Tukade Bandi Kayda 2023 तुकडेबंदी कायद्यात होणार मोठे बदल

Tukade Bandi Kayda Badal 2023

Tukade Bandi Kayda 2023 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७. बदल करण्यासाठी महसूल व वन विभाग १४ जुलै, २०२३. अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र यांच्या मार्फत जाहीर करण्यात आले आहे.

नावात बदल  “मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत नियम, १९५९ ” या मजकुरा ऐवजी “महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत नियम” असा नावात बदल केला जाईल . 

नवीन येणाऱ्या महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत नियम म्हणजेच तुकडे बंदी व तुकडे जोड कायदा 2023 मधील होणारे बदल पुढील प्रमाणे असतील. Tukade Bandi Kayda 2023

हे वाचले का?  Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra ज्येष्ठ नागरिकांना मोफत यात्रा | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू | शासन निर्णय जाहीर |

या मध्ये विहिरी, शेतरस्ता, सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन शिल्लक राहिलेली लगतची शेतजमीन, घर बांधकाम जागे करता, तुकडे बंदी व तुकडे जोड कायदा 2023 मधील होणारे बदल पुढील प्रमाणे असतील.

*1) जर विहिरी करिता जमिनीची आवश्यकता असेल तर*

विहीरीकरिता जमिनीच्या हस्तांतरणासाठी अर्जासोबत विहीरीकरिता जमिनीच्या भू-सहनिर्देशकाच्या समावेशासह पाण्याची उपलब्धता नमूद केलेले आणि विहीर खोदण्याची परवानगी असलेले भूजल सर्वेक्षण व विकास अभिकरण (Groundwater Directorate Of Surveys & Development Agency) दिलेले ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असेल.

i ) विहीरीकरिता प्रस्तावित खरेदीदाराकडे किमान प्रमाणभूत क्षेत्र धारण करणे आवश्यक असेल म्हणजे बागायती करता 10 तर जिरायत जमिनी करता 20 गुंठे जमीन आवश्यक असेल,

ii ) जिल्हाधिकारी विहीरी करिता कमाल दोन आर पर्यंत म्हणजेच 2 गुंठे पर्यंत अशा प्रकारच्या जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी मंजूरी देतील. 

हे वाचले का?  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 50 हजार मिळणार

iii ) जिल्हाधिकाऱ्याच्या अशा मंजुरी आदेशामध्ये विहीरीसाठी हस्तांतरित करावयाच्या प्रस्तावित जमिनीच्या भू-सहनिर्देकाचा समावेश असेल. जिल्हाधिकाऱ्याचे असा मंजुरी आदेश जमिनीच्या विक्रीदस्तासोबत जोडण्यात येईल..

iv ) अशा जमिनीच्या विक्रीदस्तानंतर, विहीर वापराकरिता मर्यादित” अशी नोंद अशा जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर शेरा म्हणून घेण्यात येईल.

घर बांधकामं व शेत रस्ता तुकडेबंदी बदल 2023 माहिती येथे पहा..!!

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

हे वाचले का?  Kaju Anudan 2024 काजू उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी | शेतकऱ्यांना मिळणार अनुदान |

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा                            

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top