Sayajirao Gaikwad Sarathi Scholarship सयाजीराव गायकवाड – सारथी गुणवंत विद्यार्थी परदेश उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना | जाणून घेऊया संपूर्ण माहिती |

Sayajirao Gaikwad Sarathi Scholarship

Sayajirao Gaikwad Sarathi Scholarship राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असून आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही.

यासाठी राज्य शासनाने आता पदव्युत्तर पदवी, पदविका तसेच पीएचडी अभ्यासक्रमासाठी क्यू वर्ल्ड रँकिंगमध्ये २०० च्या आत रँकिंग असलेल्या शैक्षणिक संस्था, विद्यापीठामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश घेणाऱ्या मराठा प्रवर्गातील एकत्रितपणे ७५ विद्यार्थ्यांसाठी सन २०२३ -२०२४ पासून छत्रपती शाहू महाराज व मानव विकास संस्था (सारथी ) पुणे या संस्थेमार्फत ‘सयाजीराव गायकवाड- सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना’ राबविण्यास मान्यता दिली आहे.

अभियांत्रिकी  पदवी, पदविकेसाठी 20 तर पीएचडीसाठी 5, वास्तुकलाशास्त्र पदवी, पदविकासाठी 4 पीएचडीसाठी 2, व्यवस्थापन पदवी, पदविकेसाठी 2 पीएचडीसाठी 1, विज्ञान पदवी, पदविकासाठी 10 पीएचडीसाठी 5, वाणिज्य /अर्थशास्त्र पदवी, पदविकासाठी 4 पीएचडीसाठी 5, कला पदवी, पदविकासाठी 4 पीएचडीसाठी 5, विधी अभ्यासक्रम पदवी, पदविकासाठी 4 पीएचडीसाठी 1 तसेच औषध निर्माण शास्त्र पदवी, पदविकासाठी 2 तर पीएचडीसाठी 1 असे 50 पदवी, पदविका अभ्यासक्रमासाठी तर 25 पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रत्येक वर्षासाठी शाखानिहाय शिष्यवृत्ती देण्यात येईल.

येथे क्लिक करून पहा या योजनेदवारे विद्यार्थ्यास मिळणारे लाभ

Sayajirao Gaikwad Sarathi Scholarship अशा आहेत अटी व शर्ती

  • लाभार्थी हा मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी व भारतीय नागरिक असावा.
  • विद्यार्थ्यांला परदेशातील क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये 200 च्या आत रॅकींग असलेल्या शैक्षणिक संस्था, विद्यापीठामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश मिळालेला असावा.
  • विद्यार्थ्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज करतांना पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करतांना, पीएचडीसाठी यापूर्वी इतर कोणत्याही राज्य शासनाची अथवा केंद्र सरकारची परदेशी शिष्यवृती घेतलेली नसावी,
  • तसेच त्यांने अन्य प्रशासनिक विभागाच्या परदेशी शिष्यवृत्तीच्या योजनेसाठी अर्ज केलेला नसावा.
  • परदेशातील विद्यापीठ, शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्णवेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा.
  • एक्झीक्युटीव्ह पदव्युत्तर पदवी किंवा एक्झीक्युटीव्ह पदव्युत्तर पदविका व अर्धवेळ अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थी व योजनेसाठी पात्र असणार नाही.
हे वाचले का?  गुंठेवरी एक-दोन गुंठे जमीन खरेदी विक्री बंदी दस्त नोंदणी होणार नाही

येथे क्लिक करून पहा कसा असेल अभ्यासक्रम कालावधी

  • प्रवेशित अभ्यासक्रमासाठी अर्ज करतांना नमूद केलेल्या विहीत कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करणे विद्यार्थ्यांवर बंधनकारक राहील.
  • अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मान्य केली जाणार नाही.
  • पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लाभार्थींना  35 वर्ष आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी कमाल 40 वर्ष वयोमर्यादा असावी.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे ,कुटुंबाचे व विद्यार्थी नोकरी  करीत असल्यास त्याचे स्वत:चे उत्पन्न धरुन सर्व मार्गानी मिळणारे मागील आर्थिक वर्षांतील वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • विद्यार्थी किंवा पालक किंवा दोन्ही नोकरीत असतील तर त्यांचे आयकर विवरणपत्र, फॉम नंबर 16 व सक्षम प्राधिकारी  यांच्याकडील मागील आर्थिक वर्षांचे कुटुंबाचे सर्व मार्गानी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
  • इतर विद्यार्थ्यांसाठी सक्षम प्राधिकारी यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल.
  • परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठामधून किमान 75 टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान 75 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. ही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम त्याने अर्जाच्या दिनांकाला उत्तीर्ण केलेला असावी.
  • या योजनेचा लाभ एका कुटुंबातील एका विद्यार्थ्यास फक्त एकदाच घेता येईल.
  • एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त मुलांना ही शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसे प्रतिज्ञापत्र करुन देणे बंधनकारक असेल.
हे वाचले का?  Vishwakarma Scheme गावकारागिरांना उभारी देणारी विश्वकर्मा योजना…!! कमी व्याजदरात मिळणार 3 लाख रुपयांचे कर्ज |

Sayajirao Gaikwad Sarathi Scholarship हा खर्च अनुज्ञेय नाही

येथे क्लिक करून पहा या योजनेदवारे विद्यार्थ्यास मिळणारे लाभ

  • व्हिसा अर्जावरील खर्च.
  • विद्यार्थ्याच्या कुटुंबातील सदस्यांचा प्रवास व इतर खर्च
  • नियमित शिक्षणाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर कोणत्याही अभ्यासक्रम अथवा प्रशिक्षणावरील खर्च.
  • भाषा प्रशिक्षणावरील खर्च.
  • नियमित अभ्यासक्रमाच्या कालावधीत अतिरिक्त प्रवासाचा खर्च. संशोधन, पुरक शैक्षणिक साहित्य, क्षेत्र भेटी, कार्यशाळा/ सेमिनार, आंतरवसियता यामधील सहभागाचा खर्च.
  • संगणक व तत्सम शैक्षणिक साहित्य.
  • विद्यार्थ्यास वरील लाभ मिळण्यासाठी परदेशातील प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक वेळी उत्तीर्ण होणे बंधनकारक असून, तसे शैक्षणिक संस्था / विद्यापीठाचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, प्रगती अहवाल प्रत्येक सत्रासाठी किंवा सहा महिन्यासाठी सादर करणे अनिवार्य आहे.
  • अपवादात्मक प्रसंगी, निवड समितीमार्फत निवड झालेल्या विद्याथ्र्यांनी / पालकांनी, परदेशी शिक्षण संस्था / विद्यापीठ, शिक्षण फी / इतर अनुज्ञेय फी स्वतः भरलेली असेल, अशा वेळी आवश्यक त्या पावत्या व पुरावे सादर केल्यानंतर, अशी रक्कम विद्यार्थ्यास देय होणाऱ्या शिष्यवृत्तीमधून विद्यार्थ्यांच्या परदेशातील खात्यावर जमा करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
  • विद्यार्थ्यांने भारतात राष्ट्रीयकृत बँकेत व परदेशात अधिकृत बँकेत खाते उघडणे अनिवार्य आहे. त्याच खात्यावर त्यांना देय होणारी शिष्यवृत्ती सीएमपी किंवा आरटीएसजीने अदा केली जाईल.
  • या खात्याचा तपशिल त्याने परदेशात जाऊन प्रवेश घेतल्यानंतर तात्काळ व्यवस्थापकीय संचालक सारथी पुणे यांना सादर करावा.
हे वाचले का?  Sarthi Schemes For NET-SET योजना ‘सारथी’च्या… ‘सारथी’मार्फत नेट, सेट परीक्षेचे दिले जाते मोफत प्रशिक्षण |

येथे क्लिक करून पहा कसा असेल अभ्यासक्रम कालावधी

सदरची योजना नियमावली, अटी व शर्ती नुसार राबविण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे यांना प्राधिकृत करण्यात येत असून त्यांच्या मार्फत राबविण्यात येईल.

परदेशी शिष्यवृत्ती अभ्यासक्रमासाठी गुणवत्ता यादी व निवड यादी तयार करुन विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top