CGTMSE केंद्रीय लघु उद्योग मंत्रालयाने लघु उद्योजकांसाठी राबविण्यात येणाऱ्या क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल इंटरप्राईजेस या योजनेअंतर्गत लघु उद्योजकांना मिळणार्या कर्जाची मर्यादा 1 एप्रिल 2023 पासून वाढवलेली आहे.
ही मर्यादा 2 कोटींवरून वाढवून 5 कोटींपर्यंत करण्यात आली आहे. 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करताना आपल्या भारत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याची घोषणा केली. ज्या बँका आणि वित्त संस्था योजनेद्वारे कर्जाचे वाटप करतात त्यांना याची सूचना देऊन माहिती देण्यात आली आहे.
CGTMSE कर्ज ऑनलाइन अर्ज येथे करा
CGTMSE योजना काय आहे?
सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय आणि लघुउद्योग विकास बँक यांनी एकत्र येऊन सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना आर्थिक मदत करण्यासाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल इंटरप्राईजेस याची स्थापना केली. 2006 पासून ही योजना राबविण्यात येत आहे.
पहिल्या पिढीत उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्याना आर्थिक भांडवलाची आवश्यकता असते. यासाठी बँक जामीनदार व तारण मिळाल्याशिवाय कर्ज देत नाही. अशावेळी या योजनेअंतर्गत क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट बँकेला तारण राहून छोट्या व्यावसायिकांना किंवा उद्योजकांना कर्ज मिळवून देण्याचे काम करते.
सुरुवातीला या योजनेद्वारे एक कोटी पर्यंत विनाकारण कर्ज देण्याची तरतूद होती. त्यानंतर याची मर्यादा दोन कोटी करण्यात आली होती. पण आता त्यात वाढ करून ही मर्यादा पाच कोटी पर्यंत वाढवण्यात आली आहे.
CGTMSE कर्ज ऑनलाइन अर्ज येथे करा
लाभार्थी
उत्पादन व्यवसाय करणारे व्यावसायिक, सेवा संबंधित व्यवसाय करणारे व्यावसायिक आणि किरकोळ व्यापार करणारे व्यावसायिक या योजनेसाठी पात्र ठरू शकतात आणि लाभ घेऊ शकतात.
आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता:
कोणतेही कर्ज घेताना आपल्याला काही कागदपत्रे आवश्यक असतात आपण आता बघणार आहोत की क्रेडिट गॅरंटी स्कीम कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी आपल्याला कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत.
CGTMSE कर्ज ऑनलाइन अर्ज येथे करा
- अर्ज करू इच्छिणारा अर्जदार हा कायमचा भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे
- अर्जदाराचा व्यवसाय स्थापनेचा पुरावा म्हणजेच नोंदणी प्रमाणपत्र
- व्यवसायाचा प्रकल्प अहवाल
- बँकेने मंजूर केलेल्या कर्जाची प्रत
- बँक खात्याचा तपशील
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- बँकेला आवश्यक असणारी कागदपत्रे
- अर्जदाराचा आपल्या पासपोर्ट फोटोचा सहित विहित नमुन्यात भरलेला अर्ज
- CGTMSE कर्ज कव्हरेज पत्र
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- कांदा अनुदानासाठी 20 एप्रिल पर्यंत अर्ज करण्याचे पणन महा संचालकांचे आवाहन
- कांदा चाळ अनुदान योजना- पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करावा
- सरकारी कर्मचारी अधिकारी कार्यालया तक्रार अशी तक्रार केली तरच ग्राह्य धरणार.
- तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियम (Tukadejod Tukde Bandi Adhiniyam)
- शिधापत्रिका/ रेशनकार्ड चे प्रकार पिवळे, केशरी आणि सफेद
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा