MGNREGA चला जाणून घेऊ या काय आहे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना

MGNREGA

MGNREGA महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या लाभार्थ्यांसाठी शंभर दिवस काम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे, व त्यानंतरची राज्य सरकारची आहे.

या लेखात आपण महात्मा गांधी रोजगार हमी योजना याबद्दल माहिती घेणार आहोत. लेख शेवटपर्यंत पूर्ण वाचा व आवडल्यास नक्की शेअर करा.

जॉब कार्ड साठीची पात्रता व ते कसे काढावे त्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेचे संपूर्ण काम हे संगणकीकृत असून लाभार्थ्यांनी केलेल्या कामाची मजुरी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सार्वजनिक कामे घेता येतात, तसेच वैयक्तिक देखील कामे घेता येतात.

उद्दिष्ट: बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे हो हे महाराष्ट्र महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे उद्दिष्ट आहे.

MGNREGA काम मागणीची पद्धत:

  • काम मागणीसाठी अर्ज नमुना क्रमांक चार भरून द्यावा लागतो.
  • त्याचबरोबर आपला जॉब कार्ड ची माहिती भरावी लागते.
हे वाचले का?  Indian Penal Code हुंडा प्रतिबंधक कायदा |

कामाची मागणी केल्यानंतर पंधरा दिवसांत काम उपलब्ध करून दिले जाते. जर काम उपलब्ध करून दिले गेले नाही तर बेरोजगार भत्ता दिला जातो.

जॉब कार्ड साठीची पात्रता व ते कसे काढावे त्यासाठी येथे क्लिक करा

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक कामे मिळवण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:

  • विहित नमुन्यातील अर्ज
  • आपल्या जॉब कार्ड ची संपूर्ण माहिती
  • गावातील ग्रामसभेची मान्यता
  • संबंधित कामासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे

मजुरी अदा करण्याची पद्धत:

मजुराने जॉब कार्ड काढताना जे बँक पासबुकची झेरॉक्स दिलेली आहे त्यात किंवा आधार लिंक केलेला असल्यास आधार बेस पेमेंट द्वारे बँकेमध्ये ई-मस्टर चा कालावधी संपल्यानंतर आठ दिवसात मजुरी थेट खात्यात जमा होते. वैयक्तिक कामांबाबतची मजुरी ही देखील थेट जमा होते. तसेच सार्वजनिक कामांची मजुरी ही संबंधित जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या खात्यात जमा होते व त्यानंतर मजुरांना दिली जाते.

हे वाचले का?  Mediclaim मध्ये PPE Kit & Biomedical waste परतावा देणे बंधनकारक

जॉब कार्ड साठीची पात्रता व ते कसे काढावे त्यासाठी येथे क्लिक करा

MGNREGA या योजनेअंतर्गत केली जाणारी कामे:

वैयक्तिक कामे, सिंचन विहिरी, शौचालय, शेततळे, कुक्कुटपालन शेड, जल संधारणाची कामे, जनावरांचा गोठा.

तसेच विहिरी, पाझर तलाव, गाव तलावातील गाळ काढणे, फळबाग लागवड करणे, पायवाटा तयार करणे, रेशीम उत्पादन/ रोप माळा वनीकरण करणे, पशु संवर्धनाची काम करणे, जल व घन कचरा व्यवस्थापन करणे, खत निर्मिती करणे, गावात वृक्ष लागवड करणे, स्वच्छता गृह बांधकाम करणे, मत्स्य व्यवसायाला चालना देण्याकरिता पायाभूत सुविधा निर्माण करणे, यासारखी काम देऊन रोजगार निर्माण केला जातो

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. Grampanchayat Office ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? चला समजून घेऊया..!
  2. Gav Rasta Samiti गाव रस्ते, शेतरस्ते, शिव रस्ते रस्ते मोकळे होणार
  3. office delay act दप्तर दिरंगाई कायदा 2006
  4. Bandhkam Parvana Gram Panchayat ग्रामपंचायत मध्येच मिळणार बांधकाम परवानगी
  5. Ration Card Type शिधापत्रिका/ रेशनकार्ड चे प्रकार: पिवळे, केशरी आणि सफेद
हे वाचले का?  Gharkul Jamin Yojana जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ प्राधान्याने

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top