Public Provident Fund भविष्य निर्वाह निधी योजना:
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी १९६८ मध्ये सुरू करण्यात आला. भविष्य निर्वाह निधी गुंतवणुकीच्या स्वरूपात लहान बचत एकत्र करून परतावा मिळवण्याचे उद्देशाने सुरू करण्यात आला.
हे एक बचतीसह कर गुंतवणुकीचे साधन आहे. कर वाचविण्यासाठी आणि खात्रीशीर परतावा मिळविण्यासाठी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत असलेल्या व्यक्तींपैकी कोणतीही व्यक्ती पीपीएफ खाते उघडू शकते.
हे आहेत पीपीएफ खाते पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हा एक दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय आहे. यामध्ये आकर्षक व्याज दर त्याच बरोबर गुंतवणूक केलेल्या रकमेवरती खात्रीशीर परतावा मिळतो.
यामध्ये जे व्याज मिळते ते आणि मिळणारा परतावा हा कर पात्र नसतो. जोखीम मुक्त परतावा, निश्चित उत्पन्नाची हमी, तसेच कर वजावट आणि करमुक्त लाभ हे पीपीएफ खात्याचे फायदे आहेत.
ज्या व्यक्तींची जोखीम सोसण्याची क्षमता कमी असते, त्या व्यक्तींसाठी पीपीएफ खाते हा सर्वोत्तम गुंतवणुकीचा पर्याय ठरतो. यामधील गुंतवणूक ही बाजाराशी संबंधित नाही. योजना पीपीएफ योजना ही सरकार संबंधित योजना आहे.
हे आहेत पीपीएफ खाते पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
पीपीएफ खात्याचा कार्यकाळ हा पंधरा वर्षांचा असतो. जो खाते धारकाच्या इच्छेनुसार पाच वर्षांनी वाढवला जाऊ शकतो. पीपीएफ खात्यामध्ये प्रत्येक आर्थिक वर्षांमध्ये कमीत कमी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते.
ही गुंतवणूक एक रकमी करता येते किंवा बारा हप्त्यांमध्ये ही करता येते. पीपीएफ खाते उघडताना फक्त शंभर रूपयांमध्ये खाते उघडले जाते. पीपीएफ खात्यामध्ये ठेव ही चेक, रोख किंवा डीडी किंवा ऑनलाइन फंड ट्रान्सफर च्या माध्यमातून केली जाऊ शकते.
पीपीएफ खाते धारक खाते उघडताना किंवा त्यानंतर आपल्या खात्यासाठी कोणालाही नामनिर्देशित करू शकतो. पीपीएफ खाते हे संयुक्तपणे उघडता येत नाही. एकाच व्यक्तीला ते खाते उघडता येते.
हे आहेत पीपीएफ खाते पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
Public Provident Fund पीपीएफ खात्यावरती कर्ज
जर पीपीएफ खात्यावरती खाते धारकाला कर्ज घ्यायचे असेल, तर तीन आणि सहा वर्षाच्या दरम्यान कर्ज घेता येते. कर्जाची मुदत ही तीन वर्षांपर्यंत असते.
एकूण रकमेच्या 25% रक्कम ही कर्ज म्हणून मिळू शकते. जेव्हा पहिल्या कर्जाची पूर्ण परत फेड होते. त्यावेळेस सहाव्या वर्षा पूर्वी दुसरे कर्ज घेतले जाऊ शकते.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Aadhar Card असे डाऊनलोड करा हरवलेले आधारकार्ड…..!
- Shaikshanik Dhoran नवीन शैक्षणिक धोरण चालू होणार यावर्षीपासून…
- Health Insurance Sub Limit जाणून घेऊया काय आहे हेल्थ इन्शुरन्स सब लिमिट…..
- Cashless Mediclaim समजून घेऊ या कॅशलेस विमा पॉलिसी..!
- MJPJAY जाणून घेऊ या, काय आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना..?
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.