Vishwakarma Yojana बहुतेक बांधकाम कामगार हे निरोगी आणि सुरक्षित कार्यपद्धतीबद्दल जागृत पूर्णपणे जागरूक नसतात, त्यांना कार्य-संबंधित जोखीम व इतर विविध भौतिक, रासायनिक, जैविक जोखीम आणि मानसिक-सामाजिक घटक अशा विविध गोष्टींचा सामना करावा लागतो. त्याकारणाने अनेक बांधकाम कामगार हे त्रस्त आहेत. त्यांना अनेक विकारांचा सामना करावा लागतो, जसे की मस्क्यूकोस्केलेटल विकार, कमी ऐकू येणे, हातात कंपन जाणवणे, त्वचा आणि श्वसन रोग इत्यादी.
या सर्वांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांनी नित्य नियमाने आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. असे केल्यास त्यांना अशा प्रकारच्या विविध आजारापासून दूर राहता येईल किंवा अशा प्रकारचे काही जुनाट आजार असल्यास त्यावर त्वरित उपचार करता येतील व त्यांचे स्वास्थ चांगले राहील.
त्यांची कार्यक्षमता वाढेल व त्यांना त्यांची रोजगार क्षमता वाढण्यास मदत होईल. एकंदरीत त्यांना सुरक्षित, निरोगी आणि समृद्ध जीवन जगता येईल.
हे आहे विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी
बांधकाम व्यवसायामधील कामगारांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने त्यांची नियमित आरोग्य तपासणी व्हावी व त्यांना त्वरित उपचार मिळावेत, याकरिता महाराष्ट्र शासनाकडून ही योजना राबविण्यात येत आहे. त्यांच्या आरोग्याच्या वेळोवेळी तपासण्या झाल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर प्राथमिक स्तरावर उपचार करणे शक्य होणार आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदित सक्रिय (जीवित) बांधकाम कामगार यांच्याकरिता ही योजना असून, या अंतर्गत तपासणी ते उपचार अशी सेवा प्रदान करण्यात येणार आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी, रोगाचे त्वरित निदान, वैद्यकीय उपचारांसाठी सुलभ प्रवेश, कामाच्या ठिकाणी कार्यक्षमता वाढवण्यास मदत, आरोग्य सेवा आपल्या दारी असे या योजनेचे प्रमुख फायदे आहेत.
Vishwakarma Yojana सूचीबध्द रुग्णालये
नियुक्त संस्थेने प्रत्येक तालुक्यात किमान एक याप्रमाणे निश्चित ठिकाणी कायमस्वरूपी आरोग्य तपासणी केंद्रे निर्माण किंवा सूचीबध्द केलेल्या ठिकाणी लाभार्थी भेट देवून प्राथमिक आरोग्य तपासणी करू शकेल व तपासणी अहवाल (प्राथमिक व प्रगत पुष्ठीकरण) मिळवू शकेल.
हे आहे विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी
पृष्ठीकरण आरोग्य तपासणी चाचणी तसेच, वैद्यकीय उपचाराकरिता नियुक्त संस्था रुग्णालये सूचीबध्द करतील. प्रत्येक जिल्हा कामगार सुविधा केंद्राच्या क्षेत्रामध्ये किमान तीन रूग्णालये मंडळाच्या मान्यतेने सूचीबध्द करून आवश्यकतेनुसार यामध्ये वाढ करण्यात येईल.
फिरते वैद्यकीय कक्ष
फिरते वैद्यकीय कक्ष नियुक्त संस्थेमार्फत प्रत्येक जिल्हा कामगार सुविधा केंद्राच्या क्षेत्रामध्ये 24 X 7 कार्यरत राहील. या कक्षावरील होणारा खर्च नियुक्त संस्थेमार्फत करण्यात येईल.नियुक्त संस्थेमार्फत फिरते वैद्यकीय कक्ष वाहन विना शुल्क उपलब्ध करून देणे आवश्यक राहील. या फिरते वैद्यकीय कक्ष वाहनामध्ये डॉक्टर, परिचारक व मदतनीस उपलब्ध राहतील.
हे फिरते वैद्यकीय कक्ष वाहन अत्याधुनिक जीवन समर्थन प्रणाली युक्त असून यामध्ये लाभार्थ्यांना द्यावयाची औषधे, आपत्कालीन परिस्थितीमध्ये लागणारी अत्यावश्यक औषधे, प्रथमोपचार इ. सुविधा देण्यात येतील. हे फिरते वैद्यकीय कक्ष वाहन हे या योजनेकरिता तयार केलेल्या समर्पित बांधकाम कामगार आरोग्य क्रमांकाशी संलग्न राहील.
हे आहे विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी
या योजनेचा नि:शुल्क टोल फ्री क्रमांक १८००-२-६६ ६६ ६६ ६६ हा असून यावर कामगारांना संपर्क साधता येईल.
अधिक माहितीसाठी जिल्ह्याच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Pradhanmantri Mudra Yojana प्रधानमंत्री मुद्रा योजना.
- Loan Guarantor कर्जासाठी जामीनदार होताय..? जरा सांभाळून, नाहीतर वाढेल डोकेदुखी |
- Department of Women and Child Development महिला व बालविकास विभाग तर्फे ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत राबविल्या जातात विविध योजना |
- Retirement Planning असे करा, म्हातारपण सुखात घालवा |
- NA PERMISSION असेल परवानगी बांधकामाची, गरज नसेल बिनशेती परवान्याची!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा