राज्यात बैलगाडी शर्यतीस परवानगी देण्यासाठी केंद्र शासनाच्या प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास करण्याबाबत अधिनियम, १९६० मध्ये “सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४५” अन्वये सुधारणा करण्यात आली असून, सदर अधिनियम दिनांक ३१ जुलै २०१७ रोजी राज्य शासनाच्या राजपत्रात प्रख्यापित करण्यात आला आहे त्यानुसार राज्यातील बैलगाडी शर्यती सुरू करण्यासाठी परवानगी देत आहे
तथापि, यासंदर्भात मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहित याचिका (स्टॅम्प क्र. २३१३२/२०१७) च्याअनुषंगाने दि. १६/८/२०१७ व दि. ११/१०/२०१७ रोजी दिलेले निर्णय विचारात घेऊन सदर अधिनियमाच्या कलम ३ च्या पोट-कलम (२) तसेच याचा क्र. ३ येथील दिनांक १० नोव्हेंबर २०१७ रोजीच्या अधिसूचने विहीत करण्यात आलेल्या नियमामधील तरतूदीनुसार संबंधित जिल्हाधिकारी यांनी पुढील आदेश होईपावेतो बैलगाडी शर्यतीस परवानगी देऊ नये असे निर्देश वाचा अ. क्र. ४ येथील दिनांक १०.११.२०१७ रोजीच्या परिपत्रकान्वये देण्यात आलेले होते.
मा. उच्च न्यायालयाच्या उक्त निर्णयाविरुध्द राज्य शासनाच्या वतीने मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या विशेष अनुमती याचिका क्र. ३५२६ व ३५२७/२०१८ च्याअनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. १६/१२/२०२१ रोजी निर्णय दिला आहे त्यानुसार राज्यातील बैलगाडी शर्यती सुरू
तसेच तामिलनाडू, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांनी केंद्र शासनाच्या प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९६० मध्ये केलेल्या सुधारणांच्या अनुषंगाने मा.. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या सर्व विशेष अनुमती याचिका मा. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे निर्णयासाठी ठेवल्या आहेत.
सदर घटनापीठाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून राज्यात बैलगाडी शर्यती विहीत अटी व शर्तीचे पालन करुन सुरु करण्यास मा. सर्वोच्च न्यायालयाने उक्त दि. १६/१२/२०२१ रोजीच्या निर्णयान्वये मंजुरी दिली आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाने उक्त दि. १६/१२/२०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार घटना पीठाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत ( महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१७ मधील तरतूदी आणि महाराष्ट्र प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत (बैलगाडी शर्यतीचे आयोजन) नियम, २०१७ मध्ये विहित करण्यात आलेल्या नियम व अटी / शर्तीचे काटेकोरपणे पालन करून राज्यात बैलगाडी शर्यतीस परवानगी देण्यात येत आहे.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याच्या संकेतांक २०२११२२११३२०१४६३०१ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
हे वाचले का?
- Life Imprisonment 14 Years? जन्मठेप 14 वर्ष असते का ?
- Z Plus Security काय असते? Z Plus Security in Marathi
- फळ पिक विमा योजना Pradhanmantri Phal Pik vima Yojana
- Gav Rasta Samiti गाव रस्ते, शेतरस्ते, शिव रस्ते रस्ते मोकळे होणार
राज्यातील बैलगाडी शर्यती सुरू GR डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.