Pradhanmantri Mudra Yojana PM मुद्रा कर्ज योजना याबद्दल तर तुम्ही ऐकलेलेच असेल आज आम्ही तुम्हाला याच योजने बद्दल माहिती आणली आहे. ही माहिती शेवटपर्यंत वाचा.
Pradhanmantri Mudra Yojana PM मुद्रा कर्ज योजना :
मित्रांनो, जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तुम्हाला भांडवल कसे जमवावे याचा प्रश्न पडला असेल, तर ही बातमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. आता केंद्र सरकारच्या प्रधान मंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमचे स्वतः व्यवसाय टाकण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. या योजने अंतर्गत तुम्हाला दहा लाखापर्यंतचे कर्ज मिळणार आहे.
प्रधानमंत्री मुद्रा योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. बिगर-कॉर्पोरेट आणि बिगर-शेती लघु / सूक्ष्म उद्योगांना 10 लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट सरकारचे आहे. ही पीएम मुद्रा कर्ज योजना आठ एप्रिल 2015 रोजी पंतप्रधान मोदींनी सुरू केलेली होती.
आवश्यक कागदपत्रे येथे क्लिक करून पहा
सरकारी आकडेवारीनुसार ही योजना सुरू झाल्यापासून सात वर्षांमध्ये या योजनेअंतर्गत 18.60 लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आलेले आहे. या कर्जासाठी एकूण 34.42 कोटींहून अधिक कर्ज खाते उघडण्यात आलेली आहेत.
तसे म्हटले तर भारतात ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांची लोकसंख्या मोठी आहे मात्र संसाधनांच्या कमतरतेमुळे हे होत नाही. हीच पोकळी भरून काढण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना आणलेली आहे.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा तपशील :
प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत देशातील नागरिकांना या कर्जासाठी कोणतीही हमी न देता कर्ज दिले जाते. यासाठी तुमच्याकडून कर्जासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही.
तुम्ही कर्ज घेता तेव्हा तुम्हाला मुद्रा कार्ड मिळते.
आवश्यक कागदपत्रे येथे क्लिक करून पहा
या कार्डच्या मदतीने तुम्ही व्यवसायाशी संबंधित खर्च करू शकता. हे कार्ड डेबिट कार्ड म्हणून वापरले जाऊ शकते. या योजनेअंतर्गत तुम्हाला छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते.
हे कर्ज बिगर कॉर्पोरेट आणि बिगर कृषी कारणांसाठी दिले जाते. आपल्या देशामध्ये स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत तुम्ही 50 हजार ते 10 लाख रुपये पर्यंतच्या कर्जाचा लाभ घेऊ शकता.
तुम्हालाही ही योजना सुरू करायची असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे :
या योजनेसाठी तुमचे वय 18 पूर्ण असणे आवश्यक आहे.
पीएम मुद्रा कर्ज योजनेचा अर्जदार कोणत्याही बँकेमध्ये डिफॉल्टर असेल तर त्याला या कर्ज योजनेचा लाभ मिळणार नाही.
तीन प्रकारचे कर्ज :
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत बँका, नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC) आणि लघु वित्तीय संस्था (MFI) इत्यादींद्वारे 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे. या योजनेमध्ये ‘शिशू’, ‘किशोर’ आणि ‘तरुण’. या तीन श्रेणीमध्ये कर्ज दिले जाते.
शिशु कर्ज योजना :
या योजनेअंतर्गत दुकान उघडण्यासाठी 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज घेता येते.
आवश्यक कागदपत्रे येथे क्लिक करून पहा
किशोर कर्ज योजना :
या योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम 50 हजार ते पाच लाख रुपये एवढी निश्चित करण्यात आलेली आहे.
तरुण कर्ज योजना :
जर तुम्हाला लघुउद्योग सुरू करायचा असेल तर तरुण कर्ज योजनेअंतर्गत तुम्हाला 5 लाख ते 10 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- NPCIL Bharati March न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., पालघर मध्ये भरती सुरू!!!
- Indian Post Bharti भारतीय पोस्ट मध्ये नवीन भरती सुरू, लवकर करा अर्ज…
- Delhi High Court Recruitment ‘दिल्ली उच्च न्यायालया’ मध्ये भरती सुरू, पदवीधरांना सुवर्णसंधी !!!
- ST Pravas Savalat एसटी महामंडळाचा महिलांसाठी मोठा निर्णय…एस टी प्रवासात 50 % सवलत
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
Pingback: Vishwakarma Yojana बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजना - माहिती