Retirement Planning नोकरी करत असलेल्या काही व्यक्तींनी नोकरी संपल्यानंतर काय करायचे या बाबत काहीच निश्चित केलेले नसते. नोकरी असते त्या काळात आपण मिळणार्या पगारातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. परंतु नोकरी संपल्यानंतर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करणार याबद्दल सुद्धा कोणताही विचार केलेला नसतो. नोकरी वरुण निवृत्त झाल्यानंतर या गोष्टींचा विचार करू आणि नियोजन करू, असे विचार करणे हे चुकीचे आहे. निवृत्तिनंतरच्या काळातील गरजांचा आताच विचार करून त्यासाठी योग्य ती पूर्व तयारी करून ठेवावी लागते. तरच निवृत्ती नंतरचे आयुष्य सुखकर जाते.
Retirement Planning लवकर सुरू करा गुंतवणूक:
आपले निवृत्ती नंतरचे आयुष्य सुखा समाधानात घालविता जावे यासाठी पैसे बाजूला काढून ठेवणी किंवा बचत करणे यासाठी लवकरात लवकर सुरुवात केली पाहिजे. गुतवणूक करण्यासाठी मिळकत वाढण्याची वाट बघत बसू नये. पहिल्या पासून च तुम्ही तुमच्या भविष्यासाठी काही रक्कम बचत कारण ठेवणे सुरू केले पाहिजे.
ठराविक लक्ष्य निश्चित करा:
ज्यावेळी तुम्ही नोकरी वरुण निवृत्त होणार त्यावेळी असलेली असलेली आर्थिक परिस्थिती, तुमच्यावर अवलंबून आलेल्या व्यक्ति किती आहे आणि या सर्वांचे खर्च किती असेल याचा विचार करून तुमच्या कडे किती रक्कम बचत केलेली असावी, हे ठरवले पाहिजे. त्यानुसार सुरुवातीपासून नियोजन केलेले असायला हवे.
सरकारी योजनांचा लाभ घ्यावा:
भविष्यासाठी गुंतवणूक करायचे असल्यास गुंतवणुकीसाठी सरकारी योजनांना प्राधान्य द्यावे. शासनाकडून गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात.
व्यक्तिगत भविष्य निर्वाह निधी तसेच नॅशनल पेंशन योजना यासारख्या सरकारी योजनांमध्ये अवश्य गुंतवणूक करावी.
यामधून तुम्हाला अखेरीस एक मोठी रक्कम हातात मिळे. सरकारी योजना असल्यामुळे गुंतवणूक केलेले पैसे बुडण्याची शक्यता कमी असते.
Senior Citizen Saving Scheme ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची योजना…. बघूया काय आहे योजना..
गुंतवणूक प्लान सतत तपासत राहा(Retirement Planning):
भविष्याचा विचार करून केलेली गुंतवणूक निवृत्ती नंतरच्या काळासाठी पुरेशी आहे की नाही, तसेच् यामध्ये काही वाढ करायला हवी का, हे सतत तपासून बघायला हवे.
एसआयपी, म्युचुयल फंड यामध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल की नाही, याचा विचार करणे गरजेचे आहे.
तुम्ही गुंतवणूक केलेल्या योजनेमधून मिळणाऱ्या परताव्यापेक्षा अधिक परतावा देणारी योजना आहे की नाही, याची देखील पडताळणी करणे गरजेचे आहे.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- How To Get Business Loan? नवीन व्यावसायिकांना बँकेकडून कर्ज कसे मिळेल?
- Loan Borrower Rights कर्जदार म्हणून तुमचे कोणते अधिकार आहेत..?
- Title Clear Property ‘टायटल क्लिअर’ जमीन म्हणजे नेमकं काय?
- MJPJAY जाणून घेऊ या, काय आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना..?
- Fixed deposit फिक्स डिपॉझिट म्हणजे काय? फिक्स डिपॉझिट करताना या गोष्टी ठेवा लक्षात…..
- Flood Damage Insurance पावसाच्या पुरामध्ये गाडी खराब झाली किंवा वाहून गेली तर, भरपाई कशी मिळेल?
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा