क्रेडिट कार्ड चे फायदे:
- क्रेडिट कार्ड च्या वापरामुळे आर्थिक व्यवहाराच्या वेळी बँकेकडून आपल्याला कॅशबॅक किंवा वेगवेगळ्या ऑफर मिळण्यास मदत होते.
- जर आपण घेतलेल्या कार्डची रक्कम वेळेत भरली तर आपला क्रेडिट स्कोर चांगला होतो व त्यामुळे आपल्याला बँकेकडून कर्ज मिळण्यास मदत होते.
- एखाद्या वेळेस आपल्याकडे कॅश उपलब्ध नसेल तर आपण कार्डद्वारे शॉपिंग करू शकतो किंवा कोणतेही बिल भरू शकतो.
- क्रेडिट कार्ड वापरून आपण आपल्या बँक खात्यात असलेल्या रकमे पेक्षा जास्त रक्कम आर्थिक व्यवहारासाठी वापरू शकतो.
- ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने क्रेडिट कार्डच्या वापरामुळे आपले व्यवहार सोयीचे आणि सुरक्षित होतात.
- यूपीआयचा वापर करून क्रेडिट कार्ड द्वारे आपण लाईट बिल किंवा इतर बिल भरू शकतो.
क्रेडिट कार्ड चे तोटे:
- क्रेडिट कार्ड चे फायदे क्रेडिट कार्ड चे जसे फायदे आहेत तसेच काही तोटे आहेत.
- क्रेडिट कार्ड वापरताना बँकेकडून आपल्याला मर्यादित रक्कम वापरण्यास मिळते. त्यापेक्षा जास्त रक्कम आपण वापरू शकत नाही.
- जर आपण क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही, तर बँक त्यावर नियमा नुसार जास्त व्याज आकारू शकते.
- क्रेडिट कार्डचे बिल आपण वेळेवर भरले नाही तर आपलाच क्रेडिट स्कोर वाढत नाही त्यामुळे बँकेकडून आपल्याला कर्ज घेण्यास अडचणी येतात.
- आपण खरेदीला जाताना आपल्या सोबत पैसे नसतात. त्यामुळे आपण खरेदी करताना आपल्या बजेट वरती आपले नियंत्रण राहत नाही. त्यामुळे अवाढव्य खर्च वाढतो.
क्रेडिट कार्ड वापरताना कोणती काळजी घ्यावी?
- क्रेडिट कार्ड वापरताना आपल्या क्रेडिट कार्डची माहिती कोणालाही देऊ नये
- आपला पिन कोणालाही सांगू नये जर आपण आपला पिन कोणा,सोबत शेअर केला तर त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो आणि आपले आर्थिक नुकसान होऊ शकते.
- आपले क्रेडिट कार्ड हरवले तर बँकेला लगेच कळवावे त्यामुळे त्या क्रेडिट कार्डचा गैरवापर होऊ शकणार नाही याची काळजी घ्यावी लागते.
- आपण आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- फळ पिक विमा योजना Pradhanmantri Phal Pik vima Yojana
- Gav Rasta Samiti गाव रस्ते, शेतरस्ते, शिव रस्ते रस्ते मोकळे होणार
- Kanya Van Samruddhi Yojana शेतकऱ्यांना रोपांचे मोफत वाटप
- Police Station Civilian Right नागरिकांचे अधिकार
- Sarpanch Pagar Salary गावाच्या सरपंचाला पगार किती
- कांदा अनुदानासाठी 20 एप्रिल पर्यंत अर्ज करण्याचे पणन महा संचालकांचे आवाहन
- कांदा चाळ अनुदान योजना- पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करावा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.