ई-श्रम कार्ड (E-Shram Card) कामगार नोंदणी म्हणजे काय? फायदे जाणून घ्या E-Shram Card ऑनलाईन असे काढा.

ई-श्रम कार्ड (E-Shram Card)

केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जातात की, कामगारांसाठी चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ सर्व कामगारांपर्यंत पोहोचला पाहिजे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने ई-श्रम कार्ड (E-Shram Card) कामगार नोंदणी सुरू केली आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखा द्वारे कामगार नोंदणीशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

जसे कामगार नोंदणी कशी करावी ?, त्याचा उद्देश, फायदे, वैशिष्ट्ये, पात्रता, महत्त्वाची कागदपत्रे, अर्ज कसा करावा इ. तर मित्रांनो, जर तुम्हाला महाराष्ट्र मध्ये ई-श्रम कार्ड संबंधित सर्व महत्त्वाची माहिती मिळवायची असेल, तर तुम्हाला आमचा हा लेख शेवट पर्यंत वाचायलाच हवा.

Private Hospital Corona Patients Bill | खाजगी हॉस्पिटल्स मधील कोरोना रूग्णावरील उपचार खर्च परत मिळणार |

ई-श्रम कार्ड (E-Shram Card) कामगारांची नोंदणी कशी करावी?

केंद्र सरकारकडून ई-श्रम (E-Shram Card) कामगार नोंदणी योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत देशभरातली सर्व कामगार वर्गाची नोंदणी केली जाणार आहे. या नोंदणीकृत कामगारांना शासनाने दिलेल्या योजनांचा लाभ दिला जाईल.

सर्व कामगार या योजने अंतर्गत अर्ज करू शकतात. ई-श्रम नोंदणी २०२1 च्या माध्यमातून कामगारांना आर्थिक मदत सहज उपलब्ध होऊ शकते.

हे वाचले का?  ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना ७५ व ८० टक्के अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी उपलब्ध

आर्थिक मदत कामगारांच्या बँक खात्यात थेट वर्ग केली जाईल. ई-श्रम अंतर्गत नोंदणी केलेल्या कामगारांना १ वर्षाकरिता PMSBY या योजने अंतर्गत अपघाती मृत्यू किंवा कायम अपंगत्व आल्यास १ ते २ लाख रूपये दरम्यान लाभ मिळेल.

१ वर्ष नंतर मात्र PMSBY योजने अंतर्गत निकषांची पूर्तता करून सदर योजनेचा लाभ मिळेल सर्व कामगारांना त्यांचे अर्ज अधिकृत ई-श्रम वेबसाईटवर मिळतील. अर्ज करण्यासाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 60 वर्षे आहे.

ई-श्रम कार्ड (E-Shram Card) सर्व कामगार वर्ग कुटुंबांसाठी बनवले जात आहे. हे कार्ड मिळवण्यासाठी कामगारांना अधिकृत ई-श्रम कार्ड वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुमचे ई-श्रम कार्ड तयार होईल. ऑनलाईन अर्ज जनसेवा केंद्रा द्वारे (CSC Center) वर देखील करता येतात.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कामगारांना कोणत्याही सरकारी कार्यालयाला भेट देण्याची गरज नाही. आपण घरी बसून मोबाइल वरुन आपली नोंदणी करू शकता. सरकारी योजनांचा लाभ कामगार कुटुंबांना कामगार ई-श्रम कार्ड (E-Shram Card) द्वारे दिला जाईल.

PF खातेदारांना मिळणार 7 लाखांचा विमा, EPFO Members Insurance

ई-श्रम कार्ड (E-Shram Card) योजना उद्दिष्ट

सरकारचे मुख्य उद्दिष्ट हे आहे की जे लोक त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी काम करतात, उपजीविका करतात आणि कोणत्याही बांधकाम क्षेत्रात काम करत आहेत त्यांना सरकारने आर्थिक मदत करण्यासाठी कामगार नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे.

