MJPJAY महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे.
पूर्वी ही योजना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने ओळखली जायची. या योजनेअंतर्गत काही आजारांवर शासकीय व खाजगी रुग्णालयांनी मार्फत पात्र रेशन कार्ड धारक व काही लाभार्थी ना नि:शुल्क सेवा पुरवण्यात येते.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना पात्रता
सुरुवातीला ही योजना आठ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत होती. त्यानंतर 21 नोव्हेंबर 2013 पासून उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये राबवणे येते आहे. 14 डिसेंबर 2020 पासून या योजनेचे नाव बदलून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे करण्यात आले आहे. 1 एप्रिल 2020 पासून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रित राबवण्यात येत आहे.
या लेखात आपण महात्मा फुले जन आरोग्य योजनेची माहिती घेणार आहोत. लेख आवडला तर नक्की शेअर करा.
विमा कंपनी:
दिनांक 1 एप्रिल 2020 पासून एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत- प्रधान मंत्री जन आरोग्य योजना सार्वजनिक क्षेत्रातील यूनायटेड इंडिया इन्शुरस या कंपनी मार्फत राबवण्यात येत आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना पात्रता
MJPJAY लाभार्थी:
गट-अ – पिवळी शिधापत्रिका, अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका, अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंब.
गट-ब : अवर्षणग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबे.
गट- क: 1. शासकीय अनाथ आश्रमातील मुळे, शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक. 2. माहिती व जनसंपर्क कार्यालयातील निकषानुसार पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबातील सदस्य. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी बांधकाम कामगार व त्यांची कुटुंब.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना पात्रता
वार्षिक विमा संरक्षण मर्यादा:
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत एका वर्षात लाभार्थ्यावरती प्रति कुटुंब रुपये एक लाख पन्नास हजार पर्यंत झालेल्या सर्व रुग्णालयीन खर्चाचा समावेश होतो. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी खर्चाचे मर्यादा प्रति पॉलिसी वर्षात दोन लाख पन्नास हजार इतकी वाढवण्यात येते. योजनेचा लाभ कुटुंबातील एकाला किंवा सर्व सदस्यांना घेता येतो.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Bandhkam Parvana Gram Panchayat ग्रामपंचायत मध्येच मिळणार बांधकाम परवानगी
- Ration Card Type शिधापत्रिका/ रेशनकार्ड चे प्रकार: पिवळे, केशरी आणि सफेद
- traffic Police वाहतूक पोलिसांना गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे का….?
- Educational Loan मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठीयेथे क्लिक करा.