Grampanchayat Office ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? चला समजून घेऊया..!

Grampanchayat office

Grampanchayat Office ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? ग्रामपंचायतीची कामे:- 

Grampanchayat Office ग्रामपंचायतींनी त्यांच्या कार्यक्षेत्रात शेतीसाठी पाणीपुरवठा व स्वच्छता, रस्ते, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, गावातील पथदिवे इत्यादी सुविधा पुरविणे सामाजिक आर्थिक सांस्कृतिक मागासवर्गीय कल्याण महिला व बालकल्याण विविध उपक्रम हाती घेणे बंधनकारक आहे. ग्रामपंचायत हद्दीतील जन्म-मृत्यू, उपजत, मृत्यू विवाह इत्यादींच्या नोंदी घेणे, शासनाने विहित केलेल्या वेळापत्रकानुसार व गावातील ग्रामस्थांच्या निकडीनुसार ग्रामसभा घेणे क्रमप्राप्त आहे.

अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रात मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ व त्याअंतर्गत केलेले नियम यानुसार ग्रामपंचायतीने काम करणे बंधनकारक आहे.

ग्रामस्थांनी मागणी केल्यानुसार ग्रामसभेची व ग्रामपंचायतीच्या ठरावांच्या प्रत सात दिवसात देणे बंधनकारक आहे. याव्यतिरिक्त केंद्र शासन राज्य शासन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांनी ग्रामपंचायतीकडे सोपवलेली योजनांची अंमलबजावणी करणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे.

आता ग्रामपंचायतीत संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) केंद्रावरून ग्रामस्थांना नाममात्र रुपये रु.२० विविध अर्जांचे नमुने व त्या मागणीनुसार दाखले देण्याचे प्रायोगिक काम सुरू झाले आहे. ग्रामपंचायतीकडून देण्यात येणाऱ्या दाखल्यांसाठी शासनाकडून आकरण्यात येणारी फी जमा करणे आवश्यक आहे तसेच जमा रकमेची पावती घेणे योग्य राहील. ग्रामपंचायतीशी संबंधित काही कामाची माहिती व त्यांच्या कार्यपूर्ती चा कालावधी यांची माहिती खालील नमूद केली आहे

अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा


ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? या विषयावरील व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

ग्रामपंचायत कार्यालय सरपंचांची कर्तव्ये:-

अधिनियमानुसार सरपंच यांनी कार्यकारी शक्ती प्रदान केली असून ते ग्रामपंचायतींचे प्रशासकीय प्रमुख म्हणून कामकाज पाहतातो. सरपंच पंचायतीच्या सभेचे विनियमन करेल व पद पंचायतीच्या सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी केली कृती व कार्यवाहीवर देखरेख व नियंत्रण ठेवेल.

अधिनियमानुसार आवश्यक असलेली सर्व विवरणे व अहवाल तयार ठेवण्याची व्यवस्था करेल. अधिनियमानुसार तसेच शासनाच्या आणि दिशानिर्देश खाली देणे आवश्यक असते तशी प्राप्ती प्रमाणपत्रे आपल्या सहीने व पंचायतींच्या मुद्रेने देतील. प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून अन्य कार्य पार पाडेल.गाव पातळीवर विविध विकास कामे अभियान व योजनेत लोकांचा सहभाग घेऊन गाव समृद्ध करण्याचा प्रयत्न केले.

अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ग्राम सेवकाची कामे:-

ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम पाहतो. ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते?

  • ग्रामसभेच्या व मासिक सभेचा अनुषंगे ग्रामसभा व मासिक सभेसमोर जमा व खर्च मंजुरीसाठी ठेवणे.
  • विविध स्वरूपाचे ग्रामस्थांना दाखले देणे
  • ग्रामपंचायत हद्दीतील वेगवेगळी कर वसूल करणे त्यांची नोंद घेऊन कराची रक्कम बँकेत भरणे आगामी वर्षासाठी karachi मागणी तयार करून मागणी देयके पाठवणे.

अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

  • ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक विहित मुदतीत अधिनियमानुसार तयार करून पंचायत समितीकडे सादर करणे. गावातील 
  • पिकावरील विविध रोगाबाबत ग्रामस्थांना जाहीर दवंडीद्वारे माहिती देणे.
  • रोगप्रतिबंधक उपयोजना करणे, पुरेसा TCLसाठा ठेवणे व त्यांचा पाणी शुद्धीकरणासाठी नियमित वापर करणे.
  • साथीच्या आजारांबाबत प्राथमिक माहिती आरोग्याधिकारी व गट विकास अधिकारी यांना देणे.
  • गावातील पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरूस्ती व यंत्रणा व्यवस्थित ठेवणे.
  • जन्म-मृत्यू उपजत मृत्यू व विवाह यांची नोंदणी करणे व त्या अनुषंगाने निबंधक म्हणून काम पहाणे.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top