Dr. Abdul Kalam Education scheme अल्पसंख्यांक समूहातील विद्यार्थ्यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना या द्वारे शैक्षणिक कर्ज मिळणार आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 7.50 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज मिळते.
या लेखामध्ये आपण बघणार आहोत की या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे आणि कागदपत्रे कोणकोणते लागतात. तसेच अर्ज कसा करायचा. लेख शेवटपर्यंत वाचा आणि आवडल्यास शेअर नक्की करा.
Dr. Abdul Kalam Education scheme डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना काय आहे?
मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाकडून डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज हे अल्पसंख्यांक समूहातील विद्यार्थ्यांना देण्यात येते. जे अल्पसंख्यांक विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांना या योजनेद्वारे शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा लागेल.
व्यवसायिक अभ्यासक्रम
अल्पसंख्यांक समाजातील दहावी आणि बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.
यामध्ये आयटीआय, इंजीनियरिंग, नर्सिंग, पॉलीटेक्निक, मेडिकल, फॅशन डिझाइनिंग, पत्रकारिता, टुरिझम, मास मीडिया, चित्रपट निर्मिती संबंधित विविध व्यावसायिक अभ्यासक्रम, तसेच ॲनिमेशन, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
Dr. Abdul Kalam Education scheme पात्रता:
अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
विद्यार्थ्यांचे वय 16 ते 32 वर्ष असावे.
तसेच कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा शहरी भागासाठी 1,20,000 रुपये यांपेक्षा कमी तर ग्रामीण भागासाठी 98,000 रुपयांपेक्षा कमी असावे.
या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जावरती तीन टक्के व्याजदर आहे.
या कर्जाचे परतफेड ही शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यापासून पुढील पाच वर्षापर्यंत करता येते.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Career After 12th बारावीचा निकाल जाहीर, आता पुढे काय..? जाणून घेऊ या उपलब्ध असलेले विविध कोर्सेस..!!
- PM ShramYogi Mandhan Yojana प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना: काय आहे पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे………!!
- Post Office Scheme 2023 रोज गुंतवा ५० रुपये आणि मिळवा ३५ लाखांचा परतावा… जाणून घेऊया काय आहे योजना..?
- Low Sand Rates स्वस्त दरात मिळणार रेती, घरकुलांना मिळणार गती……….!!
- Education Loan Repayment ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना…..
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
Pingback: PM Matru Vandana Yojana Update केंद्र शासनाच्या या योजनेद्वारे गर्भवती मातांना मिळते आर्थिक सहाय्य | - माहिती असायल