Galmukt Dharan & Galyukt Shivar Yojana गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना; शेतकऱ्यांना शेतात गाळ टाकण्यासाठी मिळणार ३७,५०० रूपये अनुदान….!!

Galmukt Dharan & Galyukt Shivar Yojana

Galmukt Dharan & Galyukt Shivar Yojana महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभाग मार्फत गाळमुक्त धरण व गाळीयुक्त शिवार ही योजना राबविण्यात येते.

Galmukt Dharan & Galyukt Shivar Yojana गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये:

1) स्थानिक शेतकऱ्यांचा सहभाग:

या योजनेमध्ये अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये गाळ नेण्यासाठी खर्च देण्यात म्हणजेच अनुदान देण्यात येईल व बहुभूधारक शेतकरी हे स्वखर्चाने गाळ वाहून नेण्यास तयार असणे, ही प्राथमिक धारणा आहे‌. 

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेसाठी अर्ज कुठे करावा? येथे क्लिक करा

2) सार्वजनिक व खाजगी भागीदारी:

गाळ उपसण्याकरिता आवश्यक असलेली यंत्रसामग्री व इंधनावरील खर्च तसेच शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीमधून म्हणजेच सन 2023-2024 च्या आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार 2.0 या योजनेच्या लेखाशीर्षातून करण्यात येणार आहे. यानंतरच्या वित्तीय वर्षात सदर योजने करिता नवीन लेखाशीर्ष घेऊन त्यातून कायमस्वरूपी चालणारे योजनेचा खर्च भागविण्यात यावा. मात्र गाळ मुक्त धरण व गाळीयुक्त शिवार यांच्या फायद्याबाबत जाणीव जागृती व माहिती भरून ती योग्य असल्याची खात्री करून घेण्याचे कार्य अशासकीय संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.

हे वाचले का?  ई-श्रम कार्ड (E-Shram Card) कामगार नोंदणी म्हणजे काय? फायदे जाणून घ्या E-Shram Card ऑनलाईन असे काढा.

3) अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर:

या योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचे जिओ टॅगिंग, योजनेची संगणक प्रणालीवर माहिती संकलित करणे इत्यादी स्वरूपाची प्रक्रिया अवनी ॲपद्वारे करण्यात येणार आहे. अवनी ॲप अंतर्गत खालील गोष्टींचा समावेश आहे: 

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेसाठी अर्ज कुठे करावा? येथे क्लिक करा

  • जलस्तोत्र निहाय साचलेल्या गाळाची माहिती.
  • प्रत्येक साईडची काम करण्यापूर्वीची आणि नंतरची चित्रे आणि व्हिडिओ.
  • शेतकरी व त्यांनी नेलेल्या गाळाची माहिती. 
  • जलसाठे व गावनिहाय शेतकरी निहाय भूधारणा, घेऊन गेलेल्या गाळाचे प्रमाण व भरलेल्या ट्रॉलीची संख्या याची माहिती. 
  • उत्खनन यंत्रसामग्रीच्या कामाच्या तासांची संख्या. 
  • एकूण काढलेल्या गाळाचे प्रमाण. 
  • त्यातील ताळमेळ समजून घेण्यासाठी दैनंदिन डेटा एन्ट्री आणि MB रेकॉर्डिंगचे तपासणी केली जाईल. 
  • सर्व कामे कुठे वेगाने सुरू आहेत आणि कोणते जिल्हे मागे आहेत याची जिल्हास्तरीय माहिती. 
  • केलेल्या कामाचे आणि शेतकऱ्यांना कामाचा फायदा होत असल्याची एकत्रित माहिती. 
हे वाचले का?  Why Agriculture land is illegal तुमची शेतजमीन बेकायदेशीर ठरू शकते! जाणून घ्या ८ मुख्य कारणे आणि बचावाचे उपाय

4) संनियंत्रण: या योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचे मूल्यमापन अवनी मार्फत करण्यात येणार आहे. 

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेसाठी अर्ज कुठे करावा? येथे क्लिक करा

5) मूल्यमापन:

गाळमुक्त धरण व गाळीयुक्त शिवार ही योजना राबविण्याचा एक किंवा दोन पावसाळा गेल्यावर जलसाठ्यात झालेली वाढ व शेतकऱ्यांचा उत्पादकतेत, उत्पादनात, उत्पन्नात आणि निव्वळ नफ्यात झालेली वाढ, जीवनमान उंचावणे याविषयी त्रयस्थ यंत्रणेमार्फत स्वतंत्र मूल्यमापन करण्यात येईल. यासाठी प्रकल्प खर्चाच्या १ टक्केपर्यंत खर्च करण्यात येईल. 

6) ६०० हेक्टर पेक्षा कमी लाभक्षेत्र असलेल्या व १० वर्षापेक्षा जुन्या जलसाठ्यांना प्राधान्यक्रम राहील. 

7) गाळ उपसा करण्यास परवानगी राहील तसेच पाणीसाठा वाढवण्याचे हेतूने वाळू उत्खनन करावे लागत असल्यास महसूल विभागाचा प्रचलित नियमाप्रमाणे करण्यात येईल.

हे वाचले का?  घरकुल जागा खरेदीसाठी आता मिळणार एक लाख रुपये अनुदान | पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजना |

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top