Amdar Salary आमदार यांचे वेतन, भत्ते आणि सोयी सुविधा

Amdar Salary
Amdar Salary

Amdar Salary आमदार(विधानसभा/विधानपरिषद सदस्य) यांचे सातव्या वेतन आयोगानुसार मिळणारे वेतन व भत्ते, मिळणार्‍या सुविधा :

१. वेतन:

प्रत्येक सदस्यास आपल्या पदावधीत महाराष्ट्र शासनाच्या प्रधान सचिवाला अनुज्ञेय असणारे आणि वेळोवेळी सुधारणा करण्यात येईल असे किमान मूळ वेतन व महागाई भत्ता मिळून होणार्‍या वेतना एवढे वेतन देण्यात येईल. (७ व्या वेतन आयोगाप्रमाणे)

  • मूळ वेतन – रु. १,८२,२००/
  • महागाई भत्ता रु.३०,९७४/- (मूळ वेतनाच्या १७% प्रमाणे)

२. दूरध्वनी सुविधा भत्ता : दरमहा -रु. ८,०००/-

आमदार यांचे वेतन, भत्ते आणि सोयी सुविधा येथे पहा

३. स्टेशनरी व टपाल सुविधा भत्ता : दरमहा -रु. १०,०००/-

४. संगणक चालकाची सेवा मिळण्यासाठीचा भत्ता : दरमहा -रु. १०,०००/-

एकूण दरमहा वेतन व भत्ते: रु. २,४१,१७४/-

Amdar Salary इतर सोई सुविधा

५. दैनिक भत्ते : रु.2,000/- प्रतिदिन विधानसभा/विधानपरिषदेच्या अधिवेशनाला किंवा समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्याच्या प्रयोजनार्थ.

६. स्वीय सहायकाची विनामूल्य सेवा:

महाराष्ट्र विधान मंडळ सदस्यांचे वेतन व भत्ते अधिनियम, 1956 मधील कलम 6 (3) अन्वये प्रत्येक आमदार सदस्यास एका स्वीय सहायकाची सेवा विनामूल्य मिळण्याचा हक्क आहे. अशा प्रकारे नियुक्त केलेल्या स्वीय सहायकास दरमहा रूपये 25,000/- एवढे पारिश्रमिक अनुज्ञेय आहे.

हे वाचले का?  आपलं काम कुठे आणि कुणामुळे अडलंय याची माहिती अशी करून घ्या !

आमदार यांचे वेतन, भत्ते आणि सोयी सुविधा येथे पहा

७. दूरध्वनीची सोय

१ ) प्रत्येक सदस्यास तो सामान्यत: जेथे राहत असेल त्या ठिकाणी किंवा निवासासाठी तो वापरत असेल अशा राज्यातील इतर कोणत्याही ठिकाणी शासनाच्या खर्चाने, दूरध्वनी बसवून मिळविण्याचा हक्क असेल (दूरध्वनीच्या) प्रारंभिक ठेवीदाखलची तो बसविण्यादाखलची व भाडेखर्चा दाखलची रक्कम राज्य शासनाकडून सोसण्यात येईल.

२) आमदार सदस्याला निवासाच्या ठिकाणी स्वखर्चाने बसवून घेतलेल्या दूरध्वनीच्या संबंधातील भाडेखर्च शासनाकडून करण्यात येईल.

८. रेल्वे प्रवास (विद्यमान सदस्य ):

(अ) प्रत्येक विद्यमान आमदार सदस्यास प्रत्येकी रूपये 5,000/- एवढे मूल्य असणाऱ्या राज्यांतर्गत तीन कुपन पुस्तकांचा (हिरव्या रंगाची) एक संच पुरविण्यात येतो. या कुपन पुस्तकांचा वापर करून सदस्यास महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागात कोणत्याही रेल्वेने प्रथम वर्गाने किंवा वातानुकूलित टू-टियरने किंवा थ्री-टियरने एकट्याने रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे.

(ब) प्रत्येक विद्यमान सदस्यास प्रत्येकी रूपये 5,000/- मूल्य असणाऱ्या राज्याबाहेरील तीन कुपन पुस्तकांचा (पिवळ्या रंगाची) एक संच पुरविण्यात येतो. या कुपन पुस्तकांचा वापर करून सदस्यास महाराष्ट्र राज्याच्या बाहेर एकट्याने आणि सदस्याची पत्नी/तिचा पती आणि अज्ञान मुले किंवा सोबती यांना सदस्याबरोबर महाराष्ट्र | राज्यात किंवा महाराष्ट्र राज्याबाहेरील रेल्वे प्रवास एका वित्तीय वर्षात 30,000 कि. मी. मर्यादेपर्यंत करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

हे वाचले का?  Ration Card Type शिधापत्रिका/ रेशनकार्ड चे प्रकार: पिवळे, केशरी आणि सफेद

आमदार यांचे वेतन, भत्ते आणि सोयी सुविधा येथे पहा

९. मार्ग परिवहन सेवेने मोफत प्रवास (विद्यमान सदस्य):

प्रत्येक विद्यमान आमदार सदस्यास एक ओळखपत्र-नि-मार्ग प्रवासपत्र पुरविण्यात येते. या ओळखपत्रावर सदस्याने एकट्याने किंवा आपल्या ओळखपत्र-नि-मार्ग प्रवासपत्र पुरविण्यात पत्नीसह / पतीसह किंवा सोबत्यासह संयुक्तपणे मुंबई वीजपुरवठा व परिवहन उपक्रम, मुंबई यांच्या बसने, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या सर्व प्रकारच्या बसने किंवा गाडीने विनामूल्य प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे.

नव-नवीन माहिती

हे वाचले का?  HSC 12th results 2021 चा आज निकाल येथे पहा.

१०. बोटीने प्रवास मोफत:

प्रत्येक विद्यमान सदस्यास महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात आगबोटीने प्रवास करण्याचा हक्क आहे.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top