची परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

येथे क्लिक करून पहा अर्ज कसा करावा

(आ) या योजनेंतर्गत पदवी अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तीच्या लाभासाठी विद्यार्थ्यांचे इयत्ता १२ वी च्या परीक्षेतील गुण विचारात घेऊन गुणानुक्रमे निवड करण्यात येईल. त्याकरीता विद्यार्थ्याने इयत्ता १२ वी च्या परीक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळविणे आवश्यक राहील. (इ) तसेच, पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात प्रवेश घेणान्या डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांचे डिप्लोमाच्या परिक्षेतील गुण विचारात घेऊन गुणानुक्रमे निवड करण्यात येईल. त्याकरिता विद्यार्थ्याने डिप्लोमाच्या परिक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळविणे आवश्यक राहिल.

हे वाचले का?  12th Result 2023 12 वी निकाल आज जाहीर होणार..!

(ई) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तीकरीता पदवी अभ्यासक्रमातील गुणांची टक्केवारी विचारात घेऊन गुणानुक्रमे निवड करण्यात येईल. त्याकरीता विद्यार्थ्यांने पदवी परीक्षेमध्ये किमान ५५ टक्के गुण (संपूर्ण अभ्यासक्रम कालावधीतील सर्व सत्रांच्या एकूण प्राप्त गुणांची टक्केवारी) मिळविणे आवश्यक राहील. तसेच, CGPA व GPA च्या बाबतीत संबंधित विद्यापीठाचे टक्केवारी रुपांतरण प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.

संबंधित अर्जदार विद्यार्थी हा या योजने अंतर्गत विहीत केलेल्या संस्थांमध्ये पदवी / पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका या अभ्यासक्रमांसाठी त्या त्या संस्थांची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रवेशित झालेला असावा.

राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना समान संधी देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण परिक्षा मंडळाच्या परिक्षेत्रातील रहिवासी असलेल्या विद्याथ्यांची खालीलप्रमाणे मंडळनिहाय निवड करण्यात येईल.

येथे क्लिक करून पहा आवश्यक कागदपत्रे

Dr Punjabrao Deshmukh Scholarship इतर अटी-शर्ती खालीलप्रमाणे असतील :-

(१) महाराष्ट्र राज्य विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण परिक्षा मंडळाच्या विभागीय मंडळाच्या एखाद्या परिक्षेत्रातून संबंधित शैक्षणिक वर्षामध्ये विहित विद्यार्थी संख्या उपलब्ध झाली नाही तर अन्य विभागीय परिक्षा मंडळातून तेवढ्या संख्येच्या विद्याथ्र्यांची गुणवत्तेनुसार शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येईल.

(२) संबंधित निवड वर्षामध्ये योजने अंतर्गत शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३00 पेक्षा कमी असल्यास ‘भारत सरकार मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या http://mhrd.gov.in/institutions या संकेतस्थळा वरील नमुद (परिशिष्ट-ब) शैक्षणीक संस्थामधील प्रवेशित मराठा व कुणबी मराठा जातीतील विद्यार्थ्यांनी द्वितीय किंवा पुढील वर्षी या योजने अंतर्गत शिष्यवृत्ती साठी विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला असल्यास त्यांचे अर्ज योजनेच्या अटी व शर्तीप्रमाणे विचारात घेता येतील.

येथे क्लिक करून पहा विद्यार्थ्यांना किती लाभ मिळणार?

(३) वरील (१) व (२) प्रमाणे कार्यवाही केल्यानंतर संबंधित निवड वर्षामध्ये शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३०० पेक्षा कमी असल्यास शासन निर्णयान्वये विहीत केलेल्या संस्थांमध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रवेशित मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा विद्यार्थ्यांचे अर्ज विचारात घेता येतील व त्यांच्या बाबत किमान गुणवत्तेची अट शिथिल करण्यात येईल. मात्र, उर्वरित अटी व शर्ती या कायम राहतील.

हे वाचले का?  Career After 12th बारावीचा निकाल जाहीर, आता पुढे काय..? जाणून घेऊ या उपलब्ध असलेले विविध कोर्सेस..!!

(४) या योजनेच्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी अर्ज करेल त्यावर्षी तो पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्गाला (अर्जदार विद्यार्थी डिप्लोमाधारक असेल तर तो पदवीच्या दुसऱ्या वर्गाला शिकत असला पाहिजे.

येथे क्लिक करून पहा अर्ज कसा करावा

(५) या योजने अंतर्गत संपूर्ण अभ्यासक्रमाच्या कालावधीत विद्यार्थी एक वेळ अनुत्तीर्ण झाल्यास, अनुत्तीर्ण झालेल्या वर्षाची शिष्यवृत्ती त्यास देय ठरणार नाही. परंतु, संबंधित विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यास पुढील शिष्यवृत्ती देय ठरेल. तसेच संबंधित विद्यार्थी अभ्यासक्रम कालावधीत दोन वेळा अनुत्तीर्ण झाल्यास पुढील कालावधीची शिष्यवृत्ती देय होणार नाही.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top