मृत्युपत्र /Death Will म्‍हणजे काय? चला समजून घेऊया!

मृत्युपत्र
मृत्युपत्र
मृत्युपत्र

मृत्युपत्र म्हणजे काय?

एखाद्‍या व्‍यक्‍तीने, त्‍याच्‍या मालकीच्‍या संपत्तीचे वाटप त्‍याच्‍या मृत्‍युनंतर, कसे व्‍हावे याबाबत लेखी स्‍वरूपात घोषित केलेली इच्‍छा म्‍हणजे मृत्‍युपत्र (Death Will). भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम- २ (ह) अन्वये मृत्युपत्र-इच्छापत्राची व्याख्या खालील प्रमाणे दिलेली आहे.

“मृत्युपत्र म्हणजे मृत्युपत्र करणार्‍या व्यक्तीने, त्याच्या मृत्युनंतर त्याच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावावी यासंबंधीची कायदेशीर पध्‍दतीने घोषित केलेली इच्छा होय’’

मृत्‍युपत्र एक असा दस्‍तऐवज आहे जो मयत व्‍यक्‍तीच्‍या इराद्याचीकिंवा इच्‍छांची अंमलबजावणी करण्‍यासाठी, त्‍याच्‍या मागे जिवंत असलेल्‍या व्‍यक्‍तींना दिला जातो. Death Will म्‍हणजे मयत व्‍यक्‍तीची शेवटची इच्‍छा असते. मृत व्यक्तीचा असा इरादा, त्याच्या इच्छेनुसार अत्यंत आदराने आणि पवित्रतेने अंमलात आणला गेला पाहिजे.मृत्‍युपत्राकडे सामान्य दस्तऐवजांपेक्षा वेगळा विशिष्‍ट दस्‍तऐवज म्‍हणून बघितले जावे. मृत्‍युपत्र एक असे घोषणापत्र आहे की ज्‍याव्‍दारे मृत्‍युपत्र करणार्‍याने त्‍याच्‍या मृत्युनंतर करण्‍यात येणार्‍या व्‍यवस्‍थेची इच्छा व्यक्त केलेली असते.

हे वाचले का?  तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियम (Tukadejod Tukde Bandi Adhiniyam)

मृत्युपत्र (Death Will) करणे आवश्यक आहे काय?

कायद्याने मृत्युपत्र करणे आवश्यक नाही, पण भविष्यात आपल्याच वारसदारांमध्ये भांडणे होऊन त्यांचे संबंध बिघडू नयेत म्हणून Death Will करणे केव्हाही चांगले. एकदा माणूस मयत झाल्‍यावर त्याचे वारस कसे वागतील हे सांगता येत नाही. त्‍याने मृत्युपत्र केलेले असल्‍यास अशा भांडणाची शक्यता कमी होऊ शकते.

माणूस आयुष्यभर अधिकाधिक संपत्ती मिळवण्याच्या मागे असतो, काही ठिकाणी तो नामांकनदेखील करतो, पण तेवढेच पुरेसे नसते. माणूस मयत झाल्‍यावर त्याच्या संपत्तीची त्याच्या इच्छेप्रमाणे विभागणी करण्याचे काम Death Will करते. त्याचप्रमाणे ज्यांना त्या संपत्तीतील हिस्सा मिळणार असतो त्यांचेही काम सोपे होते आणि कायदेशीर कामाला लागणारा वेळही वाचू शकतो.

हिंदू धर्मिय व्‍यक्‍तीच्‍या मृत्युपत्राबाबत (Death Will) कायदेशीर तरतुद काय आहे?

 • भारतीय वारसा कायदा, १९२५.
 • भारतीय वारसा कायदा १९२५, भाग ६ मध्‍ये कलम ५७ ते १९० अन्‍वये मृत्‍युपत्राबाबत (Death Will) तरतुदी  दिलेल्‍या आहेत.
 • भारतीय वारसा कायदा १९२५, कलम- २ (एच) अन्वये मृत्युपत्राची व्‍याख्‍या दिली आहे.
 • भारतीय वारसा कायदा १९२५, कलम ५७ म्‍हणजे हिंदू विल्‍स एक्‍ट, १८७० च्‍या कलम २ ची  पुनरावृत्ती आहे. 
 • भारतीय वारसा कायदा १९२५,  भारतातील सर्व धर्मियांना म्हणजे हिंदु, ख्रिश्चन, पारशी, अँग्लो इंडियन्स इत्‍यादिंना लागू होतो. हिंदू या संज्ञेमध्ये बौद्ध, शिख, जैन, ब्राम्‍होसमाजी, आर्यसमाजी, नंबुद्री, लिंगायत यांचाही समावेश होतो व या सर्वांना हा कायदा अंशत: लागू पडतो.
हे वाचले का?  पुतळा उभारणी साठी नियम, अटी परवानगी

मुस्‍लिम धर्मिय लोकांना भारतीय वारसा कायदा१९२५ लागू आहे काय?

मुस्‍लिम धर्मिय लोकांना हा कायदा पूर्णपणे लागू पडत नसला तरी प्रोबेट, लेटर्स ऑफ एडमिनिस्ट्रेशन इ. साठी लागू आहे. जेथे व्यक्तीगत कायद्यानुसार वारसासंबंधी प्रश्न निर्माण होत नाहीत तेथे मृत्युपत्रासाठी भारतीय वारसा कायदा १९२५ च्या तरतुदी लागू होतात. मुस्‍लिम धर्मीयाने मुस्लीम कायद्यानुसार आपले मृत्युपत्र केले असेल तरच ते परिणामक्षम मृत्युपत्र ठरते. मुस्लिम व्यक्तीस स्वतःच्या संपत्तीच्या फक्त १/३ भागाची व्यवस्था मृत्युपत्रान्वये करता येते.

मृत्‍युपत्र स्‍टँप पेपरवरच केलेले असावे काय?

नाही. Death Will साध्या कागदावरही करता येते.

मृत्‍युपत्र नोंदणीकृतच असावे असे बंधन आहे काय?

 • नाही.  मृत्‍युपत्र नोंदणीकृत असावे असे कोणतेही बंधन कायद्यात नाही.
 • नोंदणी अधिनियम १९०८, कलम १८ अन्वये मृत्‍युपत्राची नोंदणी वैकल्पिक आहे. तथापि, Death Will नोंदणी करता येते, रुपये शंभरच्‍या स्‍टँप पेपरवर मृत्युपत्र नोंदणीकृत केलेले असल्यास पुढे कायदेशीर अडचणी उद्भवत नाहीत.

जमा केलेले मृत्युपत्र (Deposited Will) म्‍हणजे काय?

नोंदणी कायदा, १९०८, कलम ४२ अन्‍वये मृत्युपत्र, पाकीटात बंद/सील करुन दुय्‍यम निबंधकाकडे जमा करता येते. याला जमा केलेले Deposited Will म्हणतात.

मृत्युपत्र करण्‍यास सक्षम व्‍यक्‍ती कोण असतात?

भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम- ५९ अन्वये,

 • Death Will करणारी व्यक्ती वयाने सज्ञान असावी तसेच मानसिकदृष्‍ट्‍या सुदृढ असावी, ती दिवाळखोर नसावी.
 • मुक किंवा बधीर किंवा अंध व्‍यक्‍ती, जर त्‍यांना परिणामांची जाणीव असेल तर, मृत्युपत्र करु शकतात.  
 • Death Will स्वसंपादित संपत्तीबाबत तसेच वंशपरंपरेने मिळालेल्या संपत्तीतील फक्त स्वत:च्या हिश्शाबाबत करता येते.
 • हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६, कलम ३० अन्‍वये हिंदू व्‍यक्‍तीला एकत्र कुटुंबाच्‍या मिळकतीमधील स्वत:च्या हिश्शाबाबत मृत्युपत्र करता येते.वेडसर व्‍यक्‍ती, जेव्‍हा वेडाच्‍या भरात नसेल तेव्‍हा मृत्युपत्र करु शकते. परंतु वेडाच्या भरात, नशेत, आजारात, शुद्धीवर नसताना, फसवणुकीने, दबावाखाली करण्यात आलेले मृत्युपत्र विधीग्राह्य असणार नाही.
हे वाचले का?  गुंठेवरी एक-दोन गुंठे जमीन खरेदी विक्री बंदी दस्त नोंदणी होणार नाही

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहन्यायासाठी येथे क्लिक करा

Death Will

3 thoughts on “मृत्युपत्र /Death Will म्‍हणजे काय? चला समजून घेऊया!”

 1. Pingback: माहिती अधिकार कार्यकर्ता मेळावा पुणे येथे संपन्न » RTI Today

 2. Pingback: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 50 हजार मिळणार GR - माहिती असायलाच हवी

 3. Pingback: RTI महासंघची मागणी प्रत्येक शासकीय कार्यालयात शासनाच्या सर्व परिपत्रकांची काटेकोर अंमलबजावणी क

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.