
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४८ तरतूदी
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४८ (१) गौण खनिज अधिनियम महाराष्ट्र जमिनीवर किंवा जमिनीखाली असलेल्या खाणी, दगडाच्या खाणी, नाले, खाड्या, नदीची पाने इत्यादी ठिकाणी सापडणा-या खनिजावरील सरकारचा हक्क स्पष्टपणे राखून ठेवण्यात आला आहे यालाच गौण खनिज (Gaun Khanij Kayda) असे म्हणतात.
त्यामुळे शासनाच्या परवानगीशिवाय सरकारी जमिनी वरील किंवा जमिनी खालील खनिज पदार्थ काढण्याचा विनियोग करण्याचा अधिकार कोणालाही नाही. प्रत्येक व्यक्तीला किंवा संस्थेला खनिज पदार्थाची आवश्यकता असल्यास सरकारची परवानगी घ्यावी लागते.
राजस्व विभागाचा गावपातळीवर तलाठी व मंडल अधिकारी हा प्रतिनिधी असतो. गावक-यांना त्यांच्या घरगुती व शेतीविषयक उपयोगाकरीता गौण खनिजाचे प्रमाण कमी असेल तर उत्खनन विनामूल्य करता येते.
गौण खनिज अवैध वाहतूक
महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) अन्वये अवैधपणे खोदकाम व वाहतूक करण्यात येणा-या गौण खनिज च्या बाजार भावाच्या तिपटी एवढा दंड करता येतो. खनिजाच्या बाजार भावामध्ये ट्रकमधुन वाहतूक करण्याकरिता जो खर्च करता येतो त्याचा अंतर्भाव करावा लागतो.
खनिजाचा बाजारभाव ठरवताना खनिजाच्या किंमतीमध्ये वाहतुकीचा खर्च मिळविल्यानंतर येणा-या बाजार भावाच्या तिपटी एवढा दंड ३०००/- रू. पेक्षा कमी होत असेल तर किमान १०००/- रू. प्रति ब्रासच्या तीन पट एवढा दंड करता येईल. दंड अधिक खनिजाची किंमत वसूल करण्यात यावी (दंड रक्कम मध्ये बदल असण्याची शक्यता आहे आपण स्थानिक पातळीवर तपासून पहावे).
कलम ४८ (८) अन्वये अवैधपणे खोदण्यात आलेले वाहतूक करण्यात येत असलेले खनिज व साहित्य जप्त करण्याची तरतूद आहे.
विटा तयार करणे, दगड काढणे, माती, मुरूम, कंकर आणावयाचे असल्यास तहसिलदार किंवा नायब तहसिलदार यांची पूर्व परवानगी घ्यावयास पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीने अनाधिकृत उत्खनन केल्यास त्यास महाराष्ट्र जमिन महसूल कायदा कलम ४८ (७) व ४८ (८) नुसार दंड करता येतो.
गाव पातळीवर राजस्व विभागाचा तलाठी कार्यरत असतो. गौण खनिजे उत्खननाचे काम बहुधा ग्रामीण भागात जास्त प्रमाणात होत असते. त्यामुळे गाव पातळीवर राजस्व कर्मचारी तलाठी याने अवैधरित्या होणा-या गौण खनिजाचे उत्खननाकडे जातीने लक्ष द्यावयास पाहिजे हे त्याचे आद्य कर्तव्य आहे.
जर तलाठी हया बाबीकडे दुर्लक्ष करीत असेल तर शासनाचे नुकसान होईल. गौण खनिजे उत्खननावर योग्य नियंत्रण ठेवावयाचे असेल तर तलाठ्यांनी गाव पातळीवर गौण खनिजे उत्खनाबाबतचे स्वतंत्र रजिस्टर ठेवावे आणि त्यांच्या कार्य क्षेत्रामधून ज्या ज्या ठिकाणाहून गौण खनिज नेण्यात येतील त्याची कोणत्याही व्यक्त्यांचे जवळील परवाना पाहिल्या शिवाय देऊ नये. नोंद तलाठ्यांनी रजिस्टर मध्ये न चुकता व नियमित घेत जावी.
जर एखादा इसम किंवा ठेकेदार बिना परवानगी गौण खनिज घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असेल तर ती बाब तलाठ्यांनी व मंडल अधिका-याने ताबडतोब संबंधित महसूल अधिका-याच्या नजरेस आणून द्यावयास पाहिजे.
तलाठी यांनी त्यांचे कार्य क्षेत्रातील गौण खनिज हयांची कार्य क्षेत्राबाहेर नेण्याची परवानगी महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक ११/०५/२०१५ पासून खालील प्रमाणे गौण खनिजांवर आकारण्यात येणा-या रॉयल्टीचे दर अंमलात आलेले आहेत.