हे वाचले का?  मंत्रिमंडळ निर्णय समजून घेऊया..!

या योजनेद्वारे, देशभरातली मजूरांना आणि त्यांच्या मुला-मुलीना कामगारांशी संबंधित सरकारी योजनेची आर्थिक मदत लाभ मिळतील. देशातील सर्व कामगार स्वत:ची नोंदणी करू शकतात आणि E-Shram Card बनवू शकतात आणि त्यातून बरेच फायदे मिळू शकतील.

घर, दुकान, बांधकाम रस्त्यापासून किती मिटर हवे सर्व कायदेशीर माहिती

ई-श्रम कार्ड (E-Shram Card) योजना लाभ कोणा कोणाला भेटणार

लहान आणि सीमांत शेतकरी / शेतमजूर, बांधकाम कामगार, विहीर खोदकाम करणारे, सुतार, मिस्त्री, लोहार, प्लंबर, रस्ता बांधकाम कामगार, इलेक्ट्रिशियान, वायरमान, चित्रकार, वेल्डर, चांभार, बांधकाम साईट पहारेकरी, दगड फोडणारे, ग्रिल्स आणि दरवाजा फॅब्रिकेटर्स, वीट भटी कामगार, पशु पालन करणारे, विडी कामगार, सेंट्रिंग कामगार, लेदर कामगार, सुतार, वीट भट्टीवर काम करणारे, घरगुती कामगार, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, हातगाडी ओढणारे, ऑटो रिक्षा चालक, आशा कामगार, दूध उत्पादक शेतकरी, सामान्य सेवा केंदरचालक, स्थलांतरित कामगार इ. कामगार.

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

ई-श्रम कार्ड (E-Shram Card) कोण पात्र नाही

  • सदर कामगार हा आयकर (Income Tax) भरणारा नसावा.
  • कामगाराचे वय १६ वर्षे ते ५९ वर्षे दरम्यान असावे.
  • सदर कामगाराचे भविष्य निधी संघटन (EPFO) आणि कर्मचारी राज्य विमा संघटना (ESIC) सदस्य नसावा.
  • सदर कामगार हा असंघटीत कामगार श्रेणीमध्ये कार्यरत असावा त्याची कोठीही नोंदणी झालेली नसावी.

यासारखे असे अनेक लोक आहेत त्यांची शासनाकडे नोंद नाही. त्यामुळे आपत्ती आली असता. किंवा काही नुकसान झाले असता त्यांच्यासाठी शासन काहीही करू शकत नाही म्हणून शासन या नोंदणीच्या माध्यमातून अशा लोकांना एक UAN (एक विशिष्ट नंबर) देणार आहे. आणि त्याचे इ श्रम (E SHRAM ) कार्ड (आधार कार्ड सारखे कार्ड) देणार आहे ज्यामुळे त्या लोकांना एक ओळख मिळणार असून शासनाचे अनेक लाभ मिळण्यास सोपे होणार आहे.

हे वाचले का?  जीवन प्रमाण योजना पेन्शनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला

पोलिस पाटील म्हणजे गावातील चालते बोलते गृह खाते.

ई-श्रम कार्ड योजना साठी लागणारी कागदपत्रे

  • E-KYC पूर्ण करण्यासाठी आधार क्रमांक 
  • OTP करता मोबाइल नंबर आधार लिंक असणे आवश्यक आहे.
  • फिंगर प्रिंट वेरफिय करावे लागतील.
  • IRIS डोळे वेरफिय करावे लागतील. (ही सर्व कामे CSC Center करावी लागतील )
  • चालू असलेले बँक खाते

कामगार स्वता  ई-श्रम कार्ड योजना करिता NDUW अंतर्गत नोंदणी करू शकतात किंवा आपल्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर (CSC) वर जाऊन नोंदणी करून घेऊ शकतात.

अधिकृत संकेतस्थळ –  ई-श्रम कामगार नोंदणी वेबसाईट

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top