Warkari Vima Yojana वारकऱ्यांसाठी शासनाची खास योजना, वारकऱ्यांना मिळणार विमा छत्र‌|

Warkari Vima Yojana

Warkari Vima Yojana महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीमध्ये दरवर्षी सुमारे 15 ते 20 लाख वारकरी सहभागी होतात. या वारकऱ्यांचे आजारपण, अपघात व मृत्यू यासाठी शासनाकडून विमा छत्र देण्यात येणार आहे.

Warkari Vima Yojana काय आहे योजना?

पंढरपूर दिंडीत सहभागी होणार्‍या वारकऱ्यांसाठी “विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना” शासनाने सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत वारकऱ्यांना विमा छत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. “विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजनेची” अंमलबजावणी, संनियंत्रण तसेच विमा हप्ता भरण्याची कार्यवाही शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून करण्यात येईल.

असे असेल वारकरी विमा योजनेचे स्वरूप

या आहेत अटी आणि शर्ती:

  • समूह विमा योजनांच्या प्रचलित नियमानुसार सदर योजना कार्यान्वित करण्यासाठी सदरील समूहाचे स्तरावर प्रबंधन करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा/समिती स्थापन करण्यात येईल.
  • सदर योजने करिता संबंधित विमा कंपनीकडून नाव नसलेले विमा पत्रक निर्गमित करण्यात येणार असून त्याकरिता वारकरी हा गट विनिर्दिष्ट करण्यात येत आहे.
  • ज्या दिवशी विमा हप्ता भरण्यात येईल, त्याच्या पुढील तारखेपासून 30 दिवसांपर्यंत त्याची मुदत राहील. 
  • एखादी व्यक्ती सदर कालावधीत मरण पावल्यास ती वारकरी समुदायातील आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याकरिता सक्षम अधिकार्‍याकडून, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तसे प्रमाणित करण्यात येईल. 
  • सदर विमा पत्रकामध्ये समाविष्ट वारकऱ्याची संख्या समाविष्ट करण्यात येईल. 
  • सदर विमा पत्रकात खालील कारणांकरिता लाभ देय होणार नाही: 
    • आत्महत्या व तसा प्रयत्न 
    • अमली अथवा मादक पदार्थांच्या अंमलाखाली मृत्यू 
    • प्रसूती अथवा बाळंतपणा दरम्यान मृत्यू किंवा विकलांगता आल्यास 
    • गुन्हेगारी उद्देशाने कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे आलेल्या मृत्यू किंवा विकलांगता 
    • गुप्तरोग अथवा बेडसरपणा यामुळे आलेला मृत्यू किंवा विकलांगता 
    • किरणोत्सर्ग, अनुभट्ट्या, युद्ध व बंड इत्यादी तत्सम कारणांमुळे उद्भवलेला मृत्यू किंवा विकलांगता 
    • विमा पत्रा अंतर्गत वैद्यकीय उपचाराकरिता झालेला प्रत्यक्ष खर्च अथवा जास्तीत जास्त रुपये 35 हजार विमा रक्कम देय राहील.
हे वाचले का?  Lek Ladki Yojana मुलींना लखपती करणारी राज्य शासनाची लेक लाडकी योजना | जाणून घेऊ या काय आहे योजना |

असे असेल वारकरी विमा योजनेचे स्वरूप

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  Maharashtra Budget या आहेत अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top