तालुक्यात दगड खाण, बाळू पट्टा यांचे लिलाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केले जातात त्यासाठी आपल्या तालुक्यातील दगड खाण, वाळु वा यांची माहिती असणे गरजेचे आहे. तलाठी व मंडळ अधिकारी यांना आपल्या कार्यक्षेत्रातील दगड खाण व वाळू पट्टा यांचे क्षेत्र व त्यांची हद्द त्यात उपलब्ध दगड अथवा बाळु यांचा साठा यांच्या कन्या नकाशासह प्रस्ताव तहसिल कार्यालयात दाखल करावे लागतात.
लिलाव झाल्यानंतर संबंधित लिलाव धारकांकडून दगड खाण व बालुपट्टा यांतून खनिजे काढताना शासकिय नियमांचा अथवा करारातील अटीचा भंग होतो किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी तलाठी यांची आहे व त्याबाबतचा अहवाल तहसील कार्यालयात दाखल करणे गरजेचे आहे.
गौण खनिजे उत्खननावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी तलाठयाने त्याचे कार्य क्षेत्रात असलेल्या प्रत्येक गावी मिळणार्या गौण खनिजाच्या जागा निश्चित करून त्यांची यादी जवळ ठेवावी. जेणेकरून दौ-यावर असताना अशा जागांना अधिकारी भेटी देऊन अवैध उत्खननास आळा घालता येईल व अवैध उत्खनन करणा-या विरुद्ध कारवाई करता येईल.
नवनवीन माहिती
- Personal Loan पर्सनल लोन घ्यायचा विचार करत आहात? आधी समजून घ्या सुरक्षित आणि असुरक्षित लोनमधला फरक !
- ITR Filling Online 📲मोबाईल अॅप्ससह ITR फाइलिंग करा, वेळ वाचा, CA शिवाय भरा आयकर !
- Road condition complaint gram panchayat तुमच्या ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते खराब आहेत? तक्रार कुठे आणि कशी करावी?
- Ladki Bahin Yojna August 2025 Installment लाडकी बहीण योजना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आज पासून जमा होणार,
- 🏡 Property Rule आईच्या नावावर असलेली मालमत्ता मृत्यूनंतर कोणाला मिळते? काय आहे वारसहक्काचे नियम?
तलाठ्यांना २०० रूपये पर्यंत किमतीची गौण खनिजे गावक-यांने त्यांचे घरगुती व शेतीच्या कामाकरिता देण्याची परवानगी देता येते. तसेच राजस्व निरीक्षक यांनी २५० रूपये किमतीच्या गौण खनिजाची परवानगी बाबत माहिती दर्शविणारे रजिस्टर ठेवावे. म्हणजे वेळोवेळी त्याची तपासणी करता येते. रजिस्टर विहित नमुन्यात आणि वरिष्ठ अधिका-यांना त्यांचे कार्य क्षेत्रातील दौ-यावर आले असताना हे रजिस्टर दाखवावे.
रजिस्टरचा नमूना
अ. क्र. | अर्जाची तारीख | अर्जदाराचे नाव | गौण खनिजाची केलेली मागणी | परवानगी दिल्याची तारीख | किती खनिजा करिता | गौण खनिजाची किमती परवानगी | गौण खनिजे काढून नेल्याची तारीख | शेरा |
तलाठयाने कार्य क्षेत्रातील ज्या ठिकाणावरून गौण खनिजे नेण्यात येतील त्याची नोंद तलाठी व मंडल अधिका-यांने वरील रजिस्टरमध्ये न चुकता घ्यावी व रजिस्टर व्यवस्थित व अद्ययावत ठेवावे. शासनाला गौण खनिजापासून जास्तीत जास्त महसूल मिळण्याच्या दृष्टीने अवैध उत्खननावर सर्व महसूल अधिकारी, राजस्व निरीक्षक, तलाठी व मंडल अधिकारी यांनी जास्त लक्ष पुरविणे आवश्यक आहे.
गौण खनिज बाबतची तलाठी व मंडळ अधिकारी यांची कर्तव्ये :
- शासनाने गावक-यांना शेतीचं व इतर काही उपयोगाकरिता विनामूल्य गौण खनिजे वापरण्यासंबंधी तरतूद केलेली आहे. सदर तरतुदीनुसार संबंधित अर्जदारास अविलंब परवानगी देणे व त्या संबंधी सविस्तर आणि अद्ययावत माहिती दप्तरात ठेवणे.
- बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाची प्रकरणे शोधून काढणे व त्याबाबतचा सविस्तर अहवाल बिना विलंब तहसीलदारांना सादर करणे.
- सक्षम अधिका-याकडून मिळालेल्या परवान्यानुसार व त्यात नमुद केलेल्या मुदतीत गौण खनिजाचे उत्खनन होत आहे किंवा नाही यावर देखरेख ठेवणे.
- गौण खनिजाच्या जागेचे बाबतीत वरिष्ठ अधिकार्यांनी मागविलेली माहिती विनय विलंब सादर करणे.
हे वाचले का?
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहन्यायासाठी येथे क्लिक करा