Marriage Certificate विवाह नोंदणी प्रक्रिया | नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे |

Marriage Certificate

Marriage Certificate विवाह नोंदणी हे सामाजिक कर्तव्य आहे. राज्यात दोन पध्दतीने विवाहाची नोंदणी केली जाते.

  1. विशेष विवाह कायदा, 1954 या कायद्यांतर्गत विशेष विवाह संपन्न करून त्याचे प्रमाणपत्र दिले जाते.
  1. वैदिक अथवा पारंपरिक पध्दतीने संपन्न झालेल्या विवाहाची नोंदणी करण्यासंदर्भात महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम, 1998 हा कायदा अस्तित्वात आहे.

येथे क्लिक करून पहा विवाह नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

विशेष विवाह कायदा, 1954 अंतर्गत विवाह संपन्न करण्याकरिता या कायद्यातील कलम 4 मध्ये नमूद अटींची पूर्तता केल्यानंतर कलम 5 अन्वये विशेष विवाह संपन्न करता येतो. ” तसेच इतर पध्दतीने अगोदरच झालेल्या विवाहाची नोंदणी विशेष विवाह कायद्यातील कलम 15. मधील तरतुदीची पूर्तता केल्यावर कलम 16 प्रमाणे करता येते.

विशेष विवाह कायद्यांतर्गत संपन्न करावयाचा विवाह हा विवाह कार्यालयाव्यतिरिक्त घरी/अन्य ठिकाणी देखील संपन करता येतो.

महाराष्ट्र राज्यात मुंबई शहर, मुंबई उपनगर व पुणे या ठिकाणी स्वतंत्र विवाह नोंदणीची कार्यालये आहेत तसेच सर्वसाधारणपणे जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात विवाह नोंदणीची कार्यालये आहेत.

हे वाचले का?  Pik Vima Update आंबा, काजू, संत्रा फळपिकांसह ज्वारीचा पीकविमा ४ व ५ डिसेंबर रोजी भरता येणार

सद्यःस्थितीत वैदिक/धार्मिक पध्दतीने संपन्न झालेल्या विवाहांची नोंदणी स्थानिक स्वराज्य संस्थेकडील अधिका-यांकडून केली जाते. मा. सर्वोच्च न्यायालयाने धीमती सीमा विरुध्द अश्विनकुमार (ट्रान्सफर पिटीशन क्र.291/05) प्रकरणामध्ये विवाहाची नोंदणी करणे अनिवार्य असल्याचा निर्णय दिला.

येथे क्लिक करून पहा विवाह नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

विवाहाची नोंदणी केली नाही एवढया कारणास्तव विवाह बेकायदेशीर ठरत नाही. मात्र त्यामुळे विवाह झाल्याचा कोणताही शासकीय पुरावा संबंधितांकडे राहत नाही. तसेच शासकीय अभिलेखात विवाह झाल्याबाबतची नोंद घेण्याबाबत अडचणीचे ठरते.

महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम, 1998 या अधिनियमाची राज्यात अंमलबजावणी करण्याचे अधिकार सार्वजनिक आरोग्य विभागास आहेत.

Marriage Certificate महाराष्ट्र विवाह नोंदणी प्रक्रिया

अ. महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम 1998 अंतर्गत विवाह नोंदणीसाठी पक्षकारांकडून प्रक्रीया खालीलप्रमाणे असते.

  1. विवाह ज्ञापनाच्या ‘नमुना’ मध्ये माहिती भरणे 2. त्यास रु.100/- चे कोर्ट फी स्टॅम्प (कोर्ट फी लेबल) चिकटविणे आवश्यक.
  2. विवाह नोंदणीचे ज्ञापन पत्नी किंवा पती ज्या विवाह निबंधकाचे कार्यक्षेत्रात राहत असतील त्या विवाह निबंधकासमोर सादर करणे
  3. विवाह ज्ञापनातील पक्षकार (वधू व वर) आणि तीन साक्षीदार व्यक्तीशः विवाह निबंधकासमोर उपस्थित राहून विवाह ज्ञापनावर स्वाक्षरी करणे
  4. तसेच विहीत केलेली विवाह नोंदणी फी भरणे
हे वाचले का?  Aadhar Card असे डाऊनलोड करा हरवलेले आधारकार्ड.....!

येथे क्लिक करून पहा विवाह नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

ब. महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम 1998 अंतर्गत विवाह नोंदणीसाठी विवाह निबंधकाकडून प्रक्रीया खालीलप्रमाणे असते.

  1. विवाह ज्ञापनाचा नमुना ड’ सादर केल्यानंतर त्याची पडताळणी करून दाखल करणे
  2. . पक्षकार (वधू व वर) आणि तीन साक्षीदार यांच्या ओळखीबाबत खात्री करणे
  3. खात्री पटल्यानंतर महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम 1998 मधील कलम 6 अन्वये विहीत केलेला ‘नमुना इ’ मध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे
  4. त्याची एक प्रत विवाह महानिबंधक यांचेकडे पाठविणे

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  Credit Card असा करा क्रेडिट कार्डचा स्मार्ट वापर |

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top