अंत्योदय/ BPL नवीन राशनकार्ड व राशनकार्ड दुरूस्ती सुरू

अंत्योदय/ BPL नवीन राशनकार्ड व राशनकार्ड दुरूस्ती सुरू
अंत्योदय/ BPL नवीन राशनकार्ड व राशनकार्ड दुरूस्ती सुरू
अंत्योदय/ BPL नवीन राशनकार्ड व राशनकार्ड दुरूस्ती सुरू

अंत्योदय/ BPL राशनकार्ड नवीन राशनकार्ड व दुरूस्ती सुरू करण्यात आल्याने राशनचा लाभ घेणार्‍या नागरीक यांच्यासाठी एक समाधानाची बातमी आली आहे. आता ज्या नागरीकांना नवीन राशनकार्ड काढवायचे आहे किंवा जुने राशनकार्ड दुरूस्त वा विभक्त करावयाचे आहे आता हे काम नागरीकांना करता येणार आहे.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३, दिनांक ५ जुलै, २०१३ पासून लागू केला आहे. सदर अधिनियमानुसार राज्यासाठी ७६.३२ टक्के ग्रामीण (४६९.७१ लक्ष) व ४५.३४ टक्के शहरी (२३०.४५ लक्ष) अशी मिळून ७००.१६ लक्ष लाभार्थी संख्या निश्चित करण्यात आली आहे. सदर अधिनियमाची अंमलबजावणी राज्यात दिनांक ०१ फेब्रुवारी २०१४ पासून करण्यात आली आहे.

घर खरेदी करतांना कोणती आवश्यक काळजी घ्यावी…!!

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता प्रथमतः संदर्भाधिन दिनांक १७.१२.२०१३ च्या शासन निर्णयान्वये ग्रामीण व शहरी भागाकरिता जिल्हा निहाय लाभार्थ्यांचा इष्टांक देण्यात आला असून तद्नंतर संदर्भाधिन शासन निर्णयान्वये वेळोवेळी सुधारती इष्टांक देण्यात आला आहे.

दिनांक २१.५.२०१८ च्या शासन निर्णयान्वये दिनांक ३०.४.२०१८ पर्यंतच्या शिधापत्रिकांचा समावेश करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तद्नंतर दि. २२.२.२०१९ व दि. ६.७.२०१९ च्या शासन निर्णयान्वये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत लाभार्थ्यांच्या जिल्हानिहाय इष्टांकाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने अनुक्रमे दि. १५.२.२०१९ व दि. ३०.६.२०१९ पर्यंतच्या पात्र शिधापत्रिकाधारकांचा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे वाचले का?  बँक अधिकारी यांची तक्रार RBI कडे कशी करावी?

आमदार निधीचा हिशोब असा मागावा

अंत्योदय/ BPL नवीन राशनकार्ड शासन निर्णय:

१) विभक्त शिधापत्रिकांची मागणी करणाऱ्या विद्यमान अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी कुटुंबाची शिधापत्रिका धारण करणाऱ्या तसेच, सद्यस्थितीत शिधापत्रिका धारण करीत असलेल्या परंतु, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थी म्हणून समाविष्ट नसलेल्या सर्व शिधापत्रिकाधारकांनी वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाबाबतचे या शासन निर्णयासोबतच्या नमुन्यातील हमीपत्र सक्षम प्राधिकाऱ्याकडे सादर करणे अनिवार्य राहील.

रेशनकार्ड ‌ डिटेल्स ऑनलाइन कसे पहाल

३) नव्याने शिधापत्रिकेची मागणी करून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थी म्हणून समाविष्ट होऊ इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांनीदेखील वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाबाबतचे या शासन निर्णयासोबतच्या नमुन्यातील हमीपत्र सक्षम प्राधिकाऱ्याकडे सादर करणे अनिवार्य राहील.

Gas Consumer Rights एलपीजी गॅस ग्राहकांचे अधिकार

अंत्योदय/ BPL नवीन राशनकार्ड व दुरूस्ती हमीपत्र नमुना:

अंत्योदय/ BPL नवीन राशनकार्ड व राशनकार्ड दुरूस्ती हमीपत्र नमुना
अंत्योदय/ BPL नवीन राशनकार्ड व राशनकार्ड दुरूस्ती हमीपत्र नमुना

४) क्षेत्रिय कार्यालयास अंतिमतः देण्यात आलेल्या इष्टांकाच्या मर्यादेत वेळोवेळी उपलब्ध असलेल्या शिधापत्रिकाधारकांमधून लागू असलेल्या विद्यमान निकषानुसार त्या शिधापत्रिकाधारकास राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थी म्हणून समाविष्ट करण्यात यावे.

शिधापत्रिका संगणकी करणाचा तांत्रिक कालावधी विचारात घेऊन तद्नंतर त्या शिधापत्रिकाधारकास सवलतीच्या दरातील अन्न धान्याचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करावी.

हे वाचले का?  मोफत रेशन योजना मुदतवाढ | Free Ration Scheme

वीज ग्राहकांचे अधिकार चला समजून घेऊया

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राशन दुकानातील घोटाळा एक शिक्षकाने केला उघड

1 thought on “अंत्योदय/ BPL नवीन राशनकार्ड व राशनकार्ड दुरूस्ती सुरू”

  1. Pingback: ग्रामसेवक शिक्षक यानी गावत मुकामी राहण्याबाबत आदेश GR - माहिती असायलाच हवी

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.