Student Scholarship महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने इतर मागास वर्ग प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना सुरु केली आहे.
या योजनेंतर्गत राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थींना उच्च शिक्षणाकरिता बँकेमार्फत मंजूर केलेल्या 20 लाखापर्यंत कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा महामंडळाकडून वितरीत केले जाते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे व त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हा शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनाचा उद्देश आहे.
योजनेचे स्वरुप :
राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा 10 लाख व परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज 20 लाख.
Student Scholarship लाभार्थीच्या पात्रतेच्या अटी व शर्ती :
अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे.
तो इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता 8 लाखापर्यंत असावे.
अर्जदार इयत्ता 12 वी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा तसेच पदवीच्या द्वितीय वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणांसह पदविका उत्तीर्ण असावेत.
पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किमान 60 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असावा. केवळ पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमाकरीता शासन मान्यता प्राप्त संस्थेमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी.
बँकेने मंजूर केलेली संपूर्ण कर्ज रक्क्म अर्जदारास वितरीत केल्यानंतर अर्जदारास वितरीत केल्यानंतर अर्जदार व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील.
राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदी व अर्जदाराच्या राहण्याचा व भोजनाचा खर्च समावेश राहील.
परदेशी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकरीता फक्त शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदीचा समावेश राहील.
व्याज परतावा व परतफेडीचा कालावधी
अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोअर 0, -1 (म्हणजेच यापूर्वी त्याने कर्ज घेतलेले नसावे) किंवा 500 पेक्षा जास्त असावा.
व्याजचा परतावा :
महामंडळ केवळ बँकेकडून वितरीत केलेल्या रक्कमेवरील जास्तीत जास्त 12 टक्के पर्यंत रक्कमेचा व्याज परतावा नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थींना करेल.
अभ्यासक्रम :
राज्यांतर्गत अभ्यासक्रम – केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद, शासकीय अनुदानित व खासगी मान्यताप्राप्त (NAAC मानांकन प्राप्त) शैक्षणिक संस्थेत अभ्यासक्रमासाठी शासनमान्य सामाईक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व त्यानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी. परदेशी अभ्यासक्रमासाठी QS (Quacquarelli Symonds) च्या रॅकिंग/गुणवत्ता, पात्रता परीक्षा Graduatc Rccord Exam (GRE), Test of English as a Foreing Language (TOEFL) उत्तीर्ण झालेला विद्यार्थी.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.