Krushi Mitra Karj Yojana कृषी मित्र कर्ज योजना शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणार कर्ज…..!

कृषी कर्ज मित्र योजना

Krushi Mitra Karj Yojana शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामा करिता बँकांकडून किंवा सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते. शेतकरी साधारणपणे मध्य व दीर्घ मुदतीचे पीक कर्ज घेतात. हे कर्ज घेत असताना शेतकऱ्यांना सातबारा उतार्‍यापासून ते बँकांचे ना-हरकत प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे गोळा करावी लागतात. यासाठी बराच कालावधी जातो. केवळ कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे वेळेत कर्ज मिळत नाही. कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड गावे लागते.  

आज आपण या लेखात कृषी मित्र कर्ज योजना बद्दल माहिती घेणार आहोत. लेख शेवटपर्यंत वाचा आणि आवडल्यास नक्की शेअर करा.

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना वेळेत व सुलभ कर्ज उपलब्ध व्हावे, या दृष्टीने कृषी कर्ज मित्र योजना राबविण्यात येते. 

मृत्युपत्र /Death Will म्‍हणजे काय? चला समजून घेऊया!

शेतकऱ्यांना कृषी कर्जाची उपलब्धता सहजतेने व विना विलंब होण्यासाठी सहाय्य करणे व त्याद्वारे भांडवलाची गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राचा विकास साधने हा या योजनेचा उद्देश आहे.

हे वाचले का?  Social Welfare Schemes जाणून घेऊया समाज कल्याण विभागाच्या विविध योजना…..!!

Krushi Mitra Karj Yojana कृषी कर्ज मित्र योजनेचे स्वरूप:

दरवर्षी खरीप रब्बी हंगामामध्ये शेतकरी पीक कर्ज घेत असतात. काही वेळेस तेच तेच लाभार्थी वेगवेगळ्या बाबींसाठी कर्ज घेत असतात. त्यामुळे त्यांच्या शेती क्षेत्रात विकास होतो. पण या शेतकर्‍यांव्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची इच्छा आहे, परंतु कर्ज प्रक्रियेचे अज्ञान असल्यामुळे व वेळेचा अभावामुळे कर्ज मिळणे शक्य होत नाही.

तुकडेबंदी कायदामधील महत्त्वाच्या तरतुदी

अशा इच्छुक व पात्र शेतकऱ्यांना कृषी कर्ज सहज सुलभतेने त्यांच्या मागणीनुसार वेळेत उपलब्ध होण्यासाठी त्यांना प्रशिक्षित स्वयंसेवकाची मदत होते. ही बाब लक्षात घेऊन कृषी कर्ज मित्र यांच्या मदतीने गरजू पात्र शेतकऱ्यांस ज्या बाबीसाठीचे कर्ज आवश्यक आहे, अशी प्रकरणे कृषी कर्ज मित्र यांच्या सहाय्याने तयार केल्यास शेतकऱ्यांस वेळेत कर्ज उपलब्ध होते.

प्रतिप्रकरण सेवा शुल्काचा दर:

अल्पमुदतीचे कर्ज:

प्रथमता पीक कर्ज घेणारा शेतकरी: प्रति प्रकरण सेवा शुल्क रुपये 150

हे वाचले का?  Best Saving Schemes या आहेत बचतीसाठी सर्वोत्तम योजना | मिळते आकर्षक व्याज |

मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज:

  • नवीन कर्ज प्रकरण: प्रती प्रकरण सेवा शुल्क रुपये 250
  • कर्ज प्रकरणाचे नूतनीकरण: प्रतिप्रकरण सेवा शुल्क रुपये 200

शेती कुंपण योजना वन्य प्राण्यांमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी चेन लिंक फेन्सिंग उभारणीची योजना.

कृषी कर्ज मित्र नोंदणी:

  • कृषी कर्ज मित्र म्हणून सेवा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी
  • नोंदणी झालेल्या इच्छुक व्यक्तींची यादी तयार करून त्यास कृषी समितीची मान्यता घेण्यात येईल
  • जिल्हा परिषदे कडील कृषी समितीस अंतिम निवडीचे अधिकार राहतील

कृषी कर्ज मित्राने ज्या शेतकऱ्यांना कृषी कर्जाची आवश्यकता आहे, त्यांना भेटी देऊन कर्ज प्रकरणाच्या कार्यपद्धतीचे सविस्तर माहिती द्यावी. कृषी कर्ज मित्र कर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे गोळा करून शेतकऱ्यांच्या संमतीने कर्ज प्रकरण तयार करून मंजुरीसाठी बँकेमध्ये सादर करतात. कृषी कर्ज मित्र हे बँक व शेतकरी यांच्यामधील मध्यस्ताच्या भूमिका ऐवजी सहाय्यक व सल्लागाराची भूमिका बजावतात.

हे वाचले का?  1 rupaya pik vima १ रुपया भरून शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top