बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारक खेळाडूंना सरकार शिकवणार धडा.

बोगस क्रीडा प्रमाणपत्र

बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारक कसा घेतात शासकीय सेवेत प्रवेश

शासनाने अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना दि.०१ जुलै, २०१६ च्या शासन निर्णयान्वये नोकरीसाठी ५ टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, खेळाडू आरक्षण हा शासकीय सेवेत प्रवेश करण्याचा सोपा मार्ग असल्याचे मानून, बरेच उमेदवार बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारण करतात.. आणि त्या आधारे शासन सेवेत प्रवेश करतात. ही बाब खऱ्या खेळाडू उमेदवारांवर अन्याय करणारी आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके प्राप्त करणारे खेळाडू राष्ट्रास तसेच राज्यास लौकीक प्राप्त करून देत असतात. खेळाडूंना प्राप्त होणाऱ्या संधी व शैक्षणिक अर्हता मिळविण्याचा कालावधी एकच असल्याने त्यांना दोन्ही आघाडीवर सारख्याच प्रमाणात लक्ष देता येणे शक्य नसते.

बऱ्याचदा त्यांची शैक्षणिक क्षेत्राट पिछेहाट होते त्यामुळे नोकरी, व्यवसायाच्या स्पर्धेत ते अन्य विद्यार्थ्यांशी स्पर्धा करु शकत नाहीत. ही बाब विचारात घेऊन शासनाने अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना संदर्भाधीन दि.०१ जुलै, २०१६ च्या शासन निर्णयान्वये नोकरीसाठी ५ टक्के आरक्षण दिले आहे.

बोगस प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी संबंधित उमेदवार काहीवेळा गैरव्यवहार करीत असल्याचे आढळून येते. कालांतराने, बोगस खेळाडू प्रमाणपत्राच्या अनुषंगाने शासनाकडे, दाखल होणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या चौकशीत असे उमेदवार दोषी आढळतात. शासनाकडून अशा बोगस खेळाडू उमेदवारांविरुद्ध फ़ौजदारी कारवाई करण्यात येते.

हे वाचले का?  तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियम (Tukadejod Tukde Bandi Adhiniyam)

किंबहुना अशा उमेदवारांना शासनातून बडतर्फ करावे लागते, त्यामुळे संबंधित उमेदवारांना मोठ्या सामाजिक अवहेलनेला ही सामोरे जावे लागते. तसेच ज्या उमेदवारांकडे बोगस प्रमाणपत्र आहे मात्र अद्याप शासन सेवेत नियुक्ती झाली नाही, अशा उमेदवारांवर देखील आयुष्यभर कारवाईची टांगती तलवार असते. त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक नुकसान झालेले युवा उमेदवार आयुष्याची निश्चीत दिशा ठरवू शकत नाहीत.

सदरची बाब विचारात घेऊन, सद्यस्थितीत बोगस खेळाडू उमेदवारांविरुद्ध शासनामार्फत करण्यात येत असलेल्या कारवाईमुळे, अनावधानाने/भुलथापांना बळी पडलेल्या बोगस खेळाडू प्रमाणपत्रधारक युवा उमेदवारांचे भवितव्य अडचणीत येऊ नये यासाठी त्यांना एक संधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

बोगस क्रीडा प्रमाणपत्र शासन निर्णय

बोगस खेळाडू प्रमाणपत्रधारक युवा उमेदवारांचे संपूर्ण भवितव्य अडचणीत येऊ नये यासाठी अशा उमेदवारांना एक संधी देण्याच्या उद्देशाने “बोगस क्रीडा प्रमाणपत्र, बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजना खालील प्रमाणे राबविण्यास शासन मंजूरी देण्यात येत आहे.

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

1. समर्पण योजनेची उद्दिष्ट्ये

  • बोगस प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजनेचे उद्दिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
  • खेळाडू उमेदवारांनी धारण केलेली क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल शासनाकडे जमा करुन घेणे.
  • बोगस खेळाडू प्रमाणपत्राआधारे दावा करणाऱ्या उमेदवारांचा शासन सेवेतील प्रवेश प्रतिबंधित करणे व वैध धारक खेळाडूंना आरक्षणाच्या पदासाठी संधी उपलब्ध करुन देणे.
  • समर्पण योजनेत सहभागी होणाऱ्या युवा उमेदवारांना पुढील काळात कायद्याचे पालन करणारे जबाबदार नागरिक म्हणून जीवन जगण्यास प्रवृत्त करणे.
हे वाचले का?  Ration Card latest update धक्कादायक महाराष्ट्रातील 1.27 लाख रेशन कार्ड रद्द होणार.

2. समर्पण योजनेचे स्वरुप

बोगस प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजनेत खालील बाबींचा समावेश असेल

1. शासन सेवेत नियुक्त/निवड न झालेल्या मात्र बोगस खेळाडू प्रमाणपत्र आणि बोगस प्रमाणपत्र पडताळणी अहवालधारक खेळाडूच्या प्रकरणी योजनेचे स्वरूप

उपरोक्त प्रमाणे बोगस खेळाडू प्रमाणपत्रे धारण करणाऱ्या खेळाडूंनी सदरची मूळ क्रीडा प्रमाणपत्रे व क्रीडा पडताळणी अहवाल आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांच्याकडे दि.३१ मे, २०२२ पुर्वी समर्पित करावित. सदर मुदतीत अशी बोगस प्रमाणपत्रे जमा करणाऱ्या कोणत्याही उमेदवारास, यासंदर्भात शासनाच्या अधिपत्याखालील कोणत्याही कार्यालयातून अतिरीक्त विचारणा केली जाणार नाही अथवा त्यास कोणत्याही चौकशीस सामोरे जावे लागणार नाही.

सदर उमेदवारांविरुद्ध कोणतीही फ़ौजदारी कारवाई करण्यात येणार नाही. तसेच क्रीडा प्रमाणपत्र, क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल जमा करणाऱ्या उमेदवारांच्या नावाची गोपनीयता बाळगण्यात येईल, याबाबतची जबाबदारी आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचाल लय स्तरावर राहील.

2. समर्पण योजना कारवाईसाठीची प्रकरणे

शासनाने उपरोक्त प्रमाणे दिलेल्या मुदतीत बोगस क्रीडा प्रमाणपत्राबाबतचा मूळ दस्ताऐवज शासनाकडे जमा न करणाऱ्या बोगस प्रमाणपत्र धारक सर्व उमेदवारांची. सखोल चौकशी करुन त्यांच्याविरुद्ध आणि त्यांना बोगस प्रमाणपत्र वितरीत करणाऱ्या संबंधित खेळाच्या संघटनेविरुद्ध नियमानुसार कडक फ़ौजदारी कारवाई करण्यात येईल.

३. समर्पण योजना कार्यपद्धती

बोगस क्रीडा प्रमाणपत्र / बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजनेत खालील बाबींचा समावेश असेल

  • बोगस प्रमाणपत्र धारक उमेदवारांनी त्यांची सदरची मूळ प्रमाणपत्रे व पडताळणी अहवाल, आयुक्त, युवक सेवा, पुणे यांच्या नावे पत्राद्वारे/ व्यक्तिशः उपस्थित राहून जमा करावीत.
  • आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांनी सदरचे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल रद्द करण्याची कार्यवाही करावी.
  • आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांनी दि. ३१ मे, २०२२ पुर्वी क्रीडा प्रमाणपत्राबाबतचा मूळ दस्ताऐवज शासनाकडे जमा न करणाऱ्या, प्रमाणपत्र धारक सर्व उमेदवारांची सखोल चौकशी करुन त्यांच्याविरुद्ध आणि त्यांना बोगस प्रमाणपत्र वितरीत करणाऱ्या संबंधित खेळाच्या संघटनेविरुद्ध नियमानुसार कडक फ़ौजदारी कारवाई करावी.
हे वाचले का?  एसटी कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ ७२०० रूपयांपर्यंत – मंत्री ॲड.अनिल परब यांची घोषणा

४. प्रसिद्धी –

सदर बोगस क्रीडा प्रमाणपत्र /बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजना यशस्वी होण्याच्या दृष्टीने, आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, सर्व उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा व सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी व्यापक स्तरावर प्रसिद्धी द्यावी.

हे वाचले का?

बोगस क्रीडा प्रमाणपत्र, बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजना GR डाऊनलोड करणेसाठी येथे क्लिक कारा.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top