Home/Flat Buying tips घर घेताय, या दहा गोष्टी तपासून घ्या!

Home/Flat Buying tips

आपण जे घर किंवा मोकळा प्लॉट (Home/Flat) विकत घेत आहोत. तो अनाधिकृत किंवा बोगस तर नाही ना ? याची खातर जमा करण्यासाठी जागरूक ग्राहकांनी अगोदर माहितीचा अधिकार वापरून खालील कागदपत्रांची खातरजमा केली पाहिजे.

तसेच एखाद्या ठिकाणी होत असलेले बांधकाम अनाधिकृत वा बोगस तर नाही ना ? याचा शोध घेण्यासाठीही माहिती अधिकार कार्यकर्त्यांना खालील कागदपत्रे माहिती अधिकारात मागवून अनाधिकृत बांधकामे चव्हाट्यावर आणता येतील.

घर घेताना या गोष्टी तपासा

१) जिल्हाधिकारी यांची अकृषिक परवानगी :- आपण ज्या भूखंडावरील घर किंवा भूखंड घेत आहोत त्यांचा जिल्हाधिकारी किंवा योग्य त्या सक्षम अधिकारी यांच्याकडून अकृषी परवाना घेतला आहे काय? याची माहितीचा अधिकार वापरून खातरजमा करता येईल.

२) भूखंडाचे 7/12 उतारे तसेच फेरफाराचे उतारे काळजीपूर्वक पाहावेत त्याच्या छायाप्रति मागवून घ्याव्यात

घर घेताना या गोष्टी तपासा

३) जमिनीचा मूळ मालक किंवा सद्याचा भूखंडधारक आणि विकासक बांधकाम व्यावसायिक यांच्यात प्रॉपर्टी रजिस्टार यांच्यासमोर झालेले खरेदीखत, साई करार, पॉवर ऑफ अॅटर्नी इत्यादी कायदेशीर नोंदणीकृत दस्तऐवज यांच्या छायाप्रतीची पाहणी व पडताळणी करावी.

४) सदर इमारत वा भूखंड टाऊनशीप प्लॉनिंग वा अन्य बांधकाम प्रकरात येत असल्यास त्यासंबंधीची कागदपत्र तपासणी करावी तसेच तज्ञांचा अभिप्राय घ्यावा.

५) बांधकाम परवाना :– गावात घर (Home/Flat) बांधण्यासाठी ग्रामपंचायत व शहरात घर वा इमारत बांधण्यासाठी नगरपालिका महानगरपालिका यांच्या बांधकाम विभागाचा बांधकाम परवाना घ्यावा लागतो.

घर घेताना या गोष्टी तपासा

असा परवाना न घेता बांधकाम होत असल्यास ते अनाधिकृत ठरते. जेथे गाव किंवा शहर अशी हद्द नसते तेथे संबंधति जिल्हाचे जिल्हाधिकारी यांच्या कडून बांधकाम परवाना घ्यावा लागतो.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहन्यायासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top