PM Matru Vandana Yojana प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मातृ वंदना योजना १ जानेवारी, २०१७ पासून सुरू केलेली आहे. ही योजना केंद्र सरकारची आहे. महिला व बाल विकास मंत्रालय आणि समाज कल्याण विभागा मार्फत ही योजना राबविली जाते. मातृ वंदना योजना संपूर्ण देशभरामध्ये राबविली जात आहे.
गर्भवती आणि मुलांना स्तनपान देणाऱ्या मातांसाठी ही योजना राबविली जात आहे. गर्भवती आणि स्तनदा मातांना पोषक आहार मिळावा, तसेच नवजात बालकांचे योग्य प्रकारे लसीकरण व्हावे, माता आणि बालकांचे स्वास्थ्य चांगले राहावे, हा या योजनेचा हेतू आहे.
कुपोषित गर्भवतींच्या बालकांचे वजन कमी असते, त्यामुळे नवजात बालकांचा मृत्युदरही जास्त आहे. हे चक्र लक्षात घेऊन मातेलाच पोषक पूरक आहार देण्यात येणार आहे. कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी गर्भवती महिला काम करतात, त्यांच्या वेतनाचे होणारे नुकसान लक्षात घेऊन गर्भवतींच्या थेट बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येत आहे.
PM Matru Vandana Yojana अशी मिळणार मदत:
गर्भवतींना मातृ वंदना योजने अंतर्गत मिळणारी मदत ही तीन हप्त्यांमध्ये दिली जात आहे. यामध्ये एकूण ५००० रुपयांची मदत दिली जाते.
- पहिला हप्ता: पहिला हप्ता गर्भारपणातील पहिल्या तीन महिन्यात देण्यात येत आहे. पहिल्या तीन महिन्यात आरोग्य केंद्रात किंवा अंगणवाडी मध्ये नाव नोंदणी करावी लागणार आहे. पहिल्या हप्त्यात १००० रुपये इतकी रक्कम मिळते.
- दुसरा हप्ता: गर्भधारणेच्या ६ महिन्यांनंतर दूसरा हप्ता मिळतो. या मध्ये रुपये २००० ची मदत मिळते.
- तिसरा हप्ता तिसरा हप्ता मुलांच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरण केल्यानंतर मिळतो. तिसऱ्या हप्त्यामध्ये २००० रुपये इतकी रक्कम मिळते.
PM Kusum Solar Scheme शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी….. सौर कृषी पंप अर्जासाठी अंतिम मुदत नाही….!!
योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:
- बँक खात्याचा तपशील.
- मोबाइल नंबर- मोबाइल नंबर आधार कार्ड सोबत लिंक असावा
- माता-बाल संरक्षण कार्ड (MCP कार्ड)
- लाभार्थी आणि तिचा पाती यांचा ओळखीचा पुरावा(दोघांचे आधार कार्ड किंवा ओळखपत्र)
- दुसऱ्या हप्त्याच्या लाभ घेण्यासाठी गर्भधारणेच्या ६ महिन्यांनंतर एक प्रसूतिपूर्व तपासणी दाखवणारी mcp कार्ड ची झेरॉक्स.
- तिसऱ्या हप्त्याच्या लाभ घेण्यासाठी लाभार्थी कडून मुलाची जन्म नोंदणी प्रत आणि लसीकरणाची पहिली फेरी पूर्ण असल्याची mcp कार्ड ची झेरॉक्स.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलांना बँकेत अथवा पोस्ट ऑफिस मध्ये आपले बँक खाते उघडणे आवश्यक आहे व ते आधार कार्डशी जोडलेले असले पाहिजे
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Atal Pension Yojana 2023 माहिती करून घेऊया अटल पेंशन योजना बद्दल….काय आहे आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता..?
- MSRTC Scheme पूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा फक्त १,१०० रुपयात….. एसटी महामंडळाची ‘आवडेल तिथे प्रवास योजना’!!!
- Post Office Scheme 2023 रोज गुंतवा ५० रुपये आणि मिळवा ३५ लाखांचा परतावा… जाणून घेऊया काय आहे योजना..?
- Low Sand Rates स्वस्त दरात मिळणार रेती, घरकुलांना मिळणार गती……….!!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.