पोलीस लाठीचार्ज: किती कायदेशीर, किती बेकायदेशीर ?

Police Lathicharge

लॉकडाऊनच्या काळात अनेक वेळा पोलीस सामान्य माणसांवर लाठीचार्ज करतात. पोलीसांनी लाठीचार्ज करणं कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे. या संबंधीचे कायदेशीर तपशील पाहिले व केवळ जिज्ञासूंच्या माहिती साठी हा व्हिडीओ बनविला असून आपण तो शेवटापर्यंत काळजीपूर्वक पहा यातील माहिती नक्कीच तुमच्या उपयोगाला येईल.

पोलीस लाठीचार्ज करू शकतात का ? लाठीचार्ज कायदेशीर असतो की बेकायदेशीर ?

याचं उत्तर आहे, पोलीस (लाठीचार्ज करण्याचे नियम पाळून) लाठीचार्ज करू शकतात. असा लाठीचार्ज कायदेशीर असतो. पण याचं पुढचं उत्तर आहे. पोलीसांनी लाठीचार्ज करण्यांचे नियम मोडून केलेला लाठीचार्ज बेकायदेशीर असतो.
होय, पोलीस लाठीचार्ज करू शकतात पण असा लाठीचार्ज १. केव्हा २. कोणत्या कारणासाठी ? ३. कसा व किती प्रमाणात करू शकतात याचे काही नियम व मानकं ठरलेले आहेत. हे नियम व मानकं काय आहेत हे आपण माहित करून घेऊ.

लाठीचार्ज नियम व मानकं काय आहेत?

संयुक्त राष्ट्र संघ अर्थात युनायटेड नेशन्सने Human Rights Standards and Practice for the Police या नावाने एक दस्तऐवज प्रकाशित केलेला आहे. यात How to Use of Force; या नावाचे एक प्रकरण आहे. त्यात पोलीसांनी बळांचा वापर १ का ? २. किती ? ३. कसा ? ४. केव्हा ? करावा व केव्हा करू नये या विषयी सविस्तर माहिती दिलेली आहे.

आपला देश हा संयुक्त राष्ट्र संघाचा सभासद असून त्यामुळे मानवी हक्कांविषयीचे हे नियम आपल्या देशातील पोलीसांनाही लागू होतात. लेख लिहताना Human Rights Standards and Practice for the Police या दस्तऐवजांचा आधार घेतलेला आहे.

आता हे पुढं येणारं वाक्य तुम्ही व्यवस्थीत समजावून घ्या. यात पोलीसांच्या लाठीचार्ज चे सगळे नियम समाविष्ट झालेले आहेत.

असामान्य परिस्थितीत (extreme circumstances ) वाजवी व उचित कारणांसाठी (Reasonable reason ) आणि योग्य ती मर्यादा पाळून (within limits) व्यक्ती किंवा जमाव यांच्या विरोधात पोलीस बळांचा वापर करू शकतात. या वाक्यातील पहिल्या तीन शब्दांवर तुम्ही ध्यान द्या. वरील वाक्यामधून तीन अर्थ निघतात.

  1. असामान्य परिस्थितीमध्ये पोलीस (लाठीचार्ज करण्याचे नियम पाळून लाठीमार करू शकतात)
  2. उचित व वाजवी कारण असल्याशिवाय पोलीस लाठीचार्ज करू शकत नाहीत.
  3. पोलीसांनी मर्यादा पाळली पाहिजे.

म्हणजेच पोलीस अमर्याद व करतापूर्ण पद्धतीने लाठीमार करू शकत नाहीत. कायदा असं सांगतो की पोलीसांना लाठीमार तर करता येतो पण लाठीमार करण्यासाठी खुली छूट अर्थात पूर्ण मोकळीक नसते. संसर्गजन्य रोग परिस्थितीत काही व्यक्तीच्या अमर्याद संचारामुळे बहुसंख्य व्यक्तीचे जीवत धोक्यात येते. त्यामुळे लॉकडाऊन किंवा संचारबंदी घोषीत करावी लागते अशा परिस्थितीला असामान्य परिस्थिती (extreme circumstances) म्हणतात.

अशा परिस्थितीत नियम व कायदेभंग करणाऱ्या व्यक्ती विरोधात पोलीसांना लाठीचार्ज करण्याचे नियम पाळून लाठीचार्ज करता येतो. पण हा वाजवी कारणासाठी व योग्य त्या मर्यादेतच करावयाचा असतो. पण एखादी व्यक्ती जर जीवनावश्यक व आरोग्य विषयक गरजेसाठी बाहेर आली असेल तर पोलीसांनी सदर व्यक्तीचे बाहेर येण्याचे कारण वाजवी व उचित असल्याची खात्री करून घेऊन अशा व्यक्तीस तिचे कायदेशीर हक्क सही सलामत राहतील याची काळजी घेणे आवश्यक आहे. अशी कसलीही खात्री न करता दिसला माणूस की मार लाठी असे पोलीसांचे वागणे नियमबाह्य व बेकायदेशीर ठरते.

२०२० मध्ये लॉकडावून काळात असे अनेक व्हिडीओ वायरल झाले होते त्यात पोलीसांनी नियम तोडून लाठीचार्ज केलेला होता.

जरी एखादा व्यक्ती संचारबंदी किंवा लॉकडाऊनमध्ये वाजवी कारणाशिवाय बाहेर फिरून कायदेभंग करीत असेल व प्रथम दर्शनी दोषी असल्याचे खात्री झाली असली तर पोलीस अशा व्यक्तीला कायदेभंगांची समज येईल इतपत मारू शकतात. दोषी व्यक्तीवर पोलीस संधी मिळावी म्हणून अमर्याद व कुरपणे ( Brutally) करू शकत नाहीत.

पोलीस बळापुढे हतबल झालेल्या व क्षमायाचाना करीत असलेल्या व्यक्तीस क्रूरपणे मारणे हे देखील बेकायदेशीर ठरते. कारण बलप्रयोग करताना पोलीसांकडून कमीत कमी नुकसान व कमीत कमी दुखापत (minimum damage and minimum injury) झाली पाहिजे हे सूत्र पोलीसांनी विसरता कामा नये.

जर पोलीसांनी मर्यादा सोडून व क्रूरपणे लाठीचार्ज केला असेल किंवा लाठीचार्ज करण्यामागे कोणतेही वाजवी कारण नसताना लाठीचार्ज केला असेल व त्यांत व्यक्तीला गंभीर मारहाण व दुखापत झाली असेल तर अशा बेजवाबदार पोलीसाच्याचं विरोधात पीडत नागरिक किंवा नातेवाईक किंवा अन्य कोणीही संवेदनशील नागरिक कायदेशीर कारवाईची मागणी व तक्रार करू शकतो.

अशी तक्रार प्रथम पोलीसातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे कडे, तसेच तुमच्या विभागातील पोलीस तक्रार प्राधीकरण कार्यालयाकडे तसेच राज्य मानवी हक्क आयोग यांचे कडे करता येते. ही तक्रार कशी करावी यांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक कारा.

भारतातील बहुतेक नागरिक बेजवाबदार व कायद्याचे प्राथमिक भान नसलेले नागरिक आहेत. नागरिकांनी जबाबदारीने वागावे तसेच अन्याय सहन करू नये. त्याच वेळी पोलीसांनाही कायदेशीर जबाबदारीचे उत्तम प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

जनता व पोलीस या दोन्हीमध्ये व्यापक संतुलन व संवाद होणे गरजेचं आहे.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहन्यायासाठी येथे क्लिक करा

1 thought on “पोलीस लाठीचार्ज: किती कायदेशीर, किती बेकायदेशीर ?”

  1. Pingback: सरकारी कर्मचारी अधिकारी कार्यालया तक्रार अशी तक्रार केली तरच ग्राह्य धरणार. - माहिती असायलाच हव

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top