कोविड –१९ च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थिती विचारात घेऊन सन २०२०-२१ – या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा मार्फत आयोजित करण्यात आलेली HSC 12th results इ. १२ वी परीक्षा दि. ११ जून, २०२१ च्या शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आली (HSC 12th results correction).
तदनंतर दि.०२ जुलै २०२१ च्या शासन निर्णयानुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेसाठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून त्यांना गुणपत्रक / प्रमाणपत्र HSC 12th results देण्यासाठी सुधारित मूल्यमापन कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे.
त्यानुसार मंडळा मार्फत सदर मूल्यमापन कार्यपध्दतीच्या अंमलबजावणी बाबत तपशीलवार परिपत्रक, परिशिष्टे तयार करून दि. ०५/०७/२०२१ च्या पत्रा द्वारे सर्व विभागीय मंडळे व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालये यांना पाठविण्यात आली व त्यानुसार निकालाची कार्यवाही करण्यात आली आहे.
तथापि, मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा सन २०२१ च्या संदर्भात रिट याचिका क्र. ६२० / २०२१ दाखल करण्यात आलेली आहे.
सदर याचीकेबाबत मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी दि. २४/०६/२०२१ रोजीच्या निकालानुसार सदर परीक्षेचा निकाल सुधारित मूल्यमापन कार्यपध्दती नुसार जाहीर झाल्यानंतर सदर निकालावर विद्यार्थ्यांना काही आक्षेप किंवा तक्रारी असतील तर त्याच्या निराकरणासाठी मंडळ स्तरावर व्यवस्था निर्माण करण्याबाबत आदेशित केलेले आहे.
त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इ.१२ वी परीक्षेचा सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीनुसार निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना सदर निकालावर काही आक्षेप/तक्रारी असतील तर त्या नोंदविण्यासाठी व त्यांचे निराकरण करण्यासाठी मंडळामार्फत संबंधित विभागीय मंडळ स्तरावर तक्रार निवारण अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यासाठी तक्रार निवारण अधिकारी म्हणून विभागीय मंडळातील विभागीय सहसचिव हे काम पाहतील.
सदर तक्रार निवारण अधिकारी तथा विभागीय सहसचिव यांचे पत्ते, दूरध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी खालीलप्रमाणे आहेत.


संबंधित विद्यार्थी यासंदर्भातील आपला तक्रार अर्ज टपाल/ई-मेल/व्यक्तिशः उपरोक्त तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे सादर करू शकतील.
यासाठी मंडळा मार्फत विहित करण्यात आलेल्या (प्रपत्र-अ) नमून्यात विद्यार्थ्यास अर्ज करावा लागेल. सदर अर्जाचा नमूना विभागीय मंडळ स्तरावर तसेच मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेले आहे.
तक्रार निवारण अधिकारी, कार्यालयीन कामाच्या १० दिवसात सदर अर्ज निकाली काढून विद्यार्थ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने परिपूर्ण वस्तुस्थिती पत्र / ई-मेलद्वारे अवगत करतील. विद्यार्थ्यास सदर उत्तरांच्या अनुषंगाने काही अडचणी असल्यास संबंधित विभागीय मंडळातील विभागीय सचिव/ विभागीय अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधावा.
तरी याबाबतची सर्व प्राचार्य उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी, पालक व इतर सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी.
विद्यार्थींनी करावयाचा तक्रार अर्ज

हे वाचले का?
- आमदार यांचे वेतन, भत्ते आणि सोयी सुविधा(Amdar salary)
- Petrol Pump वरील सुविधा आणि ग्राहकांचे अधिकार शेळी पालन अनुदान (Shelipalan Anudan) 2021 मध्ये घसघशीत वाढ
- श्रावणबाळ योजना (Shravan Bal Yojana) सेवा राज्य निवृत्ती वेतन
- पुतळा उभारणी साठी नियम, अटी परवानगी
- कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा २००५ Domestic Violence act
- पीक कर्ज च्या वसुलीस ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा