Department of Women and Child Development महिला व बालविकास विभाग कडून विविध योजना राबविल्या जातात. राज्यात 1 एप्रिल 2023 पासून ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला जात आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ एका छताखाली देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम राबवून प्रत्येक जिल्ह्याला किमान 75 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.
त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात हा कार्यक्रम लवकरच आयोजित केला जात असून त्या अनुषंगाने महिला व बालकल्याण विभागाकडे असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येत असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
येथे क्लिक करून पहा महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना
‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभाग कडून राबविण्यात येणाऱ्या योजनाची माहिती पुढील प्रमाणे देण्यात येत आहे.
Department of Women and Child Development महिला व बालविकास विभाग कडून राबविण्यात येणाऱ्या योजना:
योजना क्रमांक-1 योजनेचे नांव :- इ.5 वी ते 12 वीत शिकत असलेल्या मुलींना सायकली खरेदीचे अनुदान देणे. (सर्वसाधारण घटक)
योजनेचा उद्देश – ग्रामीण भागात एस.टी. ची सोय नसते किंवा शाळेच्या वेळेत एस.टी. नसते. त्यामुळे मुली शाळेत जाऊ शकत नाहीत. चालत जाण्यामुळे बराचसा वेळ वाया जाऊ शकतो. सायकलीमुळे वेळेची बचत होते व मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण थांबते.
लाभार्थी निवडीचे निकष
- लाभार्थी मुलगी ग्रामीण भागातील असावी.
- लाभार्थी मुलगी इयता 5 वी ते 12 वी मध्ये शिकत असली पाहिजे.
- लाभार्थीचे वास्तव्य ते शाळा यातील अंतर कमीत कमी 2 कि.मी. किंवा 1 कि. मी. पेक्षा जास्त असावे.
- अनुदान मर्यादा जिल्हा परिषदे कडील खरेदी समिती निश्चित करेल ती राहील.
येथे क्लिक करून पहा महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना
योजना क्रमांक –2 ग्रामीण भागातील इयत्ता 7 वी ते 12 वी पर्यंत शिकणा-या मुलींना संगणक प्रशिक्षणाकरिता अनुदान देणे.
योजनेचा उद्देश –
ग्रामीण भागातील मुली संगणकाचे ज्ञान घेऊन त्याचे कौशल्य विकसीत करु शकतात. नोकरी व व्यवसायासाठी संगणकाची मदत होते.
लाभार्थी योजनेस पात्र होण्याचे निकष-
- लाभार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असावी.
- लाभार्थी संगणक परीक्षा उत्तीर्ण झालेली असावी.
- लाभार्थी दारिद्रय रेषेच्या कुटुंबातील असावी. अथवा वार्षिक उत्पन्न रु. 120,000/- पर्यंत असावे.
- अनुदान मर्यादा जिल्हा परिषदेकडील खरेदी समिती निश्चित करेल ती राहील.
येथे क्लिक करून पहा महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना
योजना क्रमांक-3 ग्रामीण भागातील अनु-सूचित जातीतील इ.5 वी ते 12 वीत शिकत असलेल्या मुलींना सायकली खरेदीचे अनुदान देणे. (विशेष घटक योजना )
योजनेचा उद्देश- ग्रामीण भागात एस.टी. ची सोय नसते किंवा शाळेच्या वेळेत एस.टी. नसते. त्यामुळे मुली शाळेत जाऊ शकत नाहीत. चालत जाण्यामुळे बराचसा वेळ वाया जाऊ शकतो. सायकलीमुळे वेळेची बचत होते व मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण थांबते.
लाभार्थी निवडीचे निकष:
- लाभार्थी मुलगी ग्रामीण भागातील असावी.
- लाभार्थी मुलगी इयता 5 वी ते 12 वी मध्ये शिकत असली पाहिजे.
- लाभार्थी अनु-जातीतील असलेचा सक्षम प्राधिकारी यांचा जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक.
- लाभार्थीचे वास्तव्य ते शाळा यातील अंतर कमीत कमी 2 कि.मी. किंवा 1 कि. मी. पेक्षा जास्त असावे.
- अनुदान मर्यादा जिल्हा परिषदेकडील खरेदी समिती निश्चित करेल ती राहील.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Abhay Yojana 2023 व्यापार्यांना थकबाकीतून मुक्ती देणारी राज्य कर विभागाची अभय योजना २०२३
- CM Relief Fund Maharashtra मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे; ‘सीएमएमआरएफ’ ॲपवर अर्ज भरून मदत मिळविता येणार |
- Pradhanmantri Mudra Yojana प्रधानमंत्री मुद्रा योजना.
- Lpg Cylinder Accident Insurance घरगुती गॅस सिलिंडरचा अपघात झाल्यास मिळतो 50 लाख रुपयांपर्यंत विमा कवच |
- Blue Chip Fund या फंडामुळे गुंतवणूकदार होणार मालामाल |
- Madh Kendra Yojana मधकेंद्र योजना : सरकार देणार 50% अनुदान | शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची नवी संधी |
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा