Gram Panchayat Tax Online घरपट्टी, पाणीपट्टी भरता येणार मोबाइल वर | असा भरा टॅक्स ऑनलाइन |

20230816 223039

Gram Panchayat Tax Online शासकीय कामात पारदर्शकता यावी, तसेच शासकीय करयालयातील कामकाज हे पेपरलेस व्हावे, यासाठी केंद्र शासन वेळोवेळी प्रयत्न करत असते.

केंद्र सरकारच्या या प्रयत्नांमुळे बरेच कर आपल्याला ऑनलाइन भरता येतात. गावामध्ये घरपट्टी, पाणीपट्टी यासारखे इतर कर भरण्यासाठी ग्राम पंचायती मध्ये जावे लागायचे. परंतु आता हे कर भरण्यासाठी ग्राम पंचायती मध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही. हे कर आपण घरबसल्या आपल्या मोबाइल वर भरू शकतो.

ग्रामसभा आमचा हक्क आमचा आवाज! लोकशाही नको आता लोकसहभाग शाही हवी..!

ग्रामपंचायत कर ऑनलाइन पद्धतीने भरता यावे यासाठी शासनाकडून Maha E Gram Website व citizen app सुरू करण्यात आले आहे.

Gram Panchayat Tax Online महा ई ग्राम पोर्टल वर भरता येणार टॅक्स:

आपल्या महाराष्ट्र राज्यातील ग्राम पंचायतींचे कामकाज पेपरलेस झाले आहे. पूर्वी घरपट्टी, पाणीपट्टी, पडसर कर, इमारतीवरील कर, आरोग्य कर, दिवाबत्ती कर हे भरण्यासाठी ग्राम पंचायत कार्यालयामध्ये जावे लागायचे. परंतु आता हे सर्व कर महा ई ग्राम पोर्टल वर भरता येणार आहे.

हे वाचले का?  ग्रामपंचायतीचे विभाजन नवीन किंवा स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापना

ग्रामपंचायतीचे विभाजन नवीन किंवा स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापना

कर भरण्यासोबत या सुविधा सुद्धा मिळणार

महा ई ग्राम अॅप द्वारे नागरिकांना ग्राम पंचयतीमधून मिळणारे कोणतेही दाखले घरबसल्या काढता येतील. यामुळे वेळेची बचत होईल आणि दाखला मिळवण्यासाठी ग्राम पंचायती मध्ये फेर्‍या मारायची आवश्यकता भासणार नाही.

Gram Panchayat Tax Online अॅप्लिकेशन कसे वापरावे?

सर्वप्रथम महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल.त्यानंतर नोंदणी करणे आवश्यक आहे.

नोंदणी करण्यासाठी आपले स्वत:चे पूर्ण नाव, जन्मतारीख, मोबाइल नंबर, ईमेल आय डी ची आवश्यकता आहे.

नंतर ओटीपी द्वारे खात्री करून घ्यावी. नंतर नोंदणी मोबाइल नंबर आणि पासवर्ड दिलेला असेल.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?  500 चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द – मुख्यमंत्री यांची घोषणा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

हे वाचले का?  ग्रामपंचायत मासिक सभा | Gram Panchayat Masik Sabha

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “Gram Panchayat Tax Online घरपट्टी, पाणीपट्टी भरता येणार मोबाइल वर | असा भरा टॅक्स ऑनलाइन |”

  1. Pingback: ग्रामपंचायत वरील ‘पतिराज’ आता संपणार - माहिती असायलाच हवी

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top