घर खरेदी करतांना कोणती आवश्यक काळजी घ्यावी…!!

flat home baying
Community-verified icon
flat home baying
flat home baying

प्रत्येकाच एक स्वप्न असतं कि आपलं घर खरेदी व्हावं ! त्यासाठी जीवाचा आटापिटा करून आपण पै पै जमवितो आणि अश्यात आपली फसगत झाली तर……!

आपलं स्वप्न जर आपल्याला प्रत्यक्षात उतरवायचं असेल तर आपण दक्ष असायलाच पाहिजे. त्यासाठी काय ? काय ? करावे बर ! चला तर मग घेवूयात माहिती अश्याच काही महत्वांच्या बाबींची…...

घर खरेदी करताना घ्या ही काळजी

निवासी आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या मालमत्तेच्या किमती पाहायच्या झाल्या तर महानगरांची नावे नेहमीच आघाडीवर असते. गेल्या काही वर्षांमध्ये मालमत्तेच्या किमतींमध्ये विक्रमी वाढ झाली आहे, जी जगातील काही महागडय़ा शहरांमधील मालमत्तांच्या किमतींशी स्पर्धा करते आहे. पण तरीही मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या ठिकाणी स्वत:चे घर असावे हे स्वप्न पाहणे काही सुटत नाही.

  मालमत्ता खरेदी करणे ही एक मोठी गुंतवणूक असते आणि त्याकरिता पुरेसा वेळ देऊन जिथे मालमत्ता खरेदी करायची आहे त्या प्रकल्पाबद्दलची माहिती जमवणे आणि हे करताना रिअल इस्टेट बाजारातील चढ-उतार समजून घेणे गरजेचे असते.

घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करू इच्छिणाऱ्या खरेदीदाराने लक्षात ठेवाव्यात अशा काही गोष्टी:

घर खरेदी करताना घ्या ही काळजी

हे वाचले का?  HUMAN RIGHTS COMMISSION कडे तक्रार कशी करावी?

अंदाजपत्रक –

अंदाजपत्रक म्हणजे फक्त मालमत्तेची किंमत नव्हे. त्यात वकिलाचे शुल्क, स्टँप डयूटी, रजिस्ट्रेशन फीस गृह विम्याचे प्रीमियम्स आणि मालमत्ता कर अशा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष खर्चाचाही समावेश असतो. विमा, ईएमआय, विविध सुविधांवरील खर्च, देखभाल आणि मालमत्ता कर अशा मासिक खर्चाचा हिशेब ठेवणे देखील गरजेचे असते.

कोणताही व्यवहार पूर्णत्वाला नेण्याआधी घराच्या मूळ किमतीबरोबरच एक्स्टर्नल डेव्हलपमेंट चार्जेस (ईडीसी), प्रीफरेन्शियल लोकेशन चार्जेस (पीएलसी) यांसारखे खर्च लक्षात घेतले पाहिजेत. तुम्ही नवे घर खरेदी करत असाल तर तुम्हाला नवे फर्निचर, फिटिंग्ज आणि उपकरणांची गरज लागणार आहे. त्या खर्चाचाही आधीच विचार करून ठेवायला हवा. तसेच, तुम्ही जुने घर घेत असाल तर नुतनीकरणाचा खर्च ध्यानात घ्यायला हवा. आपण किती खर्च करू शकू हे कळल्यावर आपला शोध मर्यादित होतो.

कोणताही व्यवहार करण्याआधी पैशाची व्यवस्था करा. अटी आणि शर्ती असलेल्या कागदपत्रांच्या प्रती मिळवा आणि त्या काळजीपूर्वक पूर्ण पहा.

हे वाचले का?  traffic Police वाहतूक पोलिसांना गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे का....?

घर असलेल्या ठिकाणाचे मूल्यांकन :

जिथे मालमत्ता खरेदी करणार आहात तो प्रदेश किंवा स्थळ कालांतराने तुमचे मूल कोणत्या शाळेत जाईल, तुम्ही कोणत्या क्लबचे सदस्य व्हाल इत्यादी गोष्टी ठरवत असते. हे लक्षात ठेवून मालमत्तेत भोवतालच्या जागेचे काळजीपूर्वक अवलोकन करणे महत्त्वाचे आहे. मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेताना तिथे पोहोचण्याकरिता लागणारा वेळ, कार्यालयापर्यंत पोहोचण्याकरिता उपलब्ध असलेले परिवहन पर्याय या घटकांचाही विचार व्हायला हवा.

घर खरेदी करताना घ्या ही काळजी

सखोल संशोधन आणि मूल्यांकन :

खरेदी प्रक्रिया सुरू करण्याआधी सर्वप्रथम खालील बाबी लक्षात घ्याव्यात-

  1. डेव्हलपर्सच आणि त्यांचे प्रकल्प
  2. वित्त पर्याय
  3. सुविधांवरील भर
  4. डेव्हलपर्सचे आधीचे प्रकल्प व त्यांनी मालमत्तेचा ताबा वेळीच दिला की नाही. आता रिअल इस्टेट एजण्ट्स तसेच वेबसाइट्स व ब्लॉग साइट्सच्या माध्यमातून प्रकल्प आणि डेव्हलपर यांची माहिती मिळवता येणे शक्य झाले आहे.

सदनिकेच्या चटई/उभारणी क्षेत्राबद्दलची सुस्पष्टता

मालमत्तेत गुंतवणूक करण्याआधी डेव्हलपरकडून चटई क्षेत्र, उभारणी यांविषयीची सुस्पष्ट माहिती घेणे गरजेचे आहे. यामुळे तुमची सदनिका नेमकी किती ऐसपैस किंवा लहान दिसणार आहे, याचा अंदाज येईल. चटईक्षेत्र जितके मोठे तितकी तुमची सदनिका प्रशस्त असते.

नव नवीन माहिती

हे वाचले का?  कुटुंब मालमत्ता व स्वतंत्र मालमत्ता म्हणजे काय?

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

या विषयावरील व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